प्रकरण १. विज्ञान व तंत्रज्ञान परिचय
१.१
वैज्ञानिक विचार (वैज्ञानिक दृष्टीकोन)
मनुष्य
हा एकेकाळी निसर्गाचा गुलाम होता पण त्याच निसर्गावर आता तो आपली हुकूमत गाजवत आहे.
हा बदल विज्ञानामूळेच घडून आला. मानवी संस्कृतीचा विकास,
निसर्गातील रहस्ये उकल, अंधश्रध्दांचे
निर्मुलन इ. मध्ये विज्ञानाची कामगिरी महत्वाची आहे.
विज्ञानाच्या
अध्ययनात वैज्ञानिक दृष्टीकोनाला महत्व आहे. मानवी जीवनातील विविध प्रश्नांच्या
अध्ययनासाठी हा दृष्टीकोन अत्यंत उपयुक्त ठरतो. वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे
कोणत्याही विषयाच्या पध्दतशीर आणि तर्कशुध्द अध्ययनासाठी अवलंविण्यात येणारा
विशिष्ट दृष्टीकोन होय. विज्ञानाचा शोध घेण्यासाठी आपल्या जवळ चिकित्सक वृत्ती,
चिकाटी व अंधश्रध्दांपासून दूर जाण्याची इच्छा असावी लागते यालाच
वैज्ञानिक दृष्टीकोन असे म्हणतात.
१.१.१
वैज्ञानिक दृदृष्टिकोनाची वैशिष्टये पुढीलप्रमाणे :
एखादया
गोष्टीविषयी शंका निर्माण होणे हे चिकित्सक वृत्तीचे ध्योतक आहे. शब्द प्रामाण्य व
ग्रंथप्रामाण्य मान्य नाही / अनुभव महत्वाचा संशोधनामध्ये पूर्वग्रहाला स्थान
नसावे. अभ्यासकाने वस्तुनिष्ठ दृष्टीने निरीक्षण करणे गरजेचे. वैज्ञानिक
दृष्टीकोनात प्रत्यक्ष अनुभूतीला महत्व आहे.
विज्ञान
म्हणजे काय?
विज्ञान
ही संज्ञा लॅटीन भाषेतील "Scire"
म्हणजे "जाणणे" या शब्दावरून इंग्रजीमध्ये 'Science'
हा शब्द आला आहे. विज्ञान व शास्त्र या दोन्ही संज्ञा वेगवेगळया
आहेत. "शास्त्र म्हणजे कोणत्याही विषयाची सुसंगत व तर्क निष्ठ मांडणी
होय." विज्ञानातील अनेक तत्वे सुसंगतरित्या मांडण्यात आली आहेत त्यामुळे
विज्ञानाला शास्त्र म्हणता येईल.
१.
"विज्ञान म्हणजे प्रयोगक्षम ज्ञान होय."
२.
“विश्वातील विविध घडामोडीसंबंधी मानवाने संपादन केलेले सुत्रबध्द ज्ञान म्हणजे
विज्ञान होय."
३.
"विज्ञान म्हणजे विश्वातील मुलभूत ज्ञानाचा (तत्वांचा / नियमांचा) शोध घेणारे
शास्त्र होय."
४.
"वाहयपरिस्थितीवर स्वामित्व मिळविण्यासाठी माणसाने केलेला बुध्दीपुरस्कर
प्रयत्न म्हणजे विज्ञान होय."
५.
"निरीक्षण, प्रयोग याव्दारे मिळवलेले पध्दतशीर
मांडणी केलेले व शिस्तबध्द ज्ञान म्हणजे विज्ञान होय."
मानवाकडून
ज्ञान मिळविण्यासाठीची प्रकिया कुतूहल, जिज्ञासा
व विचाराव्दारे घडते. याचे ज्ञान व शास्त्रीय ज्ञान असे दोन प्रकार पडतात.
तंत्रज्ञान
म्हणजे काय?
व्यवहारामध्ये
ब-याच वेळा विज्ञान व तंत्रज्ञान हे दोन्ही शब्द समान अर्थाने वापरले जातात.
