लोकसंख्या वाढ आणि वितरण
घटक :
२.१ जागतिक लोकसंख्या वाढ
२.२ लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक
२.३ जागतिक लोकसंख्येचे वितरण
२.४ लोकसंख्या संकल्पना:
न्युनतम लोकसंख्या
आ.पर्याप्त लोकसंख्या
अतिरिक्त लोकसंख्या
2.1 जागतिक लोकसंख्या वाढ
प्रस्तावना –
जगात लोकसंख्येचे वितरण फारच असमान झालेले आढळते. एकूण भूप्रदेशापैकी सुमारे ३३% भूप्रदेश जवळजवळ निर्जन आहे, तर जगातील ५०% लोकसंख्या व ५% भूप्रदेशात एकवटलेली आढळते तर केवळ ५% लोकसंख्या ५६ % भूभागात पसरलेली आहे.
जगातील बऱ्याचशा भागात मानवी वस्ती नाही. उ. सैबैरिया, उत्तर अमेरिकेचा उत्तर भाग, मध्य आशियातील वाळवंटी प्रदेश, ऑस्ट्रेलियातील शुष्क व कोरडे प्रदेश, ऑस्ट्रेलिया व संयुक्त संस्थानातील पर्वतीय प्रदेश यासारख्या विभागात फारच अल्प लोकसंख्या आढळते. ढोबळ मानाने जगाच्या २५% भागात अतिशय दाट लोकवस्ती, तर २५% भागात अतिशय विरळ लोकवस्ती आढळते. जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे ७५% लोकसंख्या २३ उत्तर अक्षवृत्त (कर्कवृत्त) आणि ७०° उत्तर अक्षवृत्त यादरम्यान एकवटली आहे.
सुमारे ८०% लोकसंख्या उत्तर गोलार्धात तर २०% लोकसंख्या दक्षिण गोलार्धात आहे.
लोकसंख्या वितरणाचा खंडनिहाय विचार केल्यास एकट्या आशिया खंडात सुमारे ६०% लोकसंख्या आढळते. या खंडाचे क्षेत्रफळ मात्र जगाच्या सुमारे ३६% आहे. जगातील सुमारे १४% लोकसंख्या जगाच्या ३१% क्षेत्रफळ असलेल्या उत्तर व दक्षिण अमेरिका खंडात आहे. तर २२% क्षेत्रफळ असलेल्या आफ्रिका खंडात केवळ ८% लोकसंख्या आढळते. युरोप खंडात सुमारे १३% लोकसंख्या (क्षेत्रफळ ४%) आढळत असून जगाच्या सुमारे ७% क्षेत्रफळ असलेल्या ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड विभागात जगातील ५% लोकसंख्या आढळते. यावरून जागतिक लोकसंख्येचे वितरण खंडानुसारसुध्दा अतिशय विषम असल्याचे दिसून येते. याचप्रमाणे देशादेशानुसार असमान झालेले आढळते.
आज भारताचा जागतिक लोकसंख्येत प्रथम क्रमांक असून या देशात जगातील सुमारे २९.१४% लोकसंख्या आहे. भारताची लोकसंख्या १३८ कोटी असून,
ती जगाच्या २३% इतकी आहे. अशाप्रकारे जगात सर्वत्र लोकसंख्येचे वितरण फारच असमान झालेले आढळते. कारण लोकसंख्या वितरणावर विविध भौगोलिक, आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक घटकांचा प्रभाव पडतो. हे पटक सर्वत्र समान नसल्यामुळे लोकसंख्या वितरण विषम आढळते. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा अभ्यास करण्यापूर्वी लोकसंख्या वितरणाच्या ठळक वैशिष्ट्यांचा विचार करु.
2.2 लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक
प्रस्तावना -
लोकसंख्या ही एक साधनसंपदा मानली जाते. लोकसंख्येच्या गुणात्मक व संख्यात्मक माहितीच्या आधारे कोणत्याही देशाचे नियोजन करणे सोपे जाते.
कोणत्याही देशाची लोकसंख्या त्या त्या देशाची प्रगतीतील एक प्रेरक शक्ती असते.
संपूर्ण पृथ्वीवर लोकसंख्येचा विचार केल्यास लोकसंख्येचे वितरण हे विषम आहे, आणि त्यातूनही स्थळ कालपरत्वे भिन्नता दिसून येते.
2.2 लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक (FACTORS INFLUENCING DISTRIBUTION OF
POPULATION):
१. भौगोलिक घटक
२. आर्थिक घटक
३. सामाजिक घटक
४. धार्मिक घटक
५. राजकीय घटक
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक (Factors influencing distribution of
Population) :
पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी केवळ ८.७% क्षेत्र मानवी वसाहतीसाठी योग्य आहे. त्यातील फारच थोड्या प्रदेशात सर्व बाबतीत अनुकूलता आहे. एकंदरीत जगात लोकसंख्येचे वितरण अत्यंत विषम आढळते. सामान्यपणे मानवी जीवनासाठी अनुकूल परिस्थिती असलेल्या प्रदेशांमध्ये दाट लोकसंख्या आढळते. तर प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या प्रदेशांमध्ये फारच विरळ लोकसंख्या आढळते. काही प्रदेश तर निर्मनुष्य आहेत. उदा. अंटार्क्टिका खंड, उत्तर ध्रुवीय प्रदेश इ.
पृथ्वीवर आढळणाऱ्या विषम भौगोलिक परिस्थितीमुळे लोकसंख्येचे वितरणही विषम झालेले आहे. एकूण भूभागापैकी सुमारे ७०% प्रदेश निर्मनुष्य आहे, तर भूभागाच्या ७०% प्रदेशात जगातील लोकसंख्या आढळते. २० ते ५० उत्तर अक्षवृत्तीय सुमारे ८०% लोकसंख्या आढळते, तर संपूर्ण दक्षिण गोलार्धात जगातील सुमारे २०% पेक्षा कमी लोकसंख्या आहे.
जगात लोकसंख्येचे असमान वितरणास केवळ नैसर्गिक घटकच जबाबदार नाहीत, तर मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या नैसर्गिक घटकांबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय व इतर घटकांचाही लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो.
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे विविध घटक प्रामुख्याने खालील दोन गटांत विभागले जातात.
