प्रकरण २ लोकसंख्या

 प्रकरण २ रे

लोकसंख्या (POPULATION)

लोकसंख्या वाढ व वितरण (जागतिक आणि भारत)

प्रस्तावना -

जगात लोकसंख्येचे वितरण फारच असमान झालेले आढळते. एकूण भूप्रदेशापैकी सुमारे ३३% भूप्रदेश जवळजवळ निर्जन आहे, तर जगातील ५०% लोकसंख्या % भूप्रदेशात एकवटलेली आढळते तर केवळ % लोकसंख्या ५६% भूभागात पसरलेली आहे. जगातील बऱ्याचशा भागात मानवी वस्ती नाही. . सैबैरिया, उत्तर अमेरिकेचा उत्तर भाग, मध्य आशियातील वाळवंटी प्रदेश, ऑस्ट्रेलियातील शुष्क कोरडे प्रदेश, ऑस्ट्रेलिया संयुक्त संस्थानातील पर्वतीय प्रदेश यासारख्या विभागात फारच अल्प लोकसंख्या आढळते.

जागतिक लोकसंख्या वितरण

´ ढोबळ मानाने जगाच्या २५% भागात अतिशय दाट लोकवस्ती, तर २५% भागात अतिशय विरळ लोकवस्ती आढळते.

´  जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे ७५% लोकसंख्या २३ उत्तर अक्षवृत्त (कर्कवृत्त) आणि ७०° उत्तर अक्षवृत्त यादरम्यान  एकवटली आहे.

´ खंडांतर्गत भूमी व लोकसंख्या टक्केवारी (2019)

अ.न.

खंड

भूमी (%)

पूर्णाक (%)

लोकसंख्या

पूर्णांक (%)

आफ्रिका

20.40

20

16.96

17

आशिया

29.20

29

59.65

60

उत्तर अमेरिका

16.50

17

9.69

10

दक्षिण अमेरिका

12.00

12

8.40

8

युरोप

6.80

7

4.75

5

ऑस्ट्रेलिया

5.90

6

0.55

1

अंटार्क्टीका

9.20

9

0.00

00

 

´  सुमारे ८०% लोकसंख्या उत्तर गोलार्धात तर २०% लोकसंख्या दक्षिण गोलार्धात आहे.

´ लोकसंख्या वितरणाचा खंडनिहाय विचार केल्यास एकट्या आशिया खंडात सुमारे ६०% लोकसंख्या आढळते. या खंडाचे क्षेत्रफळ मात्र जगाच्या सुमारे ३०% आहे.

´ जगातील सुमारे १४% लोकसंख्या जगाच्या ३१% क्षेत्रफळ असलेल्या उत्तर दक्षिण अमेरिका खंडात आहे. तर २०% क्षेत्रफळ असलेल्या आफ्रिका खंडात केवळ १७% लोकसंख्या आढळते.


´ युरोप खंडात सुमारे % लोकसंख्या (क्षेत्रफळ %) आढळत असून जगाच्या सुमारे % क्षेत्रफळ असलेल्या ऑस्ट्रेलिया (६%) न्यूझीलंड विभागात जगातील % लोकसंख्या आढळते. यावरून जागतिक लोकसंख्येचे वितरण खंडानुसारसुध्दा अतिशय विषम असल्याचे दिसून येते. देशादेशानुसार असमान झालेले आढळते.

´ चीनचा जागतिक लोकसंख्येत दुसरा क्रमांक असून या देशात जगातील सुमारे १३५  कोटी लोकसंख्या आहे तर भारताची लोकसंख्या १४४ कोटी  असून, ती जगात भारताचा प्रथम क्रमांक आहे.

अशाप्रकारे जगात सर्वत्र लोकसंख्येचे वितरण फारच असमान झालेले आढळते. कारण लोकसंख्या वितरणावर विविध भौगोलिक, आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक, धार्मिक सांस्कृतिक घटकांचा प्रभाव पडतो. हे सर्वत्र समान नसल्यामुळे लोकसंख्या वितरण विषम आढळते. कारण लोकसंख्या वितरणावर अनेक घटक परिणाम करतात ते खालीलप्रमाणे,

जागतिक लोकसंख्येचे वितरण / घनता (Distribution of world Population):

     जगातील लोकसंख्येचे वितरण खूपच असमान असून काही प्रदेश मानवविरहित आढळतात. लोकसंख्येच्या जागतिक वितरणाचा अभ्यास करताना लोकसंख्येची घनता विचारात घेणे उचित ठरते. त्यानुसार लोकसंख्येचे जागतिक वितरण लक्षात घेता जगाची विभागणी खालील तीन विभागांत करता येते.

(१)   दाट लोकवस्तीचे प्रदेश (Densely Population Regions)

) मध्यम लोकवस्तीचे प्रदेश (Medium Population Regions)

) विरळ लोकवस्तीचे प्रदेश (Sparsely Population Regions)

) दाट लोकवस्तीचे प्रदेश (Densely Populated Regions)

जगातील काही प्रदेश दाट लोकवस्तीचे आहेत. सर्वसाधारणपणे अनुकूल हवामान असलेल्या शेतीदृष्ट्या औद्योगिकदृष्ट्या विकसित प्रदेशांमध्ये दाट लोकसंख्या आढळते. दर चौ.कि.मी. ला २०० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेले प्रदेश दाट लोकवस्तीचे प्रदेश म्हणून ओळखले जातात.

यात पूर्व आशियातील चीन, जपान, दक्षिण कोरिया, तैवान, दक्षिण आशियातील भारत, पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, मालदीव नेपाळ, युरोपातील फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, डेन्मार्क, स्पेन, इटली, पोर्तुगाल, पोलंड, ग्रेट ब्रिटन, उत्तर अमेरिकेतील ईशान्य संयुक्त संस्थान आणि आग्रेय कॅनडा या प्रमुख देशांचा समावेश होतो. यापैकी पूर्व दक्षिण आशियातील देशांमध्ये प्रामुख्याने शेती व्यवसाय विकसित असलेल्या प्रदेशांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले आढळते. काही भागात शेतीबरोबरच शेतीमालावर आधारित व्यवसाय वाढीस लागलेले आहेत. त्या भागातही लोकसंख्या दाट आढळते.

उदा.: चीनमध्ये यांगत्सीक्यांग, हो-हँग हो, सिकियांग नद्यांचे खोरे, भारतात सतलज, गंगा-यमुना नद्यांचा मैदानी प्रदेश, म्यानमारमधील इरावती नदीचा त्रिभुज प्रदेश, जावा बेटावरील सुपीक सखल क्षेत्र, इजिप्तमधील नाईल इटालीतील पो नदीचे खोरे, पाकिस्तानमध्ये पंजाब प्रांत सिंधू नदीचा त्रिभुज प्रदेश, बांगलादेशात गाळाच्या मैदानी प्रदेशात लोकसंख्या दाट आहे. आयलँड, स्कॉटलँड, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क येथे गहू, बीट, बटाटे, द्राक्षे इतर फळांचे उत्पादन अधिक होते त्यामुळे त्या विभागात लोकसंख्या एकवटली आहे.

पश्चिम युरोपीय देश, ईशान्य संयुक्त संस्थाने आणि आग्रेय कॅनडा, जपान औद्योगिकदृष्ट्या विकसित आहेत. त्यामुळे लोकसंख्या दाट आहे. औद्योगिक विकासामुळेच जपानमधील टोकियो ते नागासाकी, कोरियाचा किनारी प्रदेश सं. संस्थानातील पंचमहा- सरोवरीय प्रदेशात लोकसंख्येची घनता जास्त आहे. भारतात मुंबई, चैन्नई, बंगलोर, कोलकाता, अहमदाबाद, औरंगाबाद, पुणे या शहरांमध्ये औद्योगिक व्यापारी क्षेत्रामुळे लोकसंख्या घनता जास्त आहे.

) मध्यम लोकवस्तीचे प्रदेश (Medium Populated Regions)

जगातील काही प्रदेशांमध्ये लोकसंख्या फारच विरळ किंवा दाट नसते. असे प्रदेश सामान्यपणे विरळ लोकसंख्या दाट लोकसंख्या यांच्यामधील संक्रमणावस्थेत असतात. सर्वसाधारणपणे ज्या प्रदेशांमध्ये लोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी. क्षेत्रात ५० ते २०० या दरम्यान असते. त्या प्रदेशांचा समावेश मध्यम लोकवस्तीच्या विभागात केला जातो. अशा प्रदेशांमध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय असतो. काही प्रदेशात पशुपालन व्यवसायही केला जातो.

यात मध्य संयुक्त संस्थान, दक्षिण कॅनडा, मध्य चीन, भारतातील दख्खनचे पठार, पूर्व ब्राझील, मध्य चिली, युरोपचा पूर्व भाग, आफ्रिकेचा मध्य कटिबंधीय प्रदेश, दक्षिण मेक्सिको इत्यादी प्रदेशांचा समावेश होतो.यापैकी आशियाई क्षेत्रात कृषी व्यवसाय करणारी ग्रामीण लोकसंख्या अधिक आहे. पूर्व युरोपीय क्षेत्रात कृषी क्षेत्र अधिक असून, पश्चिम युरोपीय क्षेत्राच्या तुलनेत औद्योगिकरण कमी झालेले आहे. ब्राझिल, चिली या भागात समुद्र किनारपट्टीने लोकसंख्या केंद्रित झालेली आढळते.  तर आफ्रिकेतील अल्जीरिया इतर मध्य कटिबंधीय प्रदेशात कृषी, व्यापार इतर सेवा यामुळे मध्यम स्वरुपाची लोकवस्ती आढळते.


) विरळ लोकवस्तीचे प्रदेश (Sparsely Populated Regions):

ज्या प्रदेशामध्ये दर चौ.कि.मी. क्षेत्रात ५० व्यक्तीपेक्षाही कमी व्यक्ती राहतात त्या प्रदेशांचा समावेश विरळ लोकवस्तीच्या विभागात केला जातो.अत्यंत प्रतिकूल हवामान असणारे प्रदेश, अति उष्ण वाळवंटी प्रदेश, अति शीत हवामानाचे बर्फाच्छादित ध्रुवीय प्रदेश, अति उष्ण दमट हवामानाचे विषुववृत्तीय प्रदेश, अति जास्त अति अल्प पर्जन्यमानाचे प्रवेश, उंच पर्वतीय प्रदेश विरळ लोकवस्तीचे आहेत. कारण असे प्रदेश मानवी आरोग्य विकासाच्या दृष्टीने प्रतिकूल असतात.विरळ लोकवस्तीचे प्रदेश खालील चार प्रकारांत सांगता येतील.

१) उष्ण वाळवंटी प्रदेश

)अती शीत बर्फाच्छादित प्रदेश

)उंच पर्वतीय प्रदेश

)उष्ण सदाहरित विषुववृत्तीय अरण्याचे प्रदेश

उष्ण वाळवंटी प्रदेश :-

आफ्रिकेतील सहारा कलहारी, पश्चिम ऑस्ट्रेलियातील वाळवंटी प्रदेश, उत्तर अमेरिकेतील कोलोरॅडो, दक्षिण अमेरिकेतील अटाकामा, आशियातील अरेबियन थरचे वाळवंट या प्रदेशांमध्ये अती जास्त तापमान, वालुकामय मृदा, अत्यल्प पर्जन्य, पाण्याचे दुर्भिक्ष्य इत्यादी प्रतिकूल परिस्थितीमुळे लोकसंख्या विरळ आढळते.