शास्त्रज्ञ निसर्गा त दडून राहिलेल्या नियमांचा शोध घेतात त्यातून विज्ञानाची
निर्मिती होते. त्या नियमांचा व्यवहारात जेव्हा वापर होतो त्यास तंत्रज्ञान
म्हणतात. थोडक्यात, "विज्ञानाचा आशय
ज्ञान मानले तर तंत्रज्ञानाचा आशय त्या ज्ञानाचा व्यवहारातील उपयोग होय."
विज्ञान
व तंत्रज्ञानातील फरक :
वैज्ञानिक
शोधांचा आधार घेऊन मानवाने तंत्रज्ञानाचा विकास केला व त्यातून आपली प्रगती
साधण्याचा प्रयल केला.
१. वाफेच्या अंगी असणा-या शक्तीचा
शोध म्हणजे विज्ञान, तर त्या शक्तीच्या जोरावर
चालणा-या रेल्वे इंजिनची निर्मिती म्हणजे, तंत्रज्ञान.
२. विदयूत तरंगांचा शोध म्हणजे
विज्ञान,
तर त्या आधारे निर्माण झालेला रेडिओ म्हणजे तंत्रज्ञान.
३. न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम,
“किया व प्रतिक्रिया समान असतात व त्या ऐकमेकांच्या विरूध्द दिशेने
कार्य करतात" म्हणजे विज्ञान, तर त्यावर आधारीत
अग्निबाणाची निर्मिती म्हणजे तंत्रज्ञान.
४. रोगावरील संशोधन व कारणे शोधणे
विज्ञान लस निर्मिती तंत्रज्ञान
५. अणुपासून मिळणारी शक्ती विज्ञान
पाणबुडी निर्मिती – तंत्रज्ञान, अशी अनेक उदाहरणे देता येतील.
बहुतेक
वेळा विज्ञान हे मानवी गरजेतून / विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठीच उदयास येते.
विज्ञान ही अखंड प्रक्रिया आहे. मानवी जीवन सुखी करण्यासाठी व निसर्गावर मात करण्यासाठी
विज्ञान व तंत्रज्ञान खुपच महत्वाचे ठरले आहे.
१.१.२
विज्ञान, तंत्रज्ञानाचे स्वरूप :
विज्ञान,
तंत्रज्ञानातील फरक पहाता त्यांचे स्वरूप भिन्न असते. विज्ञानाचा
मुख्य हेतू ज्ञानसाधना हा आहे. आपण ज्या विश्वात राहतो त्या विश्वातील अनेक
घडामोडी का घडतात? कशा घडतात? यांचा
वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून अभ्यास करून त्यासंबंधीचे निश्चित ज्ञान प्राप्त करणे,
त्यामागील कार्यकारण संबंध तर्काच्या आधारे शोधणे आणि त्यावरून काही
सामान्य नियम प्रस्तापित करणे, हे विज्ञानाचे काम आहे.
ज्ञानाची तहान आणि प्रेम ही विज्ञानाची प्रेरक शक्ती आहे. निसर्गनियम जाणून घेणे,
निसर्गातील रहस्यांची उकल करणे हे विज्ञानाचे मुख्य उद्दिष्टये आहे.
मानवाला ज्ञानाचा खजिना उपलब्ध करून देणे हे विज्ञानाचे कार्य आहे. त्यासाठी
विज्ञान नवनवीन शोधांचा ध्यास घेत असते.
तंत्रज्ञानाचे
स्वरूप विज्ञानाइतके व्यापक नसते. मानवाने लावलेल्या शोधांचा प्रत्यक्ष व्यवहारी
जीवनात उपयोग करणे हा तंत्रज्ञानाचा उद्देश असतो. मानवी जीवन सुखी करणे,
आधुनिक यांत्रिक सुविधा निर्माण करणे, मानवी
शरीराचे हाल कमी करणे यासाठी वेगवेगळया क्षेत्रामध्ये यंत्राची निर्मिती केली आहे.
विज्ञान
व तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुखी समृध्द बनले, असे
असले तरी यांच्यामुळे काही समस्याही निर्माण झाल्या आहेत. अण्वस्त्र निर्मिती,
उदयोगांमुळे होणारे प्रदूषण, शहरांची वाढ,
इ. चा यामध्ये समावेश होतो. पण योग्य अयोग्यतेचा विचार करून मानवाने
विज्ञान व तंत्रज्ञान यांचा वापर केल्यास नक्कीच मानवी कल्याण होते.