१) प्राकृतिक पटक (Physical
factors)
२) आर्थिक व सांस्कृतिक घटक (Economic
& Cultural factors)
प्राकृतिक पटकांमध्ये निसर्गनिर्मित घटकांचा तर, सांस्कृतिक घटकांमध्ये मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो.
१.
प्राकृतिक घटक / भौगोलिक घटक
भौगोलिक घटकाचा लोकसंख्येच्या वितरणावर फार मोठा परिणाम होतो.यामध्ये प्रामुख्याने भूरचना, हवामान, भौगोलिक स्थान, जलसंपदा, खनिजे, जंगले इ. घटकांचा लोकसंख्या वितरणाशी जवळचा संबंध येतो.
१.भुमिस्वरूपे–
पृथ्वीच्या पृष्टभागाचे स्वरूप सर्वत्र सारखे नाही. पर्वतमय प्रदेश, उंच सखल दर्या, तीव्र उतार, कडे, घळई इ. भूरुपे दिसून येतात.
पर्वत
सामान्यपणे पर्वतीय प्रदेश मानवी वसाहतीसाठी अनुकूल नसतात. थंड तापमान , घनदाट जंगले, वाहतूक व दळणवळण समस्या, तीव्र उतार, पाण्याची कमतरता, शेती योग्य जमीनीचा अभाव इ. प्रतिकूल घटकांमुळे लोकसंख्येचे प्रमाण कमी असते. उदा.भारतातील हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली, विंध्य पर्वत तर उत्तर अमेरिकेतील रॉकीज, दक्षिण अमेरिकेतील अन्डीज पर्वत इ. पर्वततीय प्रदेशात लोकसंख्या खूप कमी आढळते.तर काही पर्यटन स्थळांच्या विकासामुळे लोकसंख्या पर्वतीय भागामध्ये जास्त दिसून येते.
उदा.महाबळेश्वर, नैनिताल, शिमला, मसुरी इ.ठिकाणी लोकसंख्येचे केंद्रीकरण आढळते.
भौगोलिक स्थान-
महासागर व समुद्राच्या जवळचे स्थान मानवी विकासाला अनुकूल असल्यामुळे अशा प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण आढळून येते.
कारण या भागात शेती, व्यापार, दळण वळण इ. चा विकास झालेला असल्यामुळे लोकसंख्या अधीक व दाट आढळते.
उदा.
जपानच्या एकूण लोकसंखेच्या ७० टक्के लोक किनार्यालगतच्या प्रदेशात राहतात.
हवामान, सुपीक मृदा, पाण्याची उपलब्धता, जलससंचनाचा विकास, सपाट प्रदेश, वाहतुकीचे जाळे, बारमाही ऋतुमांनानुसार वाहणाया नद्यांची खोरी इ. घटकांमुळे मैदानी प्रदेशात लोकसंख्या जास्त आढळते. जगातील ९०% लोक मैदानी प्रदेशात राहतात.
हवामान-
हवामान या घटकांमध्ये तापमान, पर्जन्य, आद्रता, पठारे इ. हवेतील घटक मानवी जिवनावर परिणाम करतात.
तापमान -
अती थंड किवा अती जास्त तापमान प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते. उदा. पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे व तापमान जास्त असल्यामुळे हा प्रदेश मानवी आरोग्यासाठी प्रतिकूल मानला जातो. उदा.
थर, कलहरी, सहारा, अरेबिया इ. वाळवंटी प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते. तसेच ग्रीनलंड, उत्तर रशिया इ. थंड हिामानाच्या प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते.
ब) पर्जन्य –
अती पर्जन्य व जास्त उष्णता तसेच असत थंड प्रदेश मानवी जीवनाच्या व कार्यक्षमतेच्या दृष्टीने निरुपयोगी ठरतात. मोसमी हवामानाच्या प्रदेशात पर्जन्य वितरण मानवी जीवनासाठी अनुकूल असल्यामुळे भारतीय उपखंडात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात केंद्रीत झाली आहे.
जलसंपदा -
मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व उद्योगधंद्याच्या विकासासाठी पाण्याचे अतिशय महत्व आहे. नद्या, सरोवरे, तळे, धरणे इ. ठिकाणी लोकसंख्या दाट स्वरुपात आढळते.
उदा. भारतातील उत्तर भारतीय मैदानी प्रदेश तर ज्या भागात पाण्याची उपलब्धता अतिशय कमी आहे त्या भागात शेती व्यवसाय विकसित होत नाही याचा परिणाम तेथील लोकसंख्येवर होताना दिसून येतो.
मृदा –
जेथे सुपीक मृदा आढळून येते तेथे शेती व्यवसाय विकसित होतो व अशा प्रदेशात शेतीवर आधारित प्रक्रिया करणारे उद्योग धंदे विकसित होतात. नद्यांच्या खोऱ्यात सुपीक व गाळाची मृदा असल्याने (गंगा,गोदावरी,यमुना इ.) लोकसंख्येची घनता जास्त आढळते.
जंगले –
ज्या ठिकाणी जंगलाची वाढ व दर्जा चांगला असतो त्या ठिकाणी अनेक व्यवसाय होतात व साहजिकच अशा ठिकाणी लोक आकर्षित होतात म्हणून ज्या ठिकाणी वनस्पती जीवन समृध असते अशा ठिकाणी लोकसंख्या अधिक असते.
खनिजे -
औद्योगिक क्रांतीनंतर खनिजांचा वापर वाढल्याने अशा ठिकाणी खाणकाम व्यवसाय सुरु झाल्याने तेथे स्थानिक रोजगार उपलब्ध झाला, त्यामुळे लोकवस्ती वाढताना दिसून येते. मध्य पूर्वेकडील देश तेल उत्पादन मिळवण्यात अग्रेसर असल्यामुळे तेथे लोकसंख्येची घनता जास्त आहे.
२.आर्थिक घटक
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे आर्थिक घटक खालीलप्रमाणे;
1. औद्योगीकीकरण
2. वाहतूक व दळणळण
3. जलसिंचन
4. नागरीकरण
5. तंत्रज्ञानाचा प्रसार
6. मजुरीचे दर
1.
औद्योगीकीकरण -
औद्योगीकीकरणाचा विकास झाल्यावर अनेक प्रकारचे कारखाने सुरु झाले. त्यामुळे कुशल व अकुशल मजुरांची गरज भासू लागली. त्यामुळे आसपासच्या प्रदेशातील लोक मोठ्या प्रमाणात कामासाठी येऊ लागली. त्यामुळे औद्योगिक केंद्राजवळ दाट लोकवस्ती निर्माण झालेली दिसून येते.