अती शीत बर्फाच्छादित प्रदेश

जगातील सर्वच बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये विरळ लोकसंख्या आढळते. अति थंड हवामान, जीवनावश्यक सुविधांचा अभाव यामुळे लोकसंख्या फारच अल्प आढळते. अंटार्क्टिका बर्फाच्छादित खंड निर्मनुष्य आहे. उत्तर कॅनडा, अलास्का, ग्रीनलंड उत्तर ध्रुवीय प्रदेशात अल्पशा प्रमाणात लोकसंख्या आढळते. ग्रीनलँडमध्ये तर दर ८० चौ.कि.मी. क्षेत्रात व्यक्ती आढळते.

उंच पर्वतीय प्रदेश

एकंदरीत सर्वच बाबतीत प्रतिकूल परिस्थितीमुळे उंच पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते. हिमालय, अलास्का, रॉकीज, अँडीज, मध्य आशियातील पर्वतीय प्रदेश कमी लोकसंख्येचे आहेत. साधारणतः २५०० मीटरपेक्षा अधिक उंचावरील प्रदेशात लोकवस्ती जवळजवळ नसतेच, काही अपवाद वगळता उदा. भारतातील पहेलगाम गुलमर्ग (२६०० मी.) लेह (४६०० मी.) तिबेटामधील ल्हासा (३३५० मी).

सदाहरित विषुववृत्तीय अरण्याचे प्रदेश

या प्रदेशातही लोकसंख्या फारच विरळ आहे. उष्ण दमट हवामान, घनदाट जंगल, उपद्रवी कीटकांचा प्रादुर्भाव, त्से-त्से माशांचा उपद्रव, रोगट हवामान अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे लोकसंख्येची घनता फारच कमी आढळते. उदा. मेझॉ कांगो नदीचे खोरे, आग्रेय आशियातील बेटे (जावा सोडून) इत्यादीचा समावेश या विभागात होतो. अशा प्रकारे लोकसंख्येच्या घनतेनुसार लोकसंख्येचे जागतिक वितरण झालेले आढळते.

भारतातील लोकसंख्येचे वितरण (घनता)

लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो. आज भारताची लोकसंख्या १४४ कोटींच्या आसपास आहे. पण ही लोकसंख्या देशाच्या सर्व भागात सारखी विभागली गेली नाही. काही भागात ती जास्त तर काही भागात ती कमी असलेली आढळते. कारण भारताच्या लेकसंख्येच्या वितरणावर भूरचना, हवामान, जमीन, जलसिंचन, वाहतूक, उद्योगधंदे इत्यादी घटकांचा परिणाम झालेला आहे.

घनतेच्या आधारावर भारताची कमी घनता असलेले प्रदेश, मध्यम घनता असलेले प्रदेश जास्त घनता असलेले प्रदेश अशा प्रमुख तीन भागात विभागणी केली जाते.

१.      विरळ लोकवस्तीचे प्रदेश (कमी घनतेचे प्रदेश): भारताच्या काही भागात लोकवस्ती विरळ असून या भागात लोकसंख्येची घनता कमी आहे. भारतातील कमी घनता असलेली राज्ये पुढीलप्रमाणे आहेत. उदा. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालैंड, मणिपूर, त्रिपुरा इ. वरील राज्यात सरासरी दर चौ. कि.मी. ला १०० पेक्षा कमी लोक राहतात. वरील राज्यांच्या काही भागात दर चौ. कि.मी. ला ५०, काही भागात २५ तर काही भागात दर चौ. कि.मी.ला २५ पेक्षा कमी लोक राहतात.

वरील राज्यांत लोकसंख्येची घनता कमी असण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

) या राज्यांचा (राजस्थान वगळता) बहुतेक भाग उंच-सखल आहे. राजस्थानचा बराच मोठा भाग वाळवंटी आहे.

) जम्मू-काश्मीर हिमाचल प्रदेशाचे हवामान थंड आहे. हिवाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होते. राजस्थानचे हवामान उष्ण, कोरडे तर ईशान्येकडील मेघालय, आसाम वगैरे राज्यांचे हवामान उष्ण दमट आहे.

) या राज्यांचा विशेषतः ईशान्येकडील राज्यात घनदाट जंगले आढळतात.

) वरील काही राज्यांचा बराच भाग दुर्गम आहे.

) वरील राज्यांत वाहतुकीच्या साधनांची विशेष प्रगती झालेली नाही.

) शेती औद्योगिकदृष्ट्या ही राज्ये मागासलेली आहेत.

वरील राज्यांत लोकसंख्येची घनता कमी असली तरी या राज्यांच्या काही भागात लोकसंख्येची धनता थोडी जास्त आढळते. यात राजस्थानच्या पूर्वकडील भागात शेती, उद्योगधंदे वाहतुकीच्या साधनांचा थोडा विकास झालेला आहे. आसामच्या ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात जमीन सुपीक असून येथे भात शेती चहा बागायती शेतीचा विकास झालेला आहे. शिवाय येथे खनिज तेलाचे उत्खनन होते. त्यामुळे येथे लेकसंख्येची घनता अधिक आहे.

) मध्यम लोकवस्तीचे प्रदेश (साधारण घनता असलेले प्रदेश):

भारताचे काही भाग मध्यम लोकवस्ती असलेले आहेत. या भागात साधारण (मध्यम) घनता आढळते. यात भारतीय द्वीपकल्पांचा (पूर्व-पश्चिम किनारपट्टी वगळून) समावेश होतो. यात पुढील राज्ये प्रमुख आहेत.

उदा.  महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश,आंध्र प्रदेश या राज्यात सरासरी दर चौ. कि.मी. ला १००-३५० लोक राहतात. या राज्यांच्या काही भागात लोकसंख्येची घनता ४०० ५०० इतकी आढळते. काही शहरे त्यांच्या आसपास लम्कसंख्येची घनता .चौ. कि. मी. ला १००० पर्यंत आढळते. उदा. अहमदाबाद, सुरत, भोपाळ, मुंबई, नागपुर, पुणे, हैदराबाद, बंगलोर इत्यादी शहरे. मुंबई येथे तर . चौ. कि.मी. ला २००० पर्यंत लोक राहतात; परंतु काही मोठी शहरे वगळता बहुतेक भागात लोकसंख्येची घनता कमी आढळते.


वरील राज्यात मध्यम (साधारण) घनता असण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

) या राज्यांचा डोंगराळ भाग वगळता बहुतांश भागाची प्राकृतिक रचना मानवी वस्तीला अनुकूल आहे.

) येथील हवामान मानवी जीवनास अनुकूल आहे.

) येथील जमीन लाव्हापासून बनलेली असून सुपीक आहे.

) या राज्यात थोड्या प्रमाणात खनिजे सापडतात. उदा. गुजरातमध्ये खनिज तेल, छत्तीसगडमध्ये दगडी कोळसा, मध्य प्रदेशात दगडी कोळसा, मॅगनीज, अशुद्ध लोखंड इत्यादी.

) येथे वाहतुकीच्या मार्गाचा विकास झालेला आहे.

) सुपीक जमिनीमुळे येथे शेतीची प्रगती झालेली आहे.

) येथे उधोगधध्यांची बरीच प्रगती झाली आहे.

एकंदरीत, या विभागात शेतीमुळे येथे लोकसंख्येची घनता मध्यम स्वरूपाची आहे.

) दाट लोकवस्तीचे प्रदेश (जास्त घनता असलेले प्रदेश):

भारताच्या भागात लोकसंख्येची घनता खूप आहे. यात पुढील प्रदेशांचा समावेश होतो. गंगेचे खालचे मैदान,  गंगेचे वरचे मैदान, पंजाबचे मैदान, मलबार किनारा, पूर्व किनारपट्टीचे प्रदेश यात पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, पंजाब, हरियाणा, केरल तामिळनाइ, आंध प्रदेश ओरसा या राज्यांचा समावेश होतो. वरील भागात दर चौ. कि.मी. सरासरी ३५० पेक्षा अधिक लोक राहतात. काही भागात दर चौ.कि.मी.ला५००, काही भागा १००० तर काही भागात दर चौ. कि. मी. ला १५०० पेक्षा अधिक लोक राहतात. वरील राज्यातील नद्यांच्या खोऱ्यात किनारपट्टीच्या मैदानात लोकसंख्येची घनता जास्त आढळते. येथी कोलकाता, दिल्ली चेन्नई या महानगरात त्यांच्या आसपास लोकसंख्येची घनता खूप आहे.

वरील भागात लोकसंख्येची घनता जास्त असण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत

) या प्रदेशातील प्राकृतिक रचना मानवी वसाहतीस अनुकूल आहे.

) येथील हवामान मानवी जीवनास अनुकूल आहे.

) येथील जमीन गाळापासून बनलेली असून येथे जलसिंचनाच्या सोई आहेत. त्यामुळे येथे शेतीचा विकास झालेला आहे.

) या प्रदेशाच्या काही भागात खनिजांचे उत्खनन होते.

) येथे वाहतुकीच्या मार्गांचा विकास झालेला आहे.

) येथे विविध उद्योगांची प्रगती झालेली आहे. एकंदरीत, या विभागात शेतीमुळे लोकसंख्येची घनता जास्त आढळते.

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक(Factors influencing distribution of Population) :

पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी केवळ .% क्षेत्र मानवी वसाहतीसाठी योग्य आहे. त्यातील फारच थोड्या प्रदेशात सर्व बाबतीत अनुकूलता आहे. एकंदरीत जगात लोकसंख्येचे वितरण अत्यंत विषम आढळते.

´ सामान्यपणे मानवी जीवनासाठी अनुकूल परिस्थिती असलेल्या प्रदेशांमध्ये दाट लोकसंख्या आढळते तर प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या प्रदेशांमध्ये फारच विरळ लोकसंख्या आढळते. काही प्रदेश तर निर्मनुष्य आहेत. उदा. अंटार्क्टिका खंड, उत्तर ध्रुवीय प्रदेश .

´ पृथ्वीवर आढळणाऱ्या विषम भौगोलिक परिस्थितीमुळे लोकसंख्येचे वितरणही विषम झालेले आहे.

´ एकूण भूभागापैकी सुमारे ७०% प्रदेश निर्मनुष्य आहे, तर भूभागाच्या ३०% प्रदेशात जगातील लोकसंख्या आढळते.

´ २० ते ५० उत्तर अक्षवृत्तीय सुमारे ८०% लोकसंख्या आढळते, तर संपूर्ण दक्षिण गोलार्धात जगातील सुमारे २०% पेक्षा कमी लोकसंख्या आहे.

´ जगात लोकसंख्येचे असमान वितरणास केवळ नैसर्गिक घटकच जबाबदार नाहीत, तर मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या नैसर्गिक घटकांबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय इतर घटकांचाही लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो.