१.१.३
विज्ञान, तंत्रज्ञानाची व्याप्ती /
अभ्यासक्षेत्र :
खगोलशास्त्र,
हवामानशास्त्र, प्राणीशास्त्र, मृदाशास्त्र, रसायनशास्त्र, शोधणे
व सामान्य नियम प्रस्थापित करण्याचे कार्य विज्ञानाचे आहे. भौतिकशास्त्र, संख्याशास्त्र, निसर्गातील तत्वे
मानवाने
अवकाशातील ग्रह ता-यांचा शास्त्रशुध्द अभ्यास करून खगोल विज्ञानाचा पाया घातला.
निसर्गातील वेगवेगळया वनस्पती पाना-फुलांचा अभ्यास करून वनस्पतीशास्त्राचा पाया
घातला तसेच प्राणीशास्त्र, जीवशास्त्र, पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, संख्याशास्त्र अशा अनेक
विज्ञानशास्त्रांचा मानवाने शोध लावला आहे. मानवाच्या कुतूहलाला अंन्त नाही तसेच
नवीन शास्त्राच्या शोधालाही अंत नाही. त्यामुळे विज्ञानाचा विकास अनंतपणे होत
राहील व त्याची व्याप्ती अनंतपणे वाढत राहील यात शंका नाही.
तंत्रज्ञानाची
व्याप्ती विज्ञाना इतकीच व्यापक आहे. विज्ञानातुन अनेक यंत्राची निर्मिती होते
त्यास तंत्रज्ञान म्हणतात. ज्याचा मुख्य हेतु मानवी शरीराचे हाल कमी करणे व
निसर्गावर विजय मिळवणे हा असतो. यातुनच अनेक क्षेत्रांमध्ये यंत्रांची निर्मिती
झाली. वाहतुक, संदेशवहन, आरोग्य,
व्यापार, शिक्षण, उदयोग,
उर्जा, वसाहती, शेती इ.
अनेक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढता आहे. थोडक्यात, विज्ञान
व तंत्रज्ञानाशिवाय मानवी संस्कृतीचे एक पावुलही पुढे पडणार नाही ही आजची स्थिती
आहे. यावरुन विज्ञान व तंत्रज्ञानाची व्याप्ती किती विस्तृत आहे हे लक्षात येई ल.
१.२
शास्त्रीय (वैज्ञानिक) विचार पध्दतीतील मुलभूत संकल्पना :
मानव
हा विचार करतो म्हणूनच तो इतर प्राण्यांहून श्रेष्ठ आहे. वैज्ञानिक शोध हेही
वैचारिक स्वरूपाचे असतात. थोडक्यात विज्ञान हे विचारांच्या सहाय्याने उभे राहते.
वैज्ञानिक विचार किंवा विज्ञान म्हणजे काय? ते कसे
ओळखावे यासाठी या संकल्पना महत्वाच्या ठरतात.
१.
वैज्ञानिक सत्य हे वस्तुनिष्ठ असते :
विज्ञान
हे वास्तवावर आधारलेले असते. तसेच ते व्यक्तिनिष्ठ नसून ते वस्तुनिष्ठ असते. उदा.
आपल्याला पृथ्वी सपाट दिसते परंतु ती गोल आहे हे वैज्ञानिकांनी शोधून काढले सुर्य
हा पृथ्वीभोवती फिरतो ही पूर्वीची समजूत होती परंतु कोपर्निकसने सुर्याभोवती
पृथ्वी व इतर ग्रह फिरतात हे सत्य शोधून काढले. व्यक्तीला सृष्टीतील घटना कशा
दिसतात यापेक्षा त्या प्रत्यक्षात तशा का आहेत व कशा घडतात हे शोधणे विज्ञानाचे
काम आहे.
२.
वैज्ञानिक सत्याचा इंद्रियास अनुभव येतो :
विज्ञानात
प्रत्यक्ष अनुभूतीला विषेश महत्व असते. सुक्ष्म निरीक्षण व प्रयोग यांच्याव्दारे
या अनुभूतीची प्रचिती घेता येते. उदा. ऑक्सीजन व हायड्रोजन यांचा संयोग होताच पाणी
तयार होते व ते आपणास दिसते. अणु डोळयांनी दिसत नसला तरी त्याचे अस्तित्व,
शक्तीची प्रचिती आपणास येते.