उदा. भारतातील मुंबई –पुणे – नाशिक विभाग, जगातील उ. अमेरिकेचा ईशान्य भाग, वायव्य युरोप, रशियाचा उरल व युक्रेन भाग, जपानमधील होन्शू बेट ई.
2.
वाहतूक व दळणळण –
ज्या वाहतूक व दळणळणचा विकास झालेला असतो तेथे वाहतूक व दळणळणची साधने भरपूर असतात. मैदानी प्रदेशात पक्के रस्ते, जलमार्ग, लोहमार्ग, राष्ट्रीय व राज्य मार्ग मोठ्या प्रमाणात विकसित होतात. त्यामुळे मैदानी प्रदेशात या प्रकारच्या सुविधा असल्यामुळे लोकवस्ती जास्त आढळून येते.
उदा.भारतातील मुंबई (३३४७२८), कोलकता (२४०००)
,चेन्नई (२६९०३) दर चौ. कि.मी.इतकी घनता आहे. जगातील न्यूयार्क, वाशिंग्टन, मोनट्रीयल, लंडन, ग्लासगो, टोकियो इ. वरील शहरात वाहतूक व दळणळणचा विकास जास्त झालेला आहे, त्यामुळे लोकसंख्या दाट व घनता जास्त आहे.
3.
जलसिंचन –
भारतातील पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र पठार इ .भागामध्ये जलसिंचनाच्या सुविधांमुळे शेतीचा व्यवसाय विकसित झाल्यामुळे लोकवस्ती वाढलेली आहे.
4.
नागरीकरण -
कोणत्याही शहरामध्ये औद्योगिक व व्यापारी क्रिया मोठ्या प्रमाणात चालत असल्यामुळे रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होतात व संर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतात. याचा परिणाम शहरामध्ये लोकसंख्या जास्त व घनता दाट दिसून येते.
उदा. कारखाने शाळा, बँका,करमणूक केंद्रे,संशोधन संस्था,शासकीय कार्यालये,आर्थिक व सामाजिक संस्था, ई. भागातलोकसंख्या जास्त व घनता दाट दिसून येते.
5.
तंत्रज्ञानाचा प्रसार –
ज्या प्रदेशात तंत्र ज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्या प्रदेशात लोक आकर्षित होतात. उदा. भारतातील मुंबई, पुणे, बेंगळूर, चेन्नई, दिल्ली कोलकता, नोइडा, गुडगाव, कानपुर इ.
जगातील यू.एस.ए. जपान, पश्चिम युरोपीय देश, जावा, इ. शहरांच्या लोकसंख्येत अलीकडच्या काळात आय.टी. क्षेत्रात वाढ झाल्यामुळे अशा शहरात लोकसंख्या जास्त दिसून येते.
6.
मजुरीचे दर -
ग्रामीण भागपेक्षा शहरी भागात मजुरीचे दर जास्त असतात व पैसा कामावण्याची संधी जास्त प्रमाणात उपलब्ध होतात. उदर्निर्वाहासाठी कोणतेही काम अथवा धंदा केले तरी शहरात काम मिळते. प्रत्येकाला शहरात आपले कौशल्य प्रगट करण्याची संधी मिळते.
श्रमिकला मात्र कोणत्याही कामाची काम करण्याची लाज वाटू नये.
३.सामाजिक घटक
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे सामाजिक घटक खालीलप्रमाणे आहेत;
1. कुटुंबाचा आकार
2. सामाजिक रूढी परंपरा
3. सामाजिक बंधने
4. विवाहाचे वय
5. शिक्षण
6. बाल विवाह
1.
कुटुंबाचा आकार -
काही देशात कुटुंबाचा आकार जेवढा मोठा तेवढ्या प्रमाणात ते कुटुंब श्रीमंत व गौरिशाली मानले जाते. म्हणून लोकसंख्या जास्त प्रमाणात राहील तेवढी कुटुंबाची प्रगती होईल अशा आशेने जास्त अपत्याना जन्म देण्याकडे कल वाढत असल्याने लोकसंख्या वाढत जाते. याचा परिणाम कुटुंबाचा आकार वाढत जाऊन लोकसंख्याही वाढत जाते.
2.
सामाजिक रूढी परंपरा –
काही देशात सामाजिक रूढी परंपरा इतक्या रूढ झाल्या दिसतात कि, कुटुंबात एक तरी मुलगा असावा म्हणून ४ – ५ मुली असल्या तरी कुटुंबास वारस असावा म्हणून पुत्रप्राप्ती होईपयंत अपत्यांना जन्म दिला जातो.
3.
सामाजिक बंधने –
काही देशात किवा काही धर्मात विवाह झाल्यानंतर अपत्याना जन्म दिलाच पाहिजे अशी बंधने घातल्याने लोकसंख्या वाढत जाते. विविध जाती धर्मातील सामाजिक रूढी व परपरा व त्यांची बंधने समाजावर नियंत्रण करीत असतात. रूढी व त्यांची बंधने अतिशय कडक असतात. ज्यांना अशी बंधने मान्य नसतात असे लोक सुरक्षित व सोईच्या ठिकाणी स्थलांतर करतात.
4.
विवाहाचे वय -
लोकसंख्या वाढ व विवाहाचे वय यांचा जवळचा संबंध आहे. ज्या देशात विवाह लवकर होतात अशा देशांत लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. कारण प्रजोत्पादनाचा कालावधी जास्त मिळाल्याने जन्मदरही जास्त असतो.
5.
शिक्षण -
ज्या देशात शिक्षणाचा प्रसार झालेला आहे अशा प्रदेशात शिक्षण घेत असल्याने वयोगटही वाढत जातो, परिणामी लोकसंख्या कमी प्रमाणात वाढते. याउलट ज्या देशात शिक्षणाचा प्रसार झालेला नाही अशा प्रदेशात लोकसंख्या जास्त प्रमाणात वाढत जाते.
6.
बाल विवाह -
हिंदू धर्मातील बाल विवाह मुले ही देवाची देणगी मानण्याची रूढी मुलगा वंशाचा दिवा मानण्याची प्रथा इ.
४. धार्मिक घटक
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे सामाजिक घटक खालीलप्रमाणे;
1. बहुपत्नीत्वाची
पद्धत
2. विधवा विवाह पद्धत
3. धार्मिक छळ
1.