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे विविध घटक खालीलप्रमाणे;

प्रस्तावना -

लोकसंख्या ही एक साधनसंपदा मानली जाते. लोकसंख्येच्या गुणात्मक संख्यात्मक माहितीच्या आधारे कोणत्याही देशाचे नियोजन करणे सोपे जाते. कोणत्याही देशाची लोकसंख्या त्या त्या देशाची प्रगतीतील एक प्रेरक शक्ती असते. संपूर्ण पृथ्वीवर लोकसंख्येचा विचार केल्यास लोकसंख्येचे वितरण हे विषम आहे, आणि त्यातूनही स्थळ कालपरत्वे भिन्नता दिसून येते.

लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक

भौगोलिक घटक

आर्थिक घटक

सामाजिक घटक

धार्मिक घटक

राजकीय घटक  

1. भौगोलिक घटक

भौगोलिक घटकाचा लोकसंख्येच्या वितरणावर फार मोठा परिणाम होतो.यामध्ये प्रामुख्याने भूरचना, हवामान, भौगोलिक स्थान, जलसंपदा, खनिजे, जंगले . घटकांचा लोकसंख्या वितरणाशी जवळचा संबंध येतो.

.भुमिस्वरूपे

पृथ्वीच्या पृष्टभागाचे स्वरूप सर्वत्र सारखे नाही. पर्वतमय प्रदेश, उंच सखल दर्या, तीव्र उतार, कडे, घळ्या . भूरुपे दिसून येतात.

) पर्वत

     सामान्यपणे पर्वतीय प्रदेश मानवी वसाहतीसाठी अनुकूल नसतात. थंड तापमान , घनदाट जंगले, वाहतूक दळणवळण समस्या, तीव्र उतार, पाण्याची कमतरता, शेती योग्य जमीनीचा अभाव . प्रतिकूल घटकांमुळे लोकसंख्येचे प्रमाण कमी असते. उदा.भारतातील हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली, विंध्य पर्वत तर उत्त अमेरिकेतील  रॉकीज, दक्षिण अमेरिकेतील न्डीज पर्वत .पर्वततीय प्रदेशात लोकसंख्या खूप कमी आढळते.तर काही पर्यटन स्थळांच्या विकासामुळे लोकसंख्या पर्वतीय भागामध्ये जास्त दिसून  येते. उदा.महाबळेश्वर, नैनिताल, शिमला, मसुरी .ठिकाणी लोकसंख्येचे केंद्रीकरण आढळते.

. भौगोलिक स्थान-

महासागर समुद्राच्या जवळचे स्थान मानवी विकासाला अनुकूल असल्यामुळे अशा प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण आढळून येते. कारण या भागात शेती, व्यापार, दळण वळण . चा विकास झालेला असल्यामुळे लोकसंख्या अधीक दाट आढळते.

उदा.जपानच्या एकूण लोकसंखेच्या ७० टक्के लोक किनार्यालगतच्या प्रदेशात राहतात.अनुकूल हवामान, सुपीक मृदा, पाण्याची उपलब्धता, जलससंचनाचा विकास, सपाट प्रदेश, वाहतुकीचे जाळे, बारमाही  ऋतुमांनानुसार वाहणाया नद्यांची खोरी . घटकांमुळे मैदानी प्रदेशात लोकसंख्या जास्त आढळतेजगातील ९०% लोक मैदानी प्रदेशात राहतात.

. हवामान-

हवामान या घटकांमध्ये तापमान, पर्जन्य, आद्रता, . हवेतील घटक मानवी जिवनावर परिणाम करतात.

)तापमान -

अती थंड किवा अती जास्त तापमान प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते. उदा. पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे तापमान जास्त असल्यामुळे हा प्रदेश मानवी आरोग्यासाठी प्रतिकूल मानला जातो. उदा. थर, कलहरी, सहारा, अरेबिया . वाळवंटी प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते. तसेच ग्रीनलंड, उत्तर रशिया . थंड हिामानाच्या प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते

) पर्जन्य

अती पर्जन्य जास्त उष्णता तसेच असत थंड प्रदेश मानवी जीवनाच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीने निरुपयोगी ठरतात. मोसमी हवामानाच्या प्रदेशात पर्जन्य वितरण मानवी जीवनासाठी अनुकूल असल्यामुळे भारतीय उपखंडात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात केंद्रीत झाली आहे.

. जलसंपदा -

मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उद्योगधंद्याच्या विकासासाठी पाण्याचे अतिशय महत्व आहे. नद्या, सरोवरे, तळे, धरणे . ठिकाणी लोकसंख्या दाट स्वरुपात आढळते.

उदा. भारतातील उत्तर भारतीय मैदानी प्रदेश तर ज्या भागात पाण्याची उपलब्धता अतिशय कमी आहे त्या भागात शेती व्यवसाय विकसित होत नाही याचा परिणाम तेथील लोकसंख्येवर होताना दिसून येतो.

. मृदा

जेथे सुपीक मृदा आढळून येते तेथे शेती व्यवसाय विकसित होतो अशा प्रदेशात शेतीवर आधारित प्रक्रिया करणारे उद्योग धंदे विकसित होतात. नद्यांच्या खोऱ्यात सुपीक गाळाची मृदा असल्याने (गंगा,गोदावरी,यमुना .) लोकसंख्येची घनता जास्त आढळते.

. जंगले

ज्या ठिकाणी जंगलाची वाढ दर्जा चांगला असतो त्या ठिकाणी अनेक व्यवसाय होतात साहजिकच अशा ठिकाणी लोक आकर्षित होतात म्हणून ज्या ठिकाणी वनस्पती जीवन समृध असते अशा ठिकाणी लोकसंख्या अधिक असते.

. खनिजे -

औद्योगिक क्रांतीनंतर खनिजांचा वापर वाढल्याने अशा ठिकाणी खाणकाम व्यवसाय सुरु झाल्याने तेथे स्थानिक रोजगार उपलब्ध झाला, त्यामुळे लोकवस्ती वाढताना दिसून येते. मध्य पूर्वेकडील देश तेल उत्पादन मिळवण्यात अग्रेसर असल्यामुळे तेथे लोकसंख्येची घनता जास्त आहे.

.आर्थिक घटक 

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे आर्थिक घटक खालीलप्रमाणे आहेत;

. औद्योगीकीकरण -

औद्योगीकीकरणाचा विकास झाल्यावर अनेक प्रकारचे कारखाने सुरु झाले. त्यामुळे कुशल अकुशल मजुरांची गरज भासू लागली. त्यामुळे आसपासच्या प्रदेशातील लोक मोठ्या प्रमाणात कामासाठी येऊ लागली. त्यामुळे औद्योगिक केंद्राजवळ दाट लोकवस्ती निर्माण झालेली दिसून येते.

उदा.भारतातील मुंबई पुणे नाशिक विभाग आणि जगातील . अमेरिकेचा ईशान्य भाग, वायव्य युरोप, रशियाचा उरल युक्रेन भाग,जपानमधील होन्शू बेट

. वाहतूक दळणळण

जिथे वाहतूक दळणळणचा विकास झालेला असतो तेथे वाहतूक दळणळणची साधने भरपूर असतात. मैदानी प्रदेशात पक्के रस्ते, जलमार्ग, लोहमार्ग, राष्ट्रीय राज्य मार्ग मोठ्या प्रमाणात विकसित होतात. त्यामुळे मैदानी प्रदेशात या प्रकारच्या सुविधा असल्यामुळे लोकवस्ती जास्त आढळून येते.

उदा.भारतातील मुंबई (३३४७२८), कोलकता (२४०००) ,चेन्नई (२६९०३) दर चौ. कि.मी.इतकी घनता आहे. जगातील न्यूयार्क, वाशिंग्टन, मोनट्रीयल, लंडन, ग्लासगो, टोकियो . वरील शहरात वाहतूक दळणळणचा विकास जास्त झालेला आहे, त्यामुळे लोकसंख्या दाट घनता जास्त आहे.

. जलसिंचन 

भारतातील पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र पठार .भागामध्ये जलसिंचनाच्या सुविधांमुळे शेतीचा व्यवसाय विकसित झाल्यामुळे लोकवस्ती वाढलेली आहे.

. तंत्रज्ञानाचा प्रसार

ज्या प्रदेशात तंत्र ज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्या प्रदेशात लोक आकर्षित होतात.उदा. भारतातील मुंबई, पुणे, बेंगळूर, चेन्नई, दिल्ली कोलकता, नोइडा, गुडगाव, कानपुर .जगातील यू.एस.. जपान, पश्चिम युरोपीय देश, जावा, . शहरांच्या लोकसंख्येत अलीकडच्या काळात आय.टी. क्षेत्रात वाढ झाल्यामुळे अशा शहरात लोकसंख्या जास्त दिसून येते.

५.नागरीकरण

कोणत्याही शहरामध्ये औद्योगिक व्यापारी क्रिया मोठ्या प्रमाणात चालत असल्यामुळे रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होतात संर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतात. याचा परिणाम शहरामध्ये लोकसंख्या जास्त घनता दाट दिसून येते.उदा. कारखाने, शाळा, बँका, करमणूक केंद्रे, संशोधन संस्था, शासकीय कार्यालये, आर्थिक सामाजिक संस्था, . भागात लोकसंख्या जास्त घनता दाट दिसून येते.

.मजुरीचे दर -

 ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मजुरीचे दर जास्त असतात पैसा कामावण्याची संधी जास्त प्रमाणात उपलब्ध होतात. उदर्निर्वाहासाठी कोणतेही काम अथवा धंदा केले तरी शहरात काम मिळते. प्रत्येकाला शहरात आपले कौशल्य प्रगट करण्याची संधी मिळते. श्रमिकला मात्र कोणत्याही कामाची काम करण्याची लाज वाटू नये.

.सामाजिक घटक

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे सामाजिक घटक खालीलप्रमाणे आहेत;

. कुटुंबाचा आकार -

काही देशात कुटुंबाचा आकार जेवढा मोठा तेवढ्या प्रमाणात ते कुटुंब श्रीमंत गौरवशाली मानले जाते. म्हणून लोकसंख्या जास्त प्रमाणात राहील तेवढी कुटुंबाची प्रगती होईल अशा आशेने जास्त अपत्याना जन्म देण्याकडे कल वाढत असल्याने लोकसंख्या वाढत जाते. याचा  परिणाम  कुटुंबाचा आकार वाढत जाऊन लोकसंख्याही  वाढत  जाते.

. सामाजिक रूढी परंपरा

काही देशात सामाजिक रूढी परंपरा इतक्या रूढ झाल्या दिसतात कि, कुटुंबात एक तरी मुलगा असावा म्हणून मुली असल्या तरी कुटुंबास वारस असावा म्हणून पुत्रप्राप्ती होईपयंत अपत्यांना जन्म दिला जातो.

. सामाजिक बंधने

काही देशात किवा काही धर्मात विवाह झाल्यानंतर अपत्याना जन्म दिलाच पाहिजे अशी बंधने घातल्याने लोकसंख्या वाढत जाते. विविध जाती धर्मातील सामाजिक रूढी परपरा त्यांची बंधने समाजावर नियंत्रण करीत असतात. रूढी त्यांची बंधने  अतिशय कडक असतात. ज्यांना अशी बंधने मान्य नसतात असे लोक सुरक्षित सोईच्या ठिकाणी स्थलांतर करतात.