ज्या
सत्याची इंद्रियास प्रचिती येत नाही त्यास वैज्ञानिक सत्य म्हणता येणार नाही. उदा.
ईश्वराचा साक्षात्कार
३.
वैज्ञानिक सत्य हे सार्वजनिक सत्य असते :
वैज्ञानिक
सत्य म्हणजे कोणाची मक्तेदारी नाही पाहिजे. उदा. आईन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा
सिध्दांत आवश्यक ती बुध्दीमत्ता असली की ते सत्य व्यक्तीस समजलेच कालपरत्वे व
स्थानपरत्वे वैज्ञानिक सत्यामध्ये वदल होत नाही.
४.
विज्ञान निसर्गातील समरूपता मानते :
वैज्ञानिक
निसर्गातील समरूपता मानतात निसर्गामध्ये विशिष्ठ व्यवस्था असते. काही नियम असतात
त्यानुसारच निसर्ग कार्यरत असतो. नैसर्गिक किया वर्षानुवर्षे नियमितपणे घडत असतात.
त्यात सुसुत्रता असते. निसर्ग नियमांचे सुत्रता असते उल्लंघन करत नाही. उदा जलचक,
अन्नसाखळी, कार्बनचक, नायट्रोजनचक
इ.
५.
विज्ञान निसर्गातील कार्यकारण संबंध मानते :
सृष्टीमधील
अनंत घटनेमागे काहींना कांही कारण असते कारणाशिवाय विश्वामधील कोणतीही घटना घडत नाही.
हे शास्त्रीय विचार पध्दतीतील मुलभूत सुत्र मानले जाते. विज्ञानात चमत्काराला
स्थान नाही. माणूस आजारी पडण्यामागे जंतूसंसर्गाचे कारण असते. परंतु सर्वच कारणे
मानवाला समजतातच असे नाही त्यातून अंधश्रध्दा निर्माण होतात. कार्यकारण संबंध
वैज्ञानिकांनी मानला नाही तर विज्ञानाची प्रगतीच होऊ शकणार नाही.
१.३
वैज्ञानिक अभ्यास पध्दती :
वैज्ञानिक
संशोधनासाठी ज्या विशिष्ठ अभ्यास पध्दतीचा अवलंब केला जातो त्यास वैज्ञानिक अभ्यास
पध्दती असे म्हणतात. सत्याचा शोध हे विज्ञानाचे काम असते त्यासाठी शास्त्रज्ञाला
विविध टप्यामधून जावे लागते. वैज्ञानिक संशोधनात एक प्रकारची शिस्त असणे गरजेचे
असते. ही शिस्त निर्माण करण्याचे काम ही वैज्ञानिक अभ्यास पध्दती करते. आधुनिक
विज्ञानाचा विकास वैज्ञानिक अभ्यास पध्दतीव्दारेच झालेला आहे. ही पध्दती फ्रान्सीस
बेकन यांनी शोधून काढली.
१.
समस्या तयार करणे:
वैज्ञानिक
संशोधनाची सुरवात एखादया समस्येपासून होते. सृष्टीचे अवलोकन करत असताना संशोधकाला
अनेक घडामोडी घडताना दिसतात. परंतु सर्वावर तो विचार करू शकत नाही. त्याऐवजी
त्याला एखादी समस्या निवडावी लागते व तिची उकल करण्याचा तो प्रयत्न करतो असे करत
असताना अनेक प्रश्न व शंका उपस्थित होतात आणि त्यातूनच अभ्यासाची व संशोधनाची दिशा
व स्वरूप निश्चित होते. यालाच समस्या सुत्रण असे म्हणतात.
उदा.
विशिष्ट प्राण्याला होणा-या विशिष्ट रोगावर संशोधन करावयाचे ठरवणे व त्यासंबंधीची
माहिती उदा. हा रोग त्या प्राण्याला का होतो? केव्हा
होतो? त्याची लक्षणे काय? इ. अनेक
प्रश्न निर्माण होतात यातूनच संशोधनाची दिशा निश्चित होते.
2.
तपासणी:
समस्या
- सुत्रणानंतर आपल्याला त्या समस्येच्या संदर्भातील माहितीची जमवाजमव करावी लागेल
त्यासाठी निरीक्षण अत्यंत महत्वाचे ठरते. पुरेशी माहिती व भक्कम पुरावा
मिळवण्यासाठी निरीक्षणाचा वापर होतो. पण निरीक्षण म्हणजे नुसतेच पाहणे नव्हे.