बहुपत्नीत्वाची पद्धत -
अनेक देशांमध्ये बहुपत्नीत्वाची पद्धत प्रचलित असल्याने तेथे लोकसंख्या जास्त प्रमाणात दिसून येते. उदा. पाकीस्तान, बांग्लादेश इ .
मुस्लिम धर्मातील बहुपत्नीत्व याचाही प्रभाव लोकसंख्या वाढीवर होत असतो.
आफ्रिकेतील अनेक पत्नीत्वाच्या चालीरीतीमुळे लोकसंख्या वाढ झालेली दिसून येते.
2.
विधवा विवाह पद्धत -
ज्या धर्मात विधवा विवाह पद्धत प्रचलित आहे तेथे पुनर्विवाह करतात व त्यामुळे पुन्हा अपत्य प्राप्ती होत असल्याने लोकसंख्या वाढते.
3.
धार्मिक छळ –
एखाद्या प्रदेशात विशिस्ट समुदायाचा मानसिक किवा शारीरिक छळ होत असेल तर अशा भागातून हा समुदाय स्थलांतर करतो व लोकसंख्या कमी होते.
५)
राजकीय घटक
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे सामाजिक घटक खालीलप्रमाणे;
1. सरकारी धोरण व शासन व्यवस्था
2. फाळणी
3. विकेंद्रीकरण
१.
सरकारी धोरण व शासन व्यवस्था -
काही वेळेस अचानक राजकीय घटना घडत असतात त्याचा परिणाम लोकसंख्या वाढीवर होतो. उदा. औद्योगिक धोरणामुळे उद्योगांच्या विकेंद्रीकरणासाठी नविन औद्योगिक प्रदेश व सेझ सारखे प्रकल्प उभे केले जात आहे व या कारणामुळेही प्रत्येक्ष व अप्रत्येक्षरित्या लोकसंख्या वितरणावर परिणाम होतो.
२.
फाळणी -
बांग्लादेश युद्धाच्या वेळी भारत सरकारने अनेकांना ईशान्य भारतात आश्रय दिल्याने तेथील लोकसंख्या वाढलेली दिसून येते. तसेच भारत सरकारने त्याना तामिळळनाडू राज्यातही आश्रय दिल्याने लोकसंख्या वाढताना दिसून येते.
३.
विकेंद्रीकरण -
काही वेळेस सरकार एखाद्या लोकसंख्येतील ताण कमी करण्यासाठी विकेंद्रीकरणाचे धोरण जाहीर करते त्यामुळे ज्या प्रदेशात लोकसंख्या कमी आहे अशा प्रदेशात लोकांना जाण्यासाठी व कायम स्वरूपी स्थायिक करण्यासाठी सवलती जाहीर करतात.
२.३ जागतिक लोकसंख्येचे वितरण
लोकसंख्या वितरणाची ठळक वैशिष्ट्ये
पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागापैकी ७१% पृष्ठभाग जलाशयांनी व्यापलेला असून २९% पृष्ठभाग जमिनीने व्यापलेला आहे. जमिनीने व्यापलेल्या या २९% पृष्ठभागापैकी केवळ ३०% भूभागावर कायम स्वरुपाची मानवी वस्ती आहे. आशिया खंडाने जगाचा ३६.४% भाग व्यापला असून, या खंडात जगाची ६०% लोकसंख्या आढळते. उत्तर व दक्षिण अमेरिका खंडात जगातील १४% लोकसंख्या असून या खंडांनी ३१% क्षेत्र व्यापलेले आहे. आफ्रिका खंडाने जगाच्या २२.२% क्षेत्र व्यापलेले असून या खंडात जगातील केवळ ८% लोकसंख्या आढळते. युरोप खंडाचे क्षेत्रफळ जगाच्या ४% असून लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या १३% इतकी आहे. एकट्या चीनमध्ये आशियातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३४% आणि जागतिक लोकसंख्येच्या २१% लोकसंख्या आढळते.
जागतिक लोकसंख्येचे वितरण :(Distribution
of world Population)
जगातील लोकसंख्येचे वितरण खूपच असमान असून काही प्रदेश मानवविरहित आढळतात. लोकसंख्येच्या जागतिक वितरणाचा अभ्यास करताना लोकसंख्येची घनता विचारात घेणे उचित ठरते. त्यानुसार लोकसंख्येचे जागतिक वितरण लक्षात घेता जगाची विभागणी खालील तीन विभागांत करता येते.
1) दाट लोकवस्तीचे प्रदेश (Densely
Population Regions)
2) मध्यम लोकवस्तीचे प्रदेश (Medium
Population Regions)
3) विरळ लोकवस्तीचे प्रदेश (Sparsely
Population Regions)
१. दाट लोकवस्तीचे प्रदेश (Densely
Populated Regions)
जगातील काही प्रदेश दाट लोकवस्तीचे आहेत.
सर्वसाधारणपणे अनुकूल हवामान असलेल्या, शेतीदृष्ट्या व औद्योगिकदृष्ट्या विकसित प्रदेशांमध्ये दाट लोकसंख्या आढळते. दर चौ.कि.मी. ला ४०० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेले प्रदेश दाट लोकवस्तीचे प्रदेश म्हणून ओळखले जातात.
यात पूर्व आशियातील चीन, जपान, दक्षिण कोरिया, तैवान, दक्षिण आशियातील भारत, पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, मालदीव व नेपाळ, युरोपातील फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, डेन्मार्क, स्पेन, इटली, पोर्तुगाल, पोलंड, ग्रेट ब्रिटन, उत्तर अमेरिकेतील ईशान्य संयुक्त संस्थान आणि आग्रेय कॅनडा या प्रमुख देशांचा समावेश होतो.
यापैकी पूर्व व दक्षिण आशियातील देशांमध्ये प्रामुख्याने शेती व्यवसाय विकसित असलेल्या प्रदेशांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले आढळते.
काही भागात शेतीबरोबरच शेतीमालावर आधारित व्यवसाय वाढीस लागलेले आहेत. त्या भागातही लोकसंख्या दाट आढळते.