. विवाहाचे वय -

लोकसंख्या वाढ विवाहाचे वय यांचा जवळचा संबंध आहे. ज्या देशात विवाह लवकर होतात अशा देशांत लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. कारण प्रजोत्पादनाचा कालावधी जास्त मिळाल्याने जन्मदरही जास्त असतो.

. शिक्षण -

ज्या देशात शिक्षणाचा प्रसार झालेला आहे अशा प्रदेशात शिक्षण घेत असल्याने वयोगटही वाढत जातो, परिणामी लोकसंख्या कमी प्रमाणात वाढते. याउलट ज्या देशात शिक्षणाचा प्रसार झालेला नाही अशा प्रदेशात लोकसंख्या जास्त प्रमाणात वाढत जाते.

. बाल विवाह :

हिंदू धर्मातील बाल विवाह मुले ही देवाची देणगी मानण्याची रूढी मुलगा वंशाचा दिवा मानण्याची प्रथा

. धार्मिक घटक

. बहुपत्नीत्वाची पद्धत -

अनेक देशांमध्ये बहुपत्नीत्वाची पद्धत प्रचलित असल्याने तेथे लोकसंख्या जास्त प्रमाणात दिसून येते. उदा. पाकीस्तान, बांग्लादेश . मुस्लिम धर्मातील बहुपत्नीत्व याचाही प्रभाव लोकसंख्या वाढीवर होत असतो. आफ्रिकेतील अनेक पत्नीत्वाच्या चालीरीतीमुळे लोकसंख्या वाढ झालेली दिसून येते.

२.विधवा विवाह पद्धत

ज्या धर्मात विधवा विवाह पद्धत प्रचलित आहे तेथे पुनर्विवाह करतात त्यामुळे पुन्हा अपत्य प्राप्ती होत असल्याने लोकसंख्या वाढते.

. धार्मिक छळ

एखाद्या प्रदेशात विशिष्ट  समुदायाचा मानसिक किवा शारीरिक छळ होत असेल तर अशा भागातून हा समुदाय स्थलांतर करतो लोकसंख्या कमी होते.

. राजकीय घटक -

. सरकारी धोरण शासन व्यवस्था -

काही वेळेस अचानक राजकीय घटना घडत असतात त्याचा परिणाम लोकसंख्या वाढीवर होतो. उदा. औद्योगिक धोरणामुळे उद्योगांच्या विकेंद्रीकरणासाठी नविन औद्योगिक प्रदेश सेझ सारखे प्रकल्प उभे केले जात आहे या कारणामुळेही प्रत्येक्ष अप्रत्येक्षरित्या लोकसंख्या वितरणावर परिणाम होतो.

. फाळणी -

बांग्लादेश युद्धाच्या वेळी भारत सरकारने अनेकांना ईशान्य भारतात आश्रय दिल्याने तेथील लोकसंख्या वाढलेली दिसून येते. तसेच भारत सरकारने त्याना तामिळनाडू राज्यातही आश्रय दिल्याने लोकसंख्या वाढताना दिसून येते.

. विकेंद्रीकरण -

काही वेळेस सरकार एखाद्या लोकसंख्येतील ताण कमी करण्यासाठी विकेंद्रीकरणाचे धोरण जाहीर करते त्यामुळे ज्या प्रदेशात लोकसंख्या कमी आहे अशा प्रदेशात लोकांना जाण्यासाठी कायम स्वरूपी स्थायिक करण्यासाठी सवलती जाहीर करतात.

अतिरिक्त  लोकसंख्या आणि त्याचे परिणाम (Over Population):

अतिरिक्त लोकसंख्या (Over Population): जेव्हा देशाची लोकसंख्या उपलब्ध साधनसंपत्तीपेक्षा जास्त असते तेव्हा त्यास 'अतिरिक्त लोकसंख्या' म्हणतात. अतिरिक्त लोकसंख्या असलेल्या देशात साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. त्यामुळे देशातील साधनसंपत्तीवर ताण पडतो. भारत चीन या देशांची लोकसंख्या ही अतिरिक्त समजली जाते.

अतिरिक्त लोकसंख्येच्या समस्या (दोष-तोटे):

अतिरिक्त लोकसंख्येच्या काही समस्या पुढीलप्रमाणे आहेत.

) साधनसंपत्तीवर ताण देशाची लोकसंख्या जेव्हा अतिरिक्त होते तेव्हा उपलब्ध साधनसंपत्ती कमी पडते, म्हणून साधनसंपत्तीवर ताण पडतो.

) जमिनीच्या उत्पादकतेत घट शेतकरी अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जमिनीचा कस कमी होऊन तिची उत्पादकता कमी होत असते.

) अपुरे अन्नधान्य : देशात लोकसंख्येच्या मानाने अन्नधान्याचे उत्पादन कमी होते; त्यामुळे लोकांना अन्नधान्य अपुरे पडते.

) दरडोई उत्पन्नात घट : देशातील साधनसंपत्ती त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्न जास्त लोकांत वाटले गेल्याने दरडोई उत्पन्नात घट होते.

) कमी प्रतीचे जीवनमान : अतिरिक्त लोकसंख्येमुळे देशांत दारिद्र्याचे प्रमाण वाढून लोकांचे जीवनमान कमी होते.

) बचतीचे कमी प्रमाण अतिरिक्त लोकसंख्या अपुरे उत्पादन यामुळे देशांत बचतीचे प्रमाण कमी असते.

) ग्रामीण-नागरी स्थलांतर अतिरिक्त लोकसंख्या असलेल्या देशांत बहुतांश लोक ग्रामीण, भागात राहतात. ग्रामीण भागात लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे लोकांचे शहराकडे स्थलांतर होते.

) वाढते नागरीकरण : लोकसंख्येचे शहराकडे स्थलांतर होत असल्याने शहरांची लोकसंख्या वाढून नागरीकरण होऊ लागते. त्यामुळे मोठ्या शहरात झोपडपट्ट्या निर्माण होतात.

) वाढती बेकारी : जास्त लोकसंख्येमुळे लोकांना रोजगार नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत; त्यामुळे बेकारी वाढत जाते.

१०) घरांचा प्रश्न : अतिरिक्त लोकसंख्येमुळे देशात घरांचा प्रश्न बिकट होतो. मोठ्या शहरांत अनेक लोक उघड्यावर राहतात.

११) वाहतुकीच्या समस्या विशेषतः मोठ्या शहरांत जास्त लोकसंख्या, गर्दी, इत्यादींमुळे वाहतुकीची समस्या बिकट बनते.

१२) आवश्यक सेवांचा अभाव जास्त लोकसंख्येमुळे लोकांना आरोग्य, शिक्षण, पाणी वीजपुरवठा इत्यादी सेवा अपुऱ्या पडतात.

१३) प्रदूषण : प्रदूषण ही अतिरिक्त लोकसंख्येची एक महत्त्वाची समस्या आहे.

अतिरिक्त लोकसंख्येचे फायदे (गुण)

अतिरिक्त लोकसंख्येच्या काही समस्या असल्या तरी या लोकसंख्येचे काही फायदेही आहेत.

) मजुरांचा पाठपुरावा अतिरिक्त लोकसंख्येमुळे देशात मोठ्या प्रमाणात मजूर उपलब्ध होतात.

) उद्योगधंद्यांत वाढ : देशात मोठ्या प्रमाणात मजूर उपलब्ध होऊ लागले म्हणजे निरनिराळ्या उद्योगांची प्रगती होते.

) विस्तृत बाजारपेठ : बाजारपेठ लोकसंख्येवर अवलंबून असल्याने अतिरिक्त लोकसंख्येच्या देशात मालाला मोठी बाजारपेठ असते.

) सैन्य उभारणी : लोकसंख्या ही एक शक्ती आहे. तिचा उपयोग संरक्षणासाठी होतो; म्हणून सैन्य उभारणीसाठी लोकसंख्या आवश्यक असते. या दृष्टीने लोकसंख्येला महत्त्व आहे.

 

लोकसंख्येची  वैशिष्ये जन्मदर , मृत्युदर,  घनता आणि साक्षरता

जन्मदर जन्मदराचे प्रकार (Measures of Fertility)

.ढोबळ जन्मदर

.साधारण जन्मदर

.वयसापेक्ष जन्मदर

.एकून जन्मदर

.स्थूल प्रजनन दर

1)    ढोबळ जन्मदर (crude birth rate)

      एखाद्या विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट वर्षातील एक हजार लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या जिवंत अर्भकांची संख्या म्हणजे ढोबळ जन्मदर होय.

        खालील सूत्राचा वापर करून ढोबळ जन्मदर काढता येतो.

Formula-         C.B.R. = B/P*K

                         C.B.R. - ढोबळ जन्मदर

                         B - एका वर्षातील जीवित्त अर्भकांची एकूण संख्या

                         P - त्याच वर्षाची मध्यवर्षीय एकूण लोकसंख्या

                                K   - १०००

     एखाद्या वर्षाची मध्यवर्षीय लोकसंख्या जाणून घ्यायची असल्यास त्या वर्षाच्या सुरुवातीची लोकसंख्या वर्षअखेरची लोकसंख्या यांची बेरीज करून त्या बेरजेला ने भागावे.

        ढोबळ जननदर हा जनन परिमाण म्हणून फारसा उपयुक्त नाही.

        कारण यात एकूण लोकसंख्या विचारात घेतली जाते की ज्यात जननक्षम जननक्षम नसलेल्या सर्वच व्यक्तींचा समावेश होतो.

        ढोबळ जन्मदर काढताना छेदस्थानाच्या संख्येत (P) मध्ये पुरुष, १५ वर्षापेक्षा वय कमी असलेल्या मुली अप्रजोत्पादक स्त्रिया या सर्वांचाच अंतर्भाव होतो. प्रत्यक्षात अपत्याला फक्त स्त्रीच जन्म देऊ शकते तेदेखील विशिष्ट अशा वयोगटातच (साधारणपणे १५ ते ४९ या वयोगटात) त्यामुळे १५ ते ४९ या वयोगटातील स्त्रिया इतर वयोगटातील स्त्रिया यांचाही समावेश पुरुषांचा समावेश एकूण लोकसंख्येत असल्याने ढोबळ जन्मदर काढताना एकूण लोकसंख्या विचारात घेत असल्याने तो जनन परिमाण म्हणून उपयुक्त ठरत नाही.

2) साधारण जननदर / सामान्य जननदर (General Fertility Rate)     

साधारण जननदर काढताना प्रजोत्पादक वयोगटातील प्रजननक्षम स्त्रियांचाच विचार केलेला असल्याने ढोबळ जनन दरापेक्षा हा जननदर सुधारित असून याच्या साहाय्याने जननविषयक तुलना करता येते.

साधारण जननदार काढण्याचे सूत्र पुढे दिलेले आहे-

Formula -        G.F.R=B/Pi*K

G.F.R. = साधारण जननदर (General Fertility Rate)

B     = विशिष्ट प्रदेशातील एका वर्षात जन्मलेल्या बालकांची एकूण संख्या

Pi   = त्याच प्रदेशातील १५ ते ४९ या वयोगटातील स्त्रीयांची मध्यवर्षीयएकूण संख्या

                        K     = १०००

        साधारण जननदर काढताना प्रजोत्पादनक्षम वयोगटातील सर्वच स्त्रियांची एकूण संख्या विचारात घेतलेली आहे, पण या गटातील सर्वच स्त्रिया विवाहित नसतात.