निरीक्षण हे सहेतूक असले पाहीजे. ते आपल्या अभ्यास विषयाशी संबंधीत बाबींशी निगडीत
हवे. ते हेतुपूर्वक बारकाईने व डोळसपणे व्हावयास हवे. उदा. एडवर्ड जेन्नरदेवी
रोगावरील संशोधन - देवीचा रोग पूर्वी केव्हा झाला होता,
कसा झाला, किती बळी पडले, कोण वाचले, त्यांनी काय उपाययोजना केली इ.
तसेच
निरीक्षणामध्ये पुर्वग्रह असता कामा नये ते तटस्थ वृत्तीने होणे आवश्यक आहे. उदा.
अणू अविभाज्य आहे असे शास्त्रज्ञांनी अगोदरच मनाशी ठरवले असते तर अणूचे विभाजन
करून आपण त्यापासून प्रचंड उर्जा व शक्ती मिळवू शकलो नसतो.
3.
वापर:
प्रयोग
हा देखील निरीक्षणाचाच एक विशिष्ठ प्रकार होय म्हणूनच यास प्रायोगिक निरीक्षण असे
म्हणतात. फक्त निरीक्षणात अभ्यासकाला परिस्थितीवर अवलंबून रहावे लागते. तर
प्रयोगामध्ये आपणास हवी तशी घटना घडवून आणली जाते. अभ्यासकाचे परिस्थितीवर पुर्ण
नियंत्रण असते. प्रयोगात आपणास हवे तसे निरीक्षण करता यावे म्हणून शास्त्रीय
उपकरणांची मदत घेतली जाते. थोडक्यात प्रयोग व निरीक्षण या बाबी एकाच वेळी
शास्त्रज्ञांच्या हातून होत असतात. दोष-अपूर्ण निरीक्षण,
व दुर्निक्षण.
४.
परिणामांचे विश्लेषण व वर्गीकरण :
प्रयोग
व निरीक्षण यातून संबंधीत समस्येविषयी भरपुर माहिती जमा होते. या माहितीचे साम्य
भेदानुसार वेगवेगळ्या गटात विभाजन केले जाते. जमा झालेली माहिती ही गुंतागुंतीची व
भरपूर असते. वर्गीकरणामुळे माहितीची योग्य व्यवस्था लावली जाते. त्यामुळे अध्ययनात
सुलभता येते व सिध्दांत कल्पना मांडण्यास मदत होते.
५.
दृष्टीकोन / सिद्धांत गृहीतक:
उपलब्ध
माहितीचे वैज्ञानिक पध्दतीने वर्गीकरण केल्यानंतर त्या आधारे संशोधकाला संबंधीत
समस्येची उकल करण्याच्या दृष्टीने काही आडाखे बांधणे शक्य होते व तो निष्कर्षाप्रत
पोहचतो. पण सदर निष्कर्ष पुरता सिध्द झालेला नसतो तो केवळ अंदाज असतो त्यासच
सिध्दांत कल्पना असे म्हणतात. सिध्दांत कल्पनेला वस्तुस्थितीचा आधार असतो.
६.
सामान्यीकरण :
सिध्दांतकल्पना
मांडल्यानंतर संशोधन प्रकिया पुर्ण होत नाही तर त्या सिध्दांत कल्पनेची सत्यता
पहाण्यासाठी वेगवेगळे प्रयोग व निरीक्षणे घेतली जातात. सिध्दांतकल्पना सिध्द झाली
तरच निश्चित स्वरूपाचा नियम तयार करता येतो. थोडक्यात सामान्यीकरण हे विज्ञानाचे
नियम किंवा तत्वे असतात.
७.
अग्रलेख:
पुर्वकथन
ही वैज्ञानिक पध्दतीची अंतिम अवस्था होय पुर्वकथन म्हणजे केवळ तर्क किंवा अंदाज
नसून त्यास वैज्ञानिक आधार असतो. वैज्ञानिक तत्वे व नियमांच्या आधारे केलेले हे
भाष्य असते. त्यामुळे ते अचुक व वस्तूनिष्ठ असते.