उदा.: चीनमध्ये यांगत्सीक्यांग, हो-हँग-हो, सिकियांग नद्यांचे खोरे, भारतात सतलज, गंगा-यमुना नद्यांचा मैदानी प्रदेश, म्यानमारमधील इरावती नदीचा त्रिभुज प्रदेश, जावा बेटावरील सुपीक सखल क्षेत्र, इजिप्तमधील नाईल व इटालीतील पो नदीचे खोरे, पाकिस्तानमध्ये पंजाब प्रांत व सिंधू नदीचा त्रिभुज प्रदेश, बांगलादेशात गाळाच्या मैदानी प्रदेशात लोकसंख्या दाट आहे.
आयलँड, स्कॉटलँड, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क येथे गहू, बीट, बटाटे, द्राक्षे व इतर फळांचे उत्पादन अधिक होते त्यामुळे त्या विभागात लोकसंख्या एकवटली आहे.
पश्चिम युरोपीय देश, ईशान्य संयुक्त संस्थाने आणि आग्रेय कॅनडा, जपान औद्योगिकदृष्ट्या विकसित आहेत. त्यामुळे लोकसंख्या दाट आहे.
औद्योगिक विकासामुळेच जपानमधील टोकियो ते नागासाकी, कोरियाचा किनारी प्रदेश सं. संस्थानातील पंचमहा- सरोवरीय प्रदेशात लोकसंख्येची घनता जास्त आहे.
भारतात मुंबई, चैन्नई, बंगलोर, कोलकाता, अहमदाबाद, औरंगाबाद, पुणे या शहरांमध्ये औद्योगिक व व्यापारी क्षेत्रामुळे लोकसंख्या घनता जास्त आहे.
२.
मध्यम लोकवस्तीचे प्रदेश (Medium
Populated Regions) –
जगातील काही प्रदेशांमध्ये लोकसंख्या फारच विरळ किंवा दाट नसते.
असे प्रदेश सामान्यपणे विरळ लोकसंख्या व दाट लोकसंख्या यांच्यामधील संक्रमणावस्थेत असतात. सर्वसाधारणपणे ज्या प्रदेशांमध्ये लोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी. क्षेत्रात २०० ते ४०० या दरम्यान असते. त्या प्रदेशांचा समावेश मध्यम लोकवस्तीच्या विभागात केला जातो. अशा प्रदेशांमध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय असतो. काही प्रदेशात पशुपालन व्यवसायही केला जातो.
या विभागात मध्य संयुक्त संस्थान, दक्षिण कॅनडा, मध्य चीन, भारतातील दख्खनचे पठार, पूर्व ब्राझील, मध्य चिली, युरोपचा पूर्व भाग, आफ्रिकेचा मध्य कटिबंधीय प्रदेश, दक्षिण मेक्सिको इत्यादी प्रदेशांचा समावेश होतो.यापैकी आशियाई क्षेत्रात कृषी व्यवसाय करणारी ग्रामीण लोकसंख्या अधिक आहे.
पूर्व युरोपीय क्षेत्रात कृषी क्षेत्र अधिक असून, पश्चिम युरोपीय क्षेत्राच्या तुलनेत औद्योगिकरण कमी झालेले आहे. ब्राझिल, चिली या भागात समुद्र किनारपट्टीने लोकसंख्या केंद्रित झालेली आढळते. तर आफ्रिकेतील अल्जीरिया व इतर मध्य कटिबंधीय प्रदेशात कृषी, व्यापार व इतर सेवा यामुळे मध्यम स्वरुपाची लोकवस्ती आढळते.
३.
विरळ लोकवस्तीचे प्रदेश (Sparsly
Populated Regions)-
ज्या प्रदेशामध्ये दर चौ.कि.मी. क्षेत्रात ५० व्यक्तीपेक्षाही कमी व्यक्ती राहतात त्या प्रदेशांचा समावेश विरळ लोकवस्तीच्या विभागात केला जातो.
अत्यंत प्रतिकूल हवामान असणारे प्रदेश, अति उष्ण वाळवंटी प्रदेश, अति शीत हवामानाचे बर्फाच्छादित पृवीय प्रदेश, अति उष्ण व दमट हवामानाचे विषुववृत्तीय प्रदेश, अति जास्त व अति अल्प पर्जन्यमानाचे प्रवेश, उंच पर्वतीय प्रदेश विरळ लोकवस्तीचे आहेत.
कारण असे प्रदेश मानवी आरोग्य व विकासाच्या दृष्टीने प्रतिकूल असतात. विरळ लोकवस्तीचे प्रदेश खालील चार प्रकारांत सांगता येतील.
१) उष्ण वाळवंटी प्रदेश
२) अती शीत बर्फाच्छादित प्रदेश
३) उंच पर्वतीय प्रदेश
४) उष्ण सदाहरित विषुववृत्तीय अरण्याचे प्रदेश
१) उष्ण वाळवंटी प्रदेश :-
आफ्रिकेतील सहारा व कलहारी, पश्चिम ऑस्ट्रेलियातील वाळवंटी प्रदेश, उत्तर अमेरिकेतील कोलोरॅडो, दक्षिण अमेरिकेतील अटाकामा, आशियातील अरेबियन व थरचे वाळवंट या प्रदेशांमध्ये अती जास्त तापमान, वालुकामय मृदा, अत्यल्प पर्जन्य, पाण्याचे दुर्भिक्ष्य इत्यादी प्रतिकूल परिस्थितीमुळे लोकसंख्या विरळ आढळते.
२) अती शीत बर्फाच्छादित प्रदेश:-
जगातील सर्वच बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये विरळ लोकसंख्या आढळते. अति थंड हवामान, जीवनावश्यक सुविधांचा अभाव यामुळे लोकसंख्या फारच अल्प आढळते. अंटार्क्टिका बर्फाच्छादित खंड निर्मनुष्य आहे. उत्तर कॅनडा, अलास्का, ग्रीनलंड व उत्तर ध्रुवीय प्रदेशात अल्पशा प्रमाणात लोकसंख्या आढळते. ग्रीनलँडमध्ये तर दर ८० चौ.कि.मी. क्षेत्रात १ व्यक्ती आढळते.
३) उंच पर्वतीय प्रदेश:-
एकंदरीत सर्वच बाबतीत प्रतिकूल परिस्थितीमुळे उंच पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते. हिमालय, अलास्का, रॉकीज, अँडीज, मध्य आशियातील पर्वतीय प्रदेश कमी लोकसंख्येचे आहेत. साधारणतः २५०० मीटरपेक्षा अधिक उंचावरील प्रदेशात लोकवस्ती जवळजवळ नसतेच, काही अपवाद वगळता उदा. भारतातील पहेलगाम गुलमर्ग (२६०० मी.) लेह (४६०० मी.) तिबेटामधील ल्हासा (३३५० मी.).