        तसेच या वयोगटातील सर्व स्त्रियांची जननक्षमता सारखी नसते. या वयोगटातील स्त्रियांमध्ये काही स्त्रिया विधवा, घटस्फोटीत वांझ असू शकतात की ज्या प्रजोत्पादन क्रियेत बहुतेक सहभागी होऊ शकत नाहीत. या सर्व शक्यतांचा विचार हा जननदर काढतांना करीत नसल्याने निष्कर्ष तंतोतंत काटेकोर येत नाहीत.

) वयसापेक्ष जननदर (Age Specific Fertility Rate)

          वयसापेक्ष जननदर पुढील सुत्राच्या साहाय्याने काढता येतो.

Formula -   A.S.F.R. = bi/pi * K

A.S.F.R. = वयसापेक्ष जननदर (Age Specific Fertility Rate)

bi = विशिष्ट प्रदेशात विशिष्ट वयोगटातील स्त्रियांनी जन्म दिलेल्या अपत्यांची एकूण संख्या

pi = त्याच वयोगटातील स्त्रियांची मध्यवर्गीय संख्या

K = १०००

- वर्षाचे वयोगट करुन वयोगटसापेक्ष जननदर काढतात. जननामध्ये वाढ झाली की घट झाली हे या जननदराचा अभ्यासावरुन कळते. एकाच प्रकारच्या व्यक्तिसमुहातील जननाचा सखोल अभ्यास करणे यामुळे शक्य झाले. वेगवेगळ्या व्यक्तिसमूहातील जननाचा तुलनात्मक अभ्यास करता येतो.

) एकूण जननदार किंवा संपूर्ण जननदर (Total Fertility Rate)

एकूण जननदर काढण्याचे सूत्र;

              n

T.F.R= 5n (bi/pi)*K

   i=

T.F.R. = एकूण जननदर (Total Fertility Rate)

bi = विशिष्ट वयोगटातील स्त्रियांनी एका वर्षात दिलेले जन्म

pi = त्याच विशिष्ट वयोगटातील स्त्रियांची एकूण संख्या

5n = सर्व वयोगटसापेक्ष दरांची बेरीज

5 = वयोगटातील अंतर (वर्षे)

i = वयोगट

K = १०००

) स्थूल प्रजननदर (Gross Reproductive Rate) –

चालू पिढीतील एक हजार मातांमध्ये पुढील पिढीतील मातृत्व योग मुलींचे प्रमाण म्हणजे स्थूल प्रजनन दर होय. स्थूल प्रजनन दराच्या मापनामध्ये फक्त एकूण मुलींचे जन्मप्रमाण विचारत घेतले जाते.स्त्रीच्या जनन काळात ठराविक कालावधीनंतर अपत्यांना जन्म देत असतील तर १००० माता त्यांच्या जननक्षम वयात जेवढ्या भावी मातांना जन्माला घालतात. या दराला स्थूल प्रजननदर असे म्हणतात.

स्थूल प्रजननदर = मातृत्वयोग्य भावी माता/सध्या जननक्षम वयातील १००० माता

उदा. समजा एखाद्या राष्ट्रातील चालू पिढीतील जननक्षम वयातील १००० स्त्रियांनी ५०० मुलींना जन्म दिलेला आहे की ज्या माता होण्याच्या वयापर्यंत पोहोचल्या आहे.

        अशावेळी स्थूल प्रजनन दर = ५००/१००० = . असा येईल.

        याचा अर्थ चालू पिढीतील १००० माता भावी पिढीतील ५०० मातांना जन्म देतात म्हणजे लोकसंख्यावाढीचा दर कमी राहील पण हा दर एकापेक्षा जास्त असेल तर सध्याच्या लोकसंख्यावाढीच्या दरापेक्षा भविष्यकालीन लोकसंख्यावाढीचा दर अधिक राहील.

        जर स्थूल प्रजननदर एक आला तर लोकसंख्यावाढीचा दर स्थिर राहील. लोकसंख्येविषयी भविष्यकालीन अंदाज व्यक्त करण्यासाठी स्थूल प्रजनन दर काढतात.

 जननावर परिणाम करणारे घटक:

) जीवशास्त्रीय घटक (Biological Determinants)

) शरीरशास्त्रीय घटक

) सामाजिक सांस्कृतिक घटक (Socio-Cultural Determinants)

) आर्थिक घटक (Economic Determinants)

) प्राकृतिक घटक (Physical OR Natural Determinants)

)लोकसंख्या शास्त्रीय घटक(Demographic Determinants)

) जीवशास्त्रीय घटक (Biological Determinants):-

) प्रजोत्पादनाचा कालावधी

) वंश

) आहार

) आरोग्य

) शरीरशास्त्रीय घटक

) प्राथमिक वंध्यता

) दुय्यम वंध्यता

) पौगंडावस्थेतील वंध्यता

) प्रसुत्योत्तर वंध्यता

) सामाजिक सांस्कृतिक घटक (Socio-Cultural Determiners)

) शिक्षण

) विवाह वय

) धर्म

) बहुपत्नित्व प्रथा

) अंधश्रद्धा, रुढी परंपरा

) घटस्फोट

) गर्भपाताविषयीचे कायदे

) कुटुंब नियोजनाचा प्रसार

१०) एकत्र कुटुंब पद्धतीचा प्रभाव

११) सामाजिक गतिक्षमता

) आर्थिक घटक (Economic Determinants) :-

) कुटुंब उत्पादन पातळी

) औद्योगिकीकरण

) व्यवसायाचे स्वरुप

) प्राकृतिक घटक - (Natural OR Physical factors):-

     हवामान हा असा एक प्राकृतिक घटक आहे जो जननावर परिणाम करतो. उष्णकटीबंधीय प्रदेशात उष्ण हवामानात मुली लवकर प्रजननक्षम बनतात. त्यामुळे मुलगी विवाहयोग्य झाली असे मानून काही भागांमध्ये तिचा विवाह कमी वयात करुन दिला जातो. मुलींचे विवाह कमी वयात जर होत असतील तर त्यांना प्रजोत्पादनाचा कालावधी जास्त मिळतो. त्यामुळे जननाचा दरसुद्धा वाढतो.

) लोकसंख्याशास्त्रीय घटक (Demographic Factors )

) वयोरचना

) वैवाहिक जीवनकाळ

) लिंगरचना

)स्त्रियांचा श्रमशक्तीतील सहभाग

) मर्त्यता /मृत्यूदर (Mortality) –

मर्त्यता हा लोकसंख्या बदलाचा दुसरा घटक आहे. जननपेक्षा हा भिन्न घटक असू जननापेक्षा अधिक स्थिर आहे. जनन हा सामाजिक लोकसंख्याशास्त्रीय, मानसशास्त्रीय   आर्थिक घटकावर अवलंबून आहे तर मर्त्यता हा जीवशास्त्रीय घटक आहे. व्यक्तीच्या जन्मानंतर जेव्हा व्यक्तीच्या जिवंतपणाचा सर्व पुरावा कायमचा नष्ट होतो तेव्हा त्या घटनेला मृत्यू असे म्हणतात.

जीवित्त जन्म (Live Birth)-

जागतिक आरोग्य संघटनेनुसार व्याख्या(World Health Organization) –

मानवी गर्भधारणेचे फळ निसर्गत: किंवा मानवाद्वारे जेव्हा मातेच्या उदरापासून पूर्णपणे वेगळे होऊन त्या गर्भधारणेच्या फळाने जर श्वसन केले अथवा हृदयाचे स्पंदन केले, नाळेचे अथवा एखाद्या अवयवाची हालचाल करून जिवंत असण्याची लक्षणे दर्शविली तर तो जीवित जन्म (Live Birth) होय."

        गर्भमृत्यू - गर्भधारणा झाल्यानंतर जिवित जन्म होण्याच्या अगोदर त्या गर्भाचा मातेच्या उदरातच मृत्यू झालेला असल्यास त्यास गर्भमृत्यू असे म्हणतात.

        अर्भकमृत्यू - अपत्य जन्म झाल्यानंतर एक वर्षाच्या आत त्याचा मृत्यू झाल्यास त्यास अर्भकमृत्यू असे संबोधतात.

मृत्यूदर मापनाची परिणामे किंवा मर्त्यता प्रमाण ठरविण्याच्या पद्धती :- मर्त्यता प्रमाण ठरविण्याच्या अनेक पद्धती आहेत त्यापैकी काही पद्धती या मृत्यूच्या आकडेवारीवर आधारीत आहेत. त्या पद्धतीखालील प्रमाणे;

(१)  ढोबळ मृत्यूदर (Crude Death Rate)

एखाद्या प्रदेशात वा देशात एका वर्षात १००० लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्यांची संख्या म्हणजे ढोबळ मृत्यूदर.

 सूत्र: ढोबळ मृत्युदर = एका वर्षात मृत्यू पावलेल्याची संख्या / प्रदेशाची एकूण लोकसंख्या  X १०००

उदा. एका प्रदेशातील वर्षात मृत्यूची संख्या ६००० असून त्या प्रदेशाची लोकसंख्या ६००००० असेल तर ; ६०००/,००,००० X १००० = १०    (१००:)

वरील आकडेवारी वरून, दर हजार लोकसंख्या मागे मृत्यू पावलेल्यांची संख्या दर १००० ला १० इतकी आहे. तर ती १०० ला इतकी आहे.

(२)  वय सापेक्ष मृत्युदर (Age Specific Death Rate) -   

एखाद्या प्रदेशातील किंवा देशातील वय सापेक्ष मृत्यूदर हे लोकसंख्येच्या विशिष्ट वयोगटातील वर्षातील मृतांची संख्या त्या वयोगटात असलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात सांगितले जाते.

सूत्र: वयसापेक्ष मृत्युदर = विशिष्ठ वयोगटातील एका वर्षातील मृतांची संख्या / त्या वयोगटाची त्याच प्रदेशातील एकूण लोकसंख्या X १०००

उदा. एका प्रदेशाच्या विशिष्ट वयोगटातील मृतांची संख्या ८००० असून त्या वयोगटात असलेल्यांची लोकांची संख्या ,००,००० आहे.तर, ८००० / ,००,००० X १००० = २० (१००:)

वरील आकडेवारी वरून, दर हजार लोकसंख्या मागे मृत्यू पावलेल्यांची विशिष्ठ वयोगटातील लोकांची संख्या दर १००० ला २० इतकी आहे. तर ती १०० ला इतकी आहे.

(३)  अर्भक मृत्यूदर (Infant Mortality) –

     अर्भकमृत्यूदर हा अर्भकांच्या वयोगटातील संख्या आणि वर्षात मृत्यू पावलेल्या अर्भकांची संख्या या संदर्भात सांगितले जाते.

सूत्र : अर्भकमृत्युदर = वर्षातील मृत अर्भकांची संख्या / अर्भकांच्या वयोगटातील एकूण संख्या X १०००

उदा. एका प्रदेशातील अर्भकांच्या वयोगटातील संख्या ,००,००० असून तेथील वर्षभरात मृत पावलेल्या अर्भकांची संख्या २७,००० आहे.तर, उदा. २७,००० / ,००,००० X १००० = ३० अर्भकमृत्युदर, (१००:)

वरील आकडेवारी वरून, दर हजार अर्भक मृत्यू ३० इतकी आहे. तर ती १०० ला इतकी आहे.