१.४
विज्ञान आणि अंधश्रध्दा :
भक्तीतून-श्रध्दा
तर भीतीतून अंधश्रध्दांची निर्मिती होते. विज्ञानात वैज्ञानिक पध्दतीचा अवलंब करून
तथ्ये किंवा घटनाविषयींचे ज्ञान मिळवले जाते. एखादी घटना नेमकी कोणत्या कारणाने
घडली ते शोधून काढणे, संशोधनाचे निष्कर्ष
पुन्हा पुन्हा तपासून पहाणे, प्रयोग, निरीक्षणातून
व वर्गीकरणातून ते सिध्द करणे या गोष्टी विज्ञानात येतात. तसेच ते पुर्वग्रह रहीत
व वास्तव असते.
अंधश्रध्दा
याच्या नेमक्या विरूध्द पायावर आधारलेल्या असतात. त्यांना पुराव्याचा आधार नसतो.
त्यांची सत्यता पडताळून पाहता येत नाही. थोडक्यात -
"वैज्ञानिक
चिकित्सेच्या आधारे, प्रत्यक्ष अनुभवाच्या
कसोटीवर ज्या श्रध्दा व वर्तन प्रकारांचा खरेपणा टिकत नाही अशा श्रध्दा व वर्तन
प्रकारांना अंधश्रध्दा म्हणतात."
“एखादया
समुदायाने प्राप्त केलेल्या ज्ञानपातळीशी विसंगत असलेल्या आणि कोणत्याही नसलेल्या
श्रध्दा व वर्तनप्रकार म्हणजे अंधश्रध्दा होय." ही सवळ पुराव्याचे पाठबळ
अंधश्रध्दांचा
उगम अज्ञानात असतो. अज्ञानामुळे लोकांच्या मनात भिती निर्माण होते त्यामुळे
निर्माण मानतात. आजही आधुनिक समाजामध्ये अनेक अंधश्रध्दा पहावयास मिळतात. ते
अंधश्रध्दा
१. महत्वाच्या कामानिमित्त बाहेर
जाणा-या व्यक्तिस 'कुठे' विचारल्यास काम 'कुंटले' असे
वाटणे.
२. मांजर आडवे जाणे व काम न होणे.
३. पाल अंगावर पडणे व काहीतरी वाईट
घडणे.
४. घराभोवती टिटवी ओरडणे व
कुणाच्यातरी मृत्यूची बातमी येणे.
५. गणेशचर्तुर्थीला चंद्र पहाणे
त्यानंतर एक वर्ष त्रासाचे असणे.
६. कोणत्याही वस्तूचे मोजमाप करताना
एक ऐवजी लाभ म्हणणे.
७. रात्रीच्या वेळी केर वाहेर टाकणे
लक्ष्मी बाहेर जाणे.
८. महादेवाचा गाभारा पाण्याने भरणे
पाऊस पडणे अशा काही अंधश्रध्दा भारतात आहेत.
९. घरात आरसा फुटणे,
जमिनीवरील भेगेवर पाय पडणे, घरात छत्री उघडणे
व १३ हा आकडा युरोपमध्ये अशुभ मानतात.
१०. ज्याच्याजवळ लोहचुंबक असतो त्यास
प्रेमभंगाचे दुःख सहन करावे लागते. अशा अंधश्रध्दाही युरोपमध्ये आहे.
लोकभ्रम
कसे निर्माण होतात :
एक
व्यक्ती महत्वाच्या कामासाठी वाहेर पडताना मांजर आडवे गेले व काम झाले नाही अशी
परिस्थिती योगायोगाने दोन तीन वेळा घडली की तो दुस-याला बोलतो. दुसरा तिस-याला
अशाप्रकारे हा लोकभ्रम समाजामध्ये फैलावतो.
शास्त्रज्ञांची/विज्ञानाची
कामगिरी :
विज्ञानामध्ये
लोकभ्रम / अंधश्रध्दांना स्थान नाही किंबहुना लोकभ्रम नष्ट करणे हे विज्ञानाचे काम
आहे. वैज्ञानिक अभ्यासपध्दतीत निरीक्षण, प्रयोग,
वर्गीकरण व सिध्दांत अशा प्रमुख पाय-या असल्याने विज्ञानापुढे
लोकभ्रम टिकत नाहीत. पाऊस पडण्यासाठी महादेवाचा गाभारा पाण्याने भरला. त्