४) सदाहरित विषुववृत्तीय अरण्याचे प्रदेश:-
या प्रदेशातही लोकसंख्या फारच विरळ आहे. उष्ण व दमट हवामान, घनदाट जंगल, उपद्रवी कीटकांचा प्रादुर्भाव, त्से-त्से माशांचा उपद्रव, रोगट हवामान अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे लोकसंख्येची घनता फारच कमी आढळते. उदा. ॲमेझॉन व कांगो नदीचे खोरे, आग्रेय आशियातील बेटे (जावा सोडून) इत्यादीचा समावेश या विभागात होतो. अशा प्रकारे लोकसंख्येच्या घनतेनुसार लोकसंख्येचे जागतिक वितरण झालेले आढळते.
2.4 लोकसंख्या संकल्पना: (Concepts of population)
लोकसंख्येच्या संकल्पना
१) पर्याप्त लोकसंख्या (optimum population)
२) न्यूनतम लोकसंख्या (minimum or under population)
३) अतिरिक्त लोकसंख्या (Over population)
१) पर्याप्त लोकसंख्या (optimum population)
प्रस्तावना:
पर्याप्त लोकसंख्या हि अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. पर्याप्त लोकसंख्या ही आदर्शवत लोकसंख्या मानली जाते. या लोकसंख्येला सुयोग्य लोकसंख्या, उचित लोकसंख्या, इष्टतम लोकसंख्या अश्या संज्ञा वापरल्या जातात.
एखाद्या प्रदेशाच्या दृष्टीने किती लोकसंख्या म्हणजे पर्याप्त लोकसंख्या हे निश्चित ठरवता येत नाही.
पर्याप्त लोकसंख्या ही प्रदेशाचे स्थान, उपलब्ध साधन संपत्ती, तांत्रिक विकास, सामाजिक संरचना, लोकसंख्येची गुणवत्ता इत्यादी घटकावर अवलंबून असते.
वरील वैशिष्ट्यांचा विचार केल्यास संयुक्त संस्थाने, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशात पर्याप्त लोकसंख्या आहे हे दिसून येते.
पर्याप्त लोकसंख्या ची पातळी गाठण्यासाठी पुढील दोन अवस्था उपयुक्त ठरतात.
१) एखाद्या प्रदेशात कमी लोकसंख्या असते. तेथे लोकसंख्या वाढीला भरपूर वाव असतो व वाढलेली लोकसंख्या सामावून घेतली जाते. नंतर मात्र एका स्थितीमध्ये लोकसंख्या व साधन संपत्ती समसमान किंवा संतुलित होतात.
२) एखाद्या प्रदेशात लोकसंख्या फारच जास्त अतिरिक्त असते पण शासन किंवा लोकांच्या प्रयत्नांमधून निसर्ग, साधन संपत्ती, उद्योग, व्यापार, तंत्रज्ञानाचा विकास होतो व दरडोई उत्पन्न वाढते.
गरिबी, अज्ञान नष्ट होते. सर्व गरजा पूर्ण केल्या जातात. लोकसंख्येच्या समस्यांची तीव्रता कमी होते. लोकसंख्या व साधन संपत्ती मध्ये समतोल निर्माण होतो.
पर्याप्त लोकसंख्या या संकल्पनेचा प्रथम उच्चार प्राध्यापक एडविन कॅनन यांनी केला;
वेगवेगळ्या तज्ञांनी पर्यंत लोकसंख्येच्या पुढीलप्रमाणे व्याख्या केल्या आहेत-
१)
प्रा. डाल्टन:
“ दरडोई जास्तीत जास्त (कमाल) उत्पन्न देणारी लोकसंख्या म्हणजे पर्याप्त लोकसंख्या होय”.
२)
रॉबिंस
“जी लोकसंख्या कमाल मोबदला किंवा उत्पन्न प्राप्त करते तिला उच्च प्रतीची (बेस्ट Best) किंवा पर्याप्त लोकसंख्या म्हणतात”.
कार सन्डर्स
“पर्याप्त लोकसंख्या म्हणजे जास्तीत जास्त आर्थिक कल्याण प्राप्त करणारी लोकसंख्या होय”
कॅनन
“एखाद्या देशात दिलेल्या कालावधीमध्ये अत्युच्च उत्पन्न मिळते. उत्पन्न कमविणाऱ्या मजुरांची संख्या घटली किवा वाढली तर त्याचा उत्पन्नाच्या चढ-उतारावर परिणाम होतो. अत्युच्च उत्पन्न प्राप्त करणाऱ्या लोकसंख्येला पर्याप्त लोकसंख्या असे म्हणतात”.
पर्याप्त लोकसंख्येची वैशिष्ट्ये
दरडोई उत्पन्न जास्त असते.
२ ) राहणीमानाचा दर्जा उच्च असतो.
३ ) सर्वांना रोजगार उपलब्ध असतात.
भिकारी जवळजवळ नसतेच.
लोकसंख्येची संरचना स्थिर असते.
उपलब्ध साधनसंपत्तीचा व साधनांचा सुयोग्य वापर केला जातो.
परावलंबी लोकसंख्येचे प्रमाण अत्यल्प असते.
भारतात 1930 ते 1950 या काळात पर्याप्त लोकसंख्या होती.
1950 नंतर लोकसंख्या वेगाने वाढली पण नैसर्गिक साधन संपत्तीचा विकास व साधन संपत्तीचे संरक्षण योग्य पद्धतीने केले नाही त्यामुळे आता भारताची लोकसंख्या अतिरिक्त झालेली आहे.
जगात चीन व जपान हे देश जास्त लोकसंख्येचे म्हणून प्रसिद्ध होती पण गेल्या तीस वर्षांत या देशांनी लोकसंख्येची कमालीचे नियंत्रण केले व पर्याप्त लोकसंख्येची स्थिती प्राप्त केली.
लोकसंख्येचा संख्यात्मक त्रास होऊ नये लोकसंख्येची गुणात्मक वाढ हि राष्ट्राला वैभव प्राप्त करून देऊ शकते.