मर्त्यतेवर परिणाम करणारे घटक

१.    वैवाहिक स्थिती (Marital Status)

     वैवाहिक स्थितीचा मर्त्यता दरावर मोठा प्रभाव पडतो. अविवाहितांच्या तुलनेने विवाहित जास्त काळ जगतात. ज्यांचे आरोग्य चांगले असते असे स्त्री-पुरुष विवाह करतात. विवाहितांचे जीवन नियमित असते. ते सुखी समाधानी असतात. म्हणून विवाहितामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असते. याउलट अविवाहितांचे आरोग्य फारसे चांगले नसते. ते स्वैर जीवन जगत असल्याने त्यांच्यातील अनेकांना विविध रोग जडतात. शिवाय त्यांचे जीवन अनियमित असते आणिते सुखी आनंदी नसतात. म्हणून अविवाहितात मर्त्यता प्रमाण जास्त असते. विवाहित स्त्रिया सुखी समाधानी असतात. त्यांना गर्भधारणा, प्रसूती इत्यादी गोष्टींचा अनुभव असल्याने त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण कमी असते. अविवाहित घटस्फोटित स्त्रिया या असमाधानी असतात. त्याचप्रमाणे त्या समाजातील परिस्थितीशी जुळवून घेत नाहीत. म्हणून अशा स्त्रियातही मर्त्यता प्रमाण जास्त असते.

) शिक्षण (Education)

स्त्री-पुरुषाच्या शिक्षणाचा सुद्धा मृत्यूदरावर परिणाम होतो. सुशिक्षित लोकांची आर्थिक स्थिती चांगली असल्याने त्यांचे राहणीमान अशिक्षितापेक्षा उत्तम असते. शिवाय सुशिक्षित लोक स्वच्छता, खाद्य, आरोग्य इत्यादी बाबतीत जागृत असतात. पुरुषांच्या शिक्षणाबरोबर स्त्रीचे शिक्षणही महत्वाचे असते. कारण सुशिक्षित स्त्री घरातील स्वच्छता विषयी जागृत असते. त्यामुळे सुशिक्षितामध्ये मर्त्यता प्रमाण कमी आढळते.

) व्यवसाय (Occupation) –

व्यवसायाच्या प्रकाराचा ही मर्त्यतेवर परिणाम होतो.

·       सामान्यतः बौद्धिक कामे करणाऱ्यापेक्षा (शिक्षक, वकील, इंजिनिअर, डॉक्टर .) शारीरिक कामे करणाऱ्या (कुली, मजूर, खोदाई करणारे, लाकूडतोडे, गवंडी .) लोकांत मर्त्यतेचे प्रमाण अधिक असते.

        बैठे काम करणाऱ्या (मुख्यत: दुकानदार) लोकामध्ये मधुमेह, हृदयविकार, फुफ्फुसांचे आजार यासारख्या आजाराचे प्रमाण जास्त असते.

        तर कोळसा खाण, कापड गिरण्या, प्लास्टिक खतांचे कारखाने, तेलशुद्धीकरण यासारख्या कारखान्यात काम करणाऱ्यात क्षय रोगाचे प्रमाण अधिक असते.

        वाहतूक व्यवसायात असणाऱ्या (ड्रायव्हर) लोकात अपघाती मृत्यूचे प्रमाण जास्त असते.

) ग्रामीण नागरी ठिकाणे (Rural and Urban Places):

  ग्रामीण नागरी क्षेत्रांचा मर्त्यता प्रमाणावर परिणाम होतो.

·       ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी कमी असतात.

·       ग्रामीण भागातील लोक अंधश्रद्धाळू असतात. मात्र येथे खुली स्वच्छ मोकळी जागा, भरपूर अन्नधान्य यांचा लोकांना लाभ मिळतो. तरी ग्रामीण क्षेत्रात मर्त्यता दर जास्त असतो. याउलट शहरी भागात शिक्षण आरोग्याच्या उत्तम सोई असतात. मात्र येथे घरांची दाटी, हवा, ध्वनिप्रदूषण रस्त्यावरील अपघात इत्यादींच्या समस्या असतात. तरी शहरी भागात मर्त्यता प्रमाण कमी असते.कारण रुग्ण वाहिका आणि अन्य वैध्यकीय सुविधा जवळ व पटकन  उपलब्ध होतात.

5. स्वच्छता (Cleanliness)

माणसाच्या जीवनात स्वच्छतेला महत्व आहे म्हणून स्वच्छतेचा मर्त्यतेवर परिणाम होतो. स्वच्छता ही खाद्य, पाणी, वस्त्र, निवारा, आरोग इत्यादी बाबतीत असते. ज्या लोकात स्वच्छता असते त्यांच्यात मर्त्यता प्रमाण कमी असते. शहरात राहणारे लोक स्वच्छतेविषयी अधिक जागृत असतात. त्यामुळे शहरी भागात मर्त्यता कमी असते. उलट ग्रामीण भागातील लोक स्वच्छतेकडे फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात मर्त्यता प्रमाण अधिक असते.

मोठ्या शहरातील झोपडपट्ट्यात (Slums) सांडपाणी मैला वाहून जाण्यास गटारी नसतात. अशा वस्त्यात केरकचरा सर्वत्र टाकला जातो. त्यामुळे दुर्गंधी अस्वच्छता असते. म्हणून झोपडपट्टी सारख्या परिसरात मर्त्यता प्रमाण जास्त असते.

मातृत्वासंबंधीची मर्त्यता (Maternal Mortality) :

        आपणास माहीत आहे की, बऱ्याच स्त्रिया या उपवर होण्यापूर्वी(Pre-mature) मृत्यू पावतात. वयोगटानुसार यांचे प्रमाण कमी अधिक आढळते.

        काही स्त्रिया मात्र बालकास जन्म दिल्यानंतर मृत्यू पावतात. हा महत्त्वाचा विषय आहे.

        मातृत्वासंबंधीच्या मर्त्यतेचे प्रमाण सर्वत्र सारखे नाही.मात्र जेथे हे प्रमाण जास्त आहे त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

) स्त्रियातील शिक्षणाचा अभाव

) स्त्रियातील अंधश्रद्धा

) मातेच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष

) बालविवाह पद्धती

) दोन बालकांच्या जन्मातील कमी अंतर

) स्त्री प्रसूतीच्या(Maternity) अपुऱ्या सोई

) गरोदरपण काळातील स्त्रीतील पौष्टिक पदार्थांचा अभाव

Ø  प्रगत (विकसित) देशात मर्त्यता प्रमाण (मृत्यूदर) कमी असण्याची कारणे :

जगातील प्रगत (विकसित) देशात मृत्यूचे प्रमाण कमी आढळते. यात संयुक्त संस्थाने, कॅनडा, युरोपीय देश, रशिया, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी देशांचा समावेश होतो.या देशात मर्त्यता प्रमाण कमी असण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

१.      उच्च राहणीमान (High Living Standard)

     विकसित देशात उद्योगधंद्यांचा खूप विकास झालेला आहे. येथील प्रत्येक मनुष्य कोणत्या ना कोणत्या उद्योगात गुंतलेला आहे. त्यामुळे येथील दरडोई उत्पन्न जास्त आहे. जास्त उत्पन्नामुळे येथील लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे आहे. उत्तम खाद्य, उत्तम कपडे, उत्तम निवास आणि इतर सर्व प्रकारच्या सुखसोई यामुळे या देशात मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

) शिक्षणाचा प्रसार (Development of Education)

    शिक्षणाचा खूप प्रसार झालेला आहे. येथील अधिकांश लोक सुशिक्षित असून सुस्थितीत जीवन जगणारे आहेत. लोक सुशिक्षित असल्याने ते आपले आरोग्य, स्वच्छता इत्यादी विषयी सतर्क असतात. प्रगत देशात स्त्रियातील शिक्षणाचे प्रमाणही जास्त आढळते. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून येथे मृत्यूदर कमी आहे.

) तृतीयक व्यवसायांचा विकास (Development of Tertiary Activities)

    या देशातील अनेक लोक बौद्धिक स्वरूपाच्या व्यवसायात गुंतलेले आहेत. उदा. शिक्षक, वकील, इंजिनिअर, डॉक्टर यासारख्या व्यवसायांची येथे खूप प्रगती झालेली आहे. यात कष्टाची कामे कमी असतात. एकूण लोकांचे जीवन आरामदायी असते. म्हणून या देशात मृत्युचे प्रमाण कमी आहे.

)नागरीकरण (Urbanization) –

    या देशात उद्योगधंद्याची खूप प्रगती झालेली आहे. येथील प्रत्येक लहानमोठ्या शहरात छोटे मोठे उद्योग असलेले आढळतात. विशेषतः ज्या शहरात उद्योगधंदे, दळणवळण, व्यापार, शिक्षण इत्यादीची अधिक प्रगती झालेली आहे ती शहरे जास्त विकसित झाली आहेत. अशा नागरीकरण झालेल्या ठिकाणी शिक्षणाचे प्रमाण जास्त असते. तेथे सर्व प्रकारच्या वैद्यकीय सोई असतात. लोक सुधारलेले असतात. त्यामुळे अशा ठिकाणी मर्त्यता प्रमाण कमी असते.

)अत्याधुनिक वैद्यकीय सोई (Advanced Medical Facilities) –

प्रगत देशात सर्व प्रकारच्या वैद्यकीय सोई असल्याने येथे आरोग्यविषयक सेवांचा प्रसार झालेला आढळतो. त्यामुळे लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध होतात. शिवाय या देशातून सर्व रोगांचे उच्चाटन झालेले असते. त्यामुळे येथे मर्त्यता प्रमाण कमी आहे.

Ø  अविकसित व विकसनशील देशात मर्त्यता प्रमाण (मृत्यूदर) जास्त असण्याची कारणेः

          जगात आता सर्वत्र प्रगती होत असली तरी अजूनही अनेक देश मागासलेले आहे. मागासलेल्या देशात .अमेरिकेतील काही देश, आफ्रिकेतील बहुतांश देश आणि आशियातील काही देशांचा समावेश आहे.

विकसनशील देशात चीन, भारत, मलेशिया, इंडोनेशिया, इजिप्त, .आफ्रिका, मेक्सिको, क्युबा, ब्राझील, अर्जेंटिना, चिली वगैरे देश अंतर्भूत आहेत. मागास देशात तर मर्त्यता प्रमाण जास्त आहे. शिवाय विकसनशील देशातही मर्त्यतेचे प्रमाण अधिक आहे. याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

)लोकांची गरिबी कमी प्रतीचे जीवनमान (Poverty and Low Living Standard) –

लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा मर्त्यता प्रमाणावर प्रभाव पडतो. सामान्यतः गरीब स्थितीत जीवन जगणारांचे जीवनमान निकृष्ट दर्जाचे असते. म्हणून अशा लोकांत मर्त्यता अधिक असते. मागास देशातील अधिकांश लोक दरिद्री आहेत. विकसनशील देशातही दरिद्री लोकांचे प्रमाण बरेच आहे. त्यामुळे या देशात मर्त्यता प्रमाण विकसित देशांच्या तुलनेने जास्त आहे.

) कुपोषण (Malinutrition) –

लोकांना मिळणारा अपुरा आहार (कुपोषण) हे मागास विकसनशील देशात मर्त्यता प्रमाण जास्त असण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. मागास देशात गरिबीमुळे अनेकांना पुरेसे खाद्य मिळत नाही. आफ्रिकेतील बऱ्याच देशात ही एक मोठी समस्या आहे. विकसनशील देशात वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नधान्याचा पुरवठा होत नाही. बेकारीमुळे येथे उपजीविकेची समस्या निर्माण होते. भारतासारख्या विकसनशील देशात दुर्गम भागात कुपोषणाने मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण वृत्तपत्रातून वाचतो. विशेषतः यात लहान मुले असतात.

)अर्भक मातृत्वासंबंधी असलेले जास्त मर्त्यता प्रमाण (High Mortality related with Infants and Maternity)

मागासलेल्या देशात वैद्यकीय सेवांचा अभाव आढळतो. या देशातील शहरात थोड्या आरोग्यसेवा आढळतात. मात्र ग्रामीण भागात त्या अपुऱ्या असतात. विकसनशील देशात आरोग्य सेवांचा प्रसार होत असला तरी त्या लोकसंख्येच्या मानाने अपुऱ्या असतात. त्यामुळे मागास विकसनशील देशात बाल/ अर्भक प्रसूती काळात मृत्यू पावणाऱ्या स्त्रियांचे (maternity) प्रमाण अधिक असल्याने या देशात मर्त्यता प्रमाण जास्त असण्याचे हेही एक कारण आहे.

) शिक्षणाचा कमी प्रसार (Less development of education) –

जगात सर्वत्र शिक्षणाचा प्रसार होत असताना मागासलेल्या देशात शिक्षणाचे प्रमाण अजूनही कमी आहे. कारण येथे अजूनही शिक्षणाचा प्रसार झालेला नाही. आफ्रिकेतील देशातील स्थिती याबाबत अजूनही शोचनीय आहे. येथील अधिक लोक निरक्षर असलेले आढळतात. विकसनशील देशात शिक्षणाच्या सोई असल्या तरी प्रगत देशाच्या मानाने त्या कमी आहेत. त्यामुळे या देशातही निरक्षरांचे प्रमाण जास्त आहे. निरक्षरतेमुळे येथील लोकांना आरोग्य, स्वच्छता, कुटुंब इत्यादी विषयी फारशी जाणीव नसते. म्हणून या देशात मर्त्यता जास्त आढळते.

)स्त्रियांमधील शिक्षणाचा कमी प्रसार (Less Development of Education among Women) –

कोणत्याही कुटुंबामध्ये स्त्रीचे शिक्षण महत्त्वाचे असते. स्त्री शिक्षित नसली तर तिच्यामध्ये जागृती नसते. त्यामुळे तिला गरोदरपणी स्वतः घ्यायची काळजी, मुलांचे संगोपन, स्वतःचे आरोग्य, कुटुंबनियोजन याविषयी ती अज्ञानी असते. म्हणून अनेक देशात बालमृत्यू प्रसूती काळात होणाऱ्या स्त्रीचे मृत्यू यांचे प्रमाण जास्त आढळते. आफ्रिकेतील देशात तर स्त्रियांच्या शिक्षणाची मोठी समस्या आहे.

) कमी नागरीकरण (Less Urbanization) –

ग्रामीण शहरी भागाची तुलनाकरता शहरी भागात मर्त्यता कमी असते. ग्रामीण भागात ती जास्त असते. कारण शहरात शिक्षण वैद्यकीय सेवांचा प्रसार झालेला असतो. ग्रामीण भागात या सोई नसतात. मागासलेल्या देशात औद्योगिकीकरण नसल्याने नागरीकरणाचा अभाव आढळतो. प्रगत देशात उद्योगधंदे वाढत असले तरी नागरीकरणाचे प्रमाण कमीच आढळते. मागास विकसनशील देशात अधिकांश लोक (७०-८०%) ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे या देशात प्रमाण जास्त आहे.

) प्रदूषण (Pollution) –

मागासलेल्या देशात प्रदूषणाच्या फारशा समस्या नाहीत. मात्र विकसनशील देशात, उद्योगधंदे, वाहतूक, वाढती लोकसंख्या शहरांची वाढ हवेचे प्रदूषण वाढत आहे. या देशात जलप्रदूषणाचीही समस्या आहे. वाढत्या प्रदूषणामुळे देशात रक्तदाब, हृदयविकार, गॅस्ट्रो, विषमज्वर, कावीळ इत्यादी रोगाने अनेक लोक पावतात. अशाप्रकारे विकसनशील देशात मर्त्यता प्रमाण जास्त असण्याचे प्रदूषण हेही एक कारण आहे.

) अपुऱ्या आरोग्याच्या सोई (Inadequate Health Facilities) –

          मागासलेल्या देशात वैद्यकीय (आरोग्यविषयक) सेवांची फार मोठी समस्या आहे. या देशात वैद्यकीय सेवांचा प्रसार झालेला नाही. आफ्रिकेतील देशात ही गंभीर समस्या आहे. विकसनशील देशात वैद्यकीय सोई झालेल्या आहेत. मात्र त्या अपुऱ्या आहेत. येथील अनेक ग्रामीण क्षेत्रात या सोई पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे गंभीर आजाराच्या वेळी लोकांना औषधे मिळत नाहीत. त्यामुळे उपचाराअभावी लोक मृत्यू पावतात. या देशात मर्त्यता जास्त असण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

माल्थस यांचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत

प्रस्तावना;

वाढती लोकसंख्या ही विकासातील अडसर बनते एक मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा अभ्यास करणे गरजेचे वाटू लागले म्हणून लोकसंख्येचा अभ्यास करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांनी लोकसंख्यावाढीचा अभ्यास केला आणि आपले सिद्धान्त मते मांडलेली दिसून येतात. यामध्ये थॉमस माल्यस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. थॉमस माल्थस या शास्त्रज्ञाने वाढती लोकसंख्या याविषयीचा सखोल अभ्यास केला लोकसंख्यावाढीचा सिद्धान्त मांडलेला दिसून येतो.

थॉमस रॉबर्ट माल्थस यांचा जन्म 14 फेब्रुवारी, 1766 रोजी ग्रेट ब्रिटनमधील डार्किंग येथे झाला. त्यांचे उच्च शिक्षण केंब्रिज विद्यापीठामध्ये झाले. माल्थस यांना गणिताची संख्याशास्त्राची आवड होती. त्यामुळे त्यांचा कल हा गणितीय संख्याशास्त्रीय आकडेमोडीकडे होता. माल्थस यांनी काही काळ इतिहास राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले आहे. इंग्लंडमध्ये वास्तव्य करत असताना इंग्लंडच्या लोकसंख्येकडे त्यांचे लक्ष वेधले त्यांनी लोकसंख्येचा अभ्यास सुरू केला त्यामध्ये गणिताच्या सखोल ज्ञानाचा वापर केला त्यांनी सन 1798 मध्ये "Essay on the principles of population as it affects Future, Improvement of Society" नावाचा प्रबंध प्रकाशित केला. माल्थस यांनी या प्रबंधाद्वारे वाढत्या लोकसंख्येच्या समस्या उपाय यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविली. तसेच त्यांनी युरोप खंडातील अनेक देशांनाभेटी दिल्या. या प्रसिद्ध प्रबंधामध्येच लोकसंख्यावाढीचा सिद्धान्त प्रकाशित झाला व नंतर त्या सिद्धान्ताचा अभ्यास व वापर जगातील अनेक शास्त्रज्ञांनी केलेला दिसून येतो.

सिद्धान्ताची पार्श्वभूमी

थॉमस माल्थस यांनी आपला सिद्धान्त मांडताना लोकसंख्यावाढ व अन्नधान्याची वाढ यांच्या सहसंबंधाचा व वाढीचा गणितीय पद्धतीने अभ्यास केला आहे. माल्थस हे गणिताचे गाढे अभ्यासक होते त्यामुळे लोकसंख्या अभ्यासाच्या तात्त्विक मीमांसेत त्यांनी गणिताच्या सखोल ज्ञानाचा वापर केला व भूमितीय श्रेणी (Geometric Progression) व अंक-गणितीय श्रेणी (Arithmetic Progression) यांचा वापर करून सिद्धान्त मांडला आहे.

युरोप खंड हा आज उद्योगप्रधान खंड म्हणून ओळखला जात असला तरी ज्या काळात थॉमस माल्थस यांनी सिद्धान्त मांडला त्या काळात उद्योगधंद्यांचा विकास झाला नव्हता.

त्यामुळे युरोप खंडामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय होता. या व्यवसायाची अवस्था ही अविकसित असल्याने अपुरे अन्नधान्य उत्पादन, बेकारी, मागासलेले लोक, दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव या समस्यांनी लोक ग्रासले होते. या गोष्टींचा विचार करून माल्थस यांनी 'लोकसंख्यावाढीचा सिद्धान्त' सन 1798 मध्ये आपल्या एका शोधप्रबंधामध्ये प्रकाशित केला. या सिद्धान्ताला अनुसरून माल्थस यांनी काही विधाने केली आहेत ती खालीलप्रमाणे-

1. स्त्री-पुरुषांच्या लैंगिक आकर्षणामुळे लोकसंख्येची सातत्याने वाढ होते.

2. सर्व प्राण्यांना तसेच मानवाला जगण्यासाठी अन्नाची गरज आहे.

3. अन्नधान्याचे उत्पादन लोकसंख्येप्रमाणे वाढत नाही.

4. मानवाची प्रजोत्पादनाची क्षमता ही जमिनीच्या उत्पादनापेक्षा तीव्र आहे.

5. मानवाची निर्मिती होताना त्याला एक तोंड व दोन हात असतात. तोंड जन्मतःच कार्यरत होते पण हात कार्यरत होण्यास वेळ लागतो.

6. अन्नधान्य कमी पडल्याने लोकांची उपासमार होते व पर्यायाने लोक गुन्हेगारीकडे व अराजकतेकडे वळतात.

 सिद्धान्तामधील कारणमीमांसा

माल्थस या शास्त्रज्ञाने आपला सिद्धान्त मांडताना त्यावर दोन कारणमीमांसा सांगितल्या आहेत.

1)    सर्व समस्यांचे मुख्य कारण वाढती लोकसंख्या :

ज्या काळात माल्थस यांनी हा सिद्धान्त मांडला त्या काळात इंग्लंडमध्ये लोकसंख्यावाढीचा वेग जास्त होता, तरअन्नधान्यांची टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळचे लोक हे दैवीशक्तीने प्रेरित होते त्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनासाठी कोणी प्रयत्न करत नव्हते. त्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढत होत्या. बेकारी, दारिद्र्य, रोगराई, अराजकता, सामाजिक कलह वाढलेले होते. याचे कारण वाढती लोकसंख्या आहे याची जाणीव त्यावेळच्या समाजाला नव्हती. त्यामुळे माल्थस यांनी सर्वप्रथम या सर्व गोष्टींचे कारण वाढती लोकसंख्या असल्याचे प्रतिपादन केले.