पर्याप्त लोकसंख्या ची पातळी सर्व राष्ट्रांमध्ये सारखी असू शकत नाही ही पातळी स्थिर नसते देशाच्या साधनसंपत्तीच्या प्रमाणानुसार उत्पादन क्षमतेवर लोकसंख्येच्या गुणवत्तेवर व कार्यक्षमतेवर हे अवलंबून आहे.
२) न्यूनतम लोकसंख्या ( Under Or Minimum Population)
प्रस्तावना Introduction
लोकसंख्येची वाढ होत असताना दरडोई उत्पन्नाचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत देशाला न्यूनतम लोकसंख्येचा देश म्हणतात.
अशा देशाना लोकसंख्या सामावून घेण्याची कुवत असते.
न्यूनतम लोकसंख्या असलेल्या राष्ट्रात व प्रदेशात लोकसंख्येपेक्षा नैसर्गिक, आर्थिक साधन संपत्तीचा विकास भरपूर झालेला असतो.
नैसर्गिक व आर्थिक साधन संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध असते, राहणीमानाचा दर्जा उंचावलेला असतो.
नैसर्गिक आर्थिक साधन संपत्तीच्या तुलनेने लोकसंख्येचा आकार लहान असतो. लोकसंख्या वाढीचा दर मंद असतो. त्यामुळे उत्पादन जास्त असते आणि उत्पन्नावर अवलंबून राहणारी लोकसंख्या कमी पडते अशी परिस्थिती आढळते.
नैसर्गिक साधनसंपत्तीच्या विकासाला उपलब्ध मनुष्यबळ कमी पडते. अशा ठिकाणी लोकसंख्या वाढीला उत्तेजन द्यावे लागते. नवीनतम लोकसंख्येच्या प्रदेशात साधनसंपत्तीच्या विकासाला भरपूर संधी असते हे न्यूनतम लोकसंख्या प्रगतीचे लक्षण होय.
जास्त उत्पादनामुळे कमाईची बचत होते भांडवल निर्मिती होते.
थोडक्यात म्हणजे ‘भरपूर साधन संपत्ती व उच्च राहणीमान असलेली कमी प्रमाणातील लोकसंख्या म्हणजे न्यूनतम लोकसंख्या होय’.
उदा: जर्मनी फ्रान्स न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया स्वीडन हे न्यूनतम लोकसंख्या देश आहेत लोकसंख्या ही मुख्यतः प्रगत देशांमध्ये आढळून येते.
व्याख्या:
‘उपलब्ध साधनसंपत्तीचा भरपूर व पुरेपूर वापर करण्यासाठी देशातील लोकसंख्या कमी पडते अशा लोकसंख्येस न्यूनतम लोकसंख्या असे म्हणतात’.
उदा: ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, कॅनडा, रशिया, जर्मनी, फ्रान्स,स्वीडन हे देश अशा लोकसंख्येची उदाहरणे आहेत.
न्यूनतम लोकसंख्येची वैशिष्ट्ये:
१) राहणीमानाचा दर्जा उच्च असतो.
२) २) साधन संपत्तीच्या विकासासाठी मनुष्यबळ कमी पडते.
३) स्थलांतरित लोकसंख्या सामावली जाऊ शकते.
४). मनुष्यबळ कमी असल्याने व्यवसायांचे यांत्रिकीकरण होते.
५) लोकसंख्या वाढीचा वेग कमी असतो.
न्यूनतम लोकसंख्या चे फायदे:
१)
साधन संपत्ती वरील भार कमी:
पाणी, जमीन, खनिजे, वनस्पती यावरील ताण कमी असतो त्या विपुल प्रमाणात उपलब्ध असतात.
२)
निर्यात व्यापारात वृद्धी:
उत्पादन वाढ होते मात्र त्याला न्यूनतम लोकसंख्येमुळे मागणी कमी असल्यामुळे निर्यातीच्या संधी निर्माण होतात व निर्यात व्यापार वाढतो.
३)अवास्तव नागरीकरण अस मर्यादा:
कमी लोकसंख्या मुळे मोठी नगरे निर्माण होत नाही नागरिक समस्या निर्माण होत नाही.
पर्यावरणीय समतोल राखला जातो:
साधन संपत्तीचा अवाजवी अतिरेकी वापर होत नाही अजून करणे ही मर्यादित त्यामुळे पर्यावरण स्वच्छ संतुलित राहते.
शेतीप्रधान व्यवसायाचा विकास:
शेतीप्रधान देशांमध्ये शेती व पशुपालन यासारखे व्यवसाय करण्यास मोठा वाव व संधी असते.
न्यूनतम लोकसंख्येचे तोटे:
न्यूनतम लोकसंख्येत तोटे पुढील प्रमाणे आहे.
१)श्रमपुरवठाचा अभाव:
पुरुष प्रमाणात मनुष्यबळाअभावी वेगवेगळ्या व्यवसायासाठी मजुरांची कमतरता भासते.
२)मर्यादित स्थानिक बाजारपेठ:
कमी व विरळ लोकसंख्येमुळे उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ फारच मर्यादित असते.
३)सेवा क्षेत्रांचा विकास कमी होतो.
४)
देशाची लोकसंख्या कमी असल्याने लष्करी सामर्थ्य कमी असते त्यामुळे देशाचे संरक्षण धोक्यात येऊ शकते.
३. अतिरिक्त लोकसंख्या(Over population)
प्रस्तावना:
लोकसंख्येच्या वाढीमुळे दरडोई उत्पन्नाचे प्रमाण कमी होते. अशा प्रदेशातील लोकसंख्या अतिरिक्त लोकसंख्या झालेली असते. तेथील साधन संपत्ती लोकसंख्येच्या आकारापेक्षा अपुरी पडते. लोकांच्या प्राथमिक मूलभूत अन्न, वस्त्र, निवारा या गरजाही पूर्ण होऊ शकत नाही. बहुसंख्य लोक गरिबीचे जीवन जगतात लोकसंख्येत अमर्याद वाढ होते तेथे अतिरिक्त लोकसंख्या असते. वर्तमानकालीन उत्पादनाचे प्रमाण लोकसंख्येला जेव्हा अपूर्ण ठरते व उत्पादन वाढीसाठी पोषक परिस्थिती असते तेव्हा अश्या प्रदेशात सापेक्ष अतिरिक्त लोकसंख्या असते. लोकांचा राहणीमानाचा दर्जा अगदी खालच्या पातळीचा असतो साधनसंपत्तीचा वापरही जास्त प्रमाणात करण्यात आलेला असतो पण लोकांच्या गरजा पूर्ण होत नाही अशा प्रदेशात निरपेक्ष अतिरिक्त लोकसंख्या असते. जपान ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इटली या विकसित देशांमध्ये अतिरिक्त लोकसंख्येचे काही प्रदेश आहेत. पण
जास्त उत्पन्नामुळे लोकसंख्या अतिरिक्त झाले असे अजूनही जाणवत नाही. आशियातील भारत श्रीलंका पाकिस्तान बांगलादेश इंडोनेशिया या देशामध्ये अतिरिक्त लोकसंख्या आढळून येते. भारतात
2001मध्ये दारिद्र रेषेखालील लोकांचे प्रमाण 36 टक्के आहे.
मानव नेसरी आर्थिक उत्पादने यांच्यात समतोल राहत नाही व लोकांचा राहणीमानाचा दर्जा बसलेला असतो लोकांच्या प्राथमिक गरजाही पूर्ण होऊ शकत नाही तेव्हा लोकसंख्या अतिरिक्त होते. अतिरिक्त लोकसंख्येच्या प्रदेशात गरिबी बेकारी अज्ञान भ्रष्टाचार कुपोषण या समस्या निर्माण होतात. आफ्रिका व आशियातील अनेक देश या पाथरीत जीवन जगतात.लोकसंख्या अतिरिक्त झाली की उत्पादन साधने अपुरी पडतात गुणवत्ता कमी होते नैतिक अधःपतन होते.
व्याख्या:
‘देशातील उपलब्ध साधनसंपत्तीचा विकास करण्यास आवश्यक असणाऱ्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असते अशा लोकसंख्येत अतिरिक्त लोकसंख्या असे म्हणतात’.
अर्थतज्ञ क्लार्क यांनी अतिरिक्त लोकसंख्येचे खालील दोन प्रकार सांगितले आहेत.
अ)
निरपेक्ष अतिरिक्त लोकसंख्या:
उपलब्ध साधन संपत्तीच्या तुलनेने लोकसंख्या जास्त असते अशा लोकसंख्येत निरपेक्ष अतिरिक्त लोकसंख्या म्हणतात. उदा:
भारत चीन पाकिस्तान बांगलादेश इ.
ब)
सापेक्ष अतिरिक्त लोकसंख्या:
एखाद्या देशामध्ये संपत्ती साधनांचा पूर्ण व नियोजित वापर न केल्यामुळे जी अतिरिक्त लोकसंख्या निर्माण होते तिला सापेक्ष अतिरिक्त लोकसंख्या म्हणतात. उदा: अतिरिक्त लोकसंख्या ची वैशिष्ट्ये.
१. जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यात अडचणी येतात.
२. साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो.
३) साधनसंपत्ती व विकास यातील संतुलन नष्ट होते.
४). साधन संपत्तीचा सुनियोजित विकास व विनियोग केला जात नाही.
५). शेतीची उत्पादकता कमी होते.
अतिरिक्त लोकसंख्या चे फायदे.
१) स्वस्त व मुबलक मजुरांची उपलब्धता अशा लोकसंख्येत ऊन होते शेतीप्रधान देशात अशा मजुरांची आवश्यकता असते.
२) मोठी स्थानिक बाजारपेठ उपलब्ध होते दाट लोकसंख्येमुळे उत्पादित मालाला स्थानिक बाजारपेठेतच मागणी निर्माण होते.
३) साधनसंपत्तीच्या विकासासाठी व विनियोगासाठी लोकसंख्येची गरज असते. अन्यथा त्याचा वापर करता येत नाही.
४) लष्करी सामर्थ्य निर्माण करता येते मोठ्या लोकसंख्येमुळे मोठे सेंदल उभे करता येते व देशाचे संरक्षण करता येते.
अतिरिक्त लोकसंख्याचे तोटे.
१) मूलभूत सुविधांची टंचाई: अशा लोकसंख्येमुळे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या मूलभूत सुविधा सर्वांना पुरविणे कठीण होते.
२) दरडोई उत्पन्न घट: अधिक लोकसंख्येमुळे राष्ट्रीय उत्पन्न विभागले जाऊन दरडोई उत्पादनात घट होते त्यामुळे राहणीमानाचा दर्जा खालावतो.
३). साधन संपत्ती वर अवाजवी भार: मोठ्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी पाणी जंगले मुद्दा खनिजे इत्यादी साधन संपत्तीचा वापर वाढून त्यावर प्रचंड ताण येतो त्यांची संख्यात्मक व गुणात्मक ढासळत जाते.
४) शेत जमिनीचे विभाजन: ग्रामीण भागात शेत जमिनीचे विभाजन होते व तिची उत्पादकता कमी होते.
५) ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर: ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होत नाही त्यामुळे लोक शहरांकडे धाव घेऊ लागतात व तेथे अनेक नागरी समस्या निर्माण होतात.
६) अन्नटंचाई च्या समस्या: अतिरिक्त लोकसंख्येत पुरेसे सकस अन्न मिळत नाही अशा वेळी उपासमार कुपोषण भूकबळी या समस्या निर्माण होतात.
७) आर्थिक विकासात अडसर: अतिरिक्त लोकसंख्येत वाढत्या लोकसंख्येचे पालन-पोषण करणे हेच देशासमोरचे प्रमुख काम असते त्यामुळे विकासाच्या योजना राबविणे कठीण होते आर्थिक विकास मंदावतो.
८) बुद्धी नि:सारण: अतिरिक्त लोकसंख्येमुळे देशातील बुद्धिवंत लोक इंजिनिअर डॉक्टर शास्त्रज्ञ तंत्रज्ञ इत्यादी योग्य संधी मिळत नाही त्यामुळे त्यांचे विकसित देशांकडे स्थलांतर होते बुद्धी वहन होते त्यामुळे देशाची हानी होते.
९)
बालमजुरीच्या प्रमाणात वाढ: अतिरिक्त लोकसंख्या असलेल्या देशांत सर्वांना शिक्षण मिळत नाही बालमजुरीचे प्रमाण वाढते.
१०) हानी: नैसर्गिक साधन संपत्तीच्या किंवा युद्धजन्य परिस्थितीत दाट लोकवस्तीच्या प्रदेशाची प्रचंड हानी होते.