(2) दुःख व दारिद्रय यांच्या मुळाशी वाढती लोकसंख्या हा विचार :

माल्थस यांनी आपला सिद्धान्त मांडताना ही दुसरी कारणमीमांसा सांगितली आहे. माल्थस यांच्या मते मानवाला व मानवी समुदायाला होणारे दुःख व दारिद्रय हे वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होते. एका बाजूला गॉडविन यांनी सन 1793 मध्ये सांगितले होते की राज्यसंस्था हीच लोकांच्या दुःखाला व दारिद्र्याला कारणीभूत असते, गॉडविनच्या या विचाराला विरोध करून माल्थस यांनी दुःख व दारिद्रय यांच्या मुळाशी वाढती लोकसंख्या आहे, हे विचार जगासमोर मांडण्यासाठी लोकसंख्यावाढीचा सिद्धान्त मांडला.

सिद्धान्ताची गृहीतके

माल्थस यांनी आपल्या सिद्धान्तात खालील गृहीतके मांडली आहेत.

1. मानवाला जिवंत राहण्यासाठी अन्नाची गरज आहे.

2. भिन्नलिंगी व्यक्तींमधील लैंगिक आकर्षणामुळे लोकसंख्या वाढत असते.

3. लोकसंख्येच्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन वाढत नाही.

4. वाढत्या लोकसंख्येमुळे गरिबी, बेकारी, दारिद्रय, अराजकता, सामाजिक कलह निर्माण होतात.

5. अपुऱ्या अन्नपुरवठ्यामुळे काही लोक अर्धपोटी, उपाशी राहतात त्यामुळे सधन व निर्धन गट तयार होतात.

सिद्धान्ताचे स्वरूप

माल्थस यांनी लोकसंख्यावाढीचा सिद्धान्त मांडताना लोकसंख्या व अन्नधान्याचे उत्पादन यांच्या वाढीची तुलना केलेली आहे. हा सिद्धान्त प्रामुख्याने पाच विभागांत विभागलेला आहे. पहिल्या तीन विभागांत लोकसंख्येची वाढ कशी होते, अन्नधान्य कशा प्रकारे वाढते व अन्नधान्य उत्पादन लोकसंख्येच्या तुलनेत कसे मागे पडते व त्याचे परिणाम काय होतात हे स्पष्ट केले आहे, तर शेवटच्या दोन विभागांत वाढत्या लोकसंख्येवर उपाय सुचविले आहेत.

 (1) भूमितीय श्रेणीने वाढणारी लोकसंख्या :

माल्थस यांच्या मते लोकसंख्येची वाढ ही भूमितीय पद्धतीने (Geometric Progression) वाढते. म्हणजेच लोकसंख्या ही दुप्पट वेगाने वाढते. उदा., 1, 2, 4, 8, 16, 32, 64, 128........... 25 वर्षांच्या काळानंतर लोकसंख्या ही दुप्पट होताना दिसून येते.

(2) अंकगणिती श्रेणीने वाढणारे अन्नधान्याचे उत्पादन :

 माल्थस यांनी अन्नधान्याच्या उत्पादनाच्या वाढीविषयी सांगितले आहे की, अन्नधान्याचे उत्पादन हे अंकगणिती श्रेणीने (Arithmetic Progression) वाढत असते. म्हणजेच अन्नधान्याची वाढ ही दुप्पट होत नाही. उदा., 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8……………..


(3) अपुरे अन्नधान्य उत्पादन :

भूमितीय पद्धतीने वाढणाऱ्या लोकसंख्येला अंकगणिती पद्धतीने वाढणारे अन्नधान्य पुरेसे पडत नाही. त्यामुळे लोकसंख्यावाढ व अन्नधान्य उत्पादन यांच्यात असमतोल निर्माण होतो. त्यामुळे देशात दारिद्र्य, बेकारी, अराजकता, सामाजिक असमतोल, उपासमार यांसारख्या समस्या निर्माण होतात.

(4) नैसर्गिक उपाय किंवा नियंत्रक :

माल्थस यांनी वाढत्या लोकसंख्येवर उपाय सांगताना नैसर्गिक नियंत्रक हा मुख्य उपाय सांगितला आहे. वेगाने वाढणारी लोकसंख्या व अन्नधान्य उत्पादन यातील असमतोल फार वाढला म्हणजे निसर्गच या समस्येचे निराकरण करतो. म्हणजेच दारिद्र्य, साथीचे रोग, रोगराई, भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी, दुष्काळ, पूर, युद्धे इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे मृत्यूचे प्रमाण वाढत जाते व लोकसंख्या कमी होते.

(5) प्रतिबंधात्मक उपाय:

मानव हा बुद्धिमान प्राणी असल्याने तो नैसर्गिक उपायांची वाट न पाहता मानवनिर्मित उपाय तयार करतो असे माल्थस यांनी सांगितले आहे. यामध्ये मानव स्वतः जन्मदरावर नियंत्रण आणतो व लोकसंख्या कमी करण्यास मदत करतो. तसेच उशिरा लग्न, नैसर्गिक संयम, ब्रह्मचर्य, शिक्षणामुळे लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवण्याची समज इत्यादी घटकसुद्धा लोकसंख्या नियंत्रित करतात. त्याबरोबर तांत्रिक प्रगती व विज्ञानाच्या जोरावर नवनवीन साधनसंपत्तींचा शोध घेऊन अधिकतम लोकसंख्येचे पोषण करता येते. अशा प्रकारे माल्थस यांनी सिद्धान्ताचे प्रतिबंधात्मक उपाय सुचविले आहेत.

सिद्धान्ताचे टीकात्मक परीक्षण/गुण-दोष

माल्थस यांनी मांडलेला सिद्धान्त हा लोकसंख्येच्या अभ्यासातील महत्त्वाचा सिद्धान्त आहे. या सिद्धान्तामुळे लोकसंख्येची वाढ व त्यामुळे होणारे परिणाम लक्षात येतात. त्याबरोबरच माल्थस यांनी लोकसंख्यावाढीला आळा बसविण्यासाठी सुचविलेले उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. या सिद्धान्ताचे समर्थन करणारे अनेक शास्त्रज्ञ आहेत. तसेच या सिद्धान्तावर टीका करणारे लोकही आढळतात.

(1)  सिद्धान्ताचे समर्थन/गुण :

§  माल्थस यांच्या या सिद्धान्तावरून लोकसंख्येची वाढ व अन्नधान्याची वाढ यांचा सहसंबंध लक्षात येतो.

§  माल्थस यांनी मांडलेला सिद्धान्त ज्या कालखंडातील आहे त्या कालखंडात लक्ष वेधणारा आहे.

§  लोकसंख्यावाढीचे परिणाम माल्थसच्या सिद्धान्तावरून स्पष्ट होतात.

§  लोकसंख्यावाढीस आळा घालण्यासाठी मानवाने स्वतः उपाययोजना केल्या पाहिजेत याची कल्पना सिद्धान्तावरून येते.

(2) सिद्धान्तावरील आक्षेप (दोष):

माल्थस यांनी मांडलेल्या सिद्धान्तावर अनेक शास्त्रज्ञांनी टीका केलेल्या आहेत.

§  माल्थस यांनी आपल्या सिद्धान्तात लोकसंख्येची वाढ ही भूमितीय पद्धतीने वाढते असे प्रतिपादन केले आहे. पण जगात माल्थस यांच्या मतानुसार भूमिती श्रेणीने कोणत्याच देशाची लोकसंख्या वाढत नाही. याउलट, काही युरोपियन देशांची लोकसंख्या घटली आहे.

§  अन्नधान्याचे उत्पादन अंकगणिती श्रेणी वाढत्या तंत्रज्ञानाच्या सुविधा व आधुनिक कृषीच्या पद्धतीमुळे अन्नधान्य गणिती  पद्धतीने ण वाढता अधिक गतीने वाढते. उदा. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, यासारखे देश अन्नधान्यांची निर्यात करत आहेत.

§  लोकसंख्यावाढीबरोबर जमीन वाढविता येत नाही हे मत बरोबर आहे परंतु अन्नधान्याचे उत्पादन वाढविता येते हे माल्थस यांनी गृहीत धरले नाही.

§  माल्थस यांनी आपल्या सिद्धान्तात लोकसंख्यावाढीची तुलना अन्नधान्याच्या वाढीशी केली आहे हे चुकीचे ठरते. कारण मानवाला जीवन जगत असताना अन्नधान्याबरोबर इतर साधनांची पण गरज असते. त्यामुळे माल्थस यांनी वाढत्या लोकसंख्येची तुलना सर्व साधनसंपत्तीबरोबर करायला हवी होती असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.

§  जगातील सर्व देशांना हा सिद्धान्त लागू होत नाही तर ज्या देशांची लोकसंख्या जास्त आहे अशाच देशांना हा सिद्धान्त लागू पडतो.

§  माल्थस यांनी लोकसंख्यावाढीवर आळा बसविण्यासाठी जे नैसर्गिक उपाय सांगितले आहेत ते चुकीचे आहेत. कारण नैसर्गिक आपत्ती फक्त वाढत्या लोकसंख्येच्या देशात येत नाही तर ती कोणत्याही देशात येऊ शकते. उदा., जपानसारख्या कमी लोकसंख्येच्या देशात सातत्याने नैसर्गिक आपत्ती येते.

§  अर्थशास्त्रात कॅनन यांच्या मते माल्थस यांनी लोकसंख्येची तुलना ही अन्नधान्याशी करण्याऐवजी राष्ट्रीय उत्पन्नाशी करणे उचित ठरले असते.

§  लोकसंख्यावाढ म्हणजे संकट हा माल्थस यांचा विचार चुकीचा आहे असे कॅनन यांचे मत आहे. कॅनन यांच्या मते लोकसंख्येची वाढ म्हणजे श्रमशक्तीचा पुरवठा होय.

माल्थस यांनी सिद्धान्तात कालप्रवाहानुसार केलेल्या सुधारणा

माल्थस यांनी आपला सिद्धान्त वेळोवेळी सुधारित केलेला दिसून येतो. माल्यस यांनी आपल्या सिद्धान्तात कालप्रवाहात सुधारणा करून इ.स. 1803, 1806, 1807, 1817 व 1824 साली अशा पाच सुधारित आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत.

माल्थस यांनी आपल्या सिद्धान्तात सुधारणा करताना असे सांगितले आहे की, लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढली नाही तरी अन्नधान्याची वाढ लोकसंख्येच्या वाढीपेक्षा कमी होऊन दारिद्रय वाढत जाईल.

तसेच नैतिक नियम व प्रतिबंधात्मक उपाय यांची अंमलबजावणी गरीब लोकांकडून फारशी होणार नाही. त्यांच्या दुःख व दारिद्र्यात अधिकच भर पडेल असे प्रतिपादन माल्थस यांनी केले आहे.

प्रश्न:

१.      जागतिक लोकसंख्या वितरण स्पष्ट करा.

२.      भारतातील लोकसंख्या घनता स्पष्ट करा.

३.      जागतिक लोकसंख्या घनता स्पष्ट करा.

४.     लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक (प्राकृतिक/सांस्कृतिक)स्पष्ट करा.

५.     माल्थसचा लोकसंख्या शास्त्रीय सिद्धांत स्पष्ट करा. 

Post a Comment

Previous Post Next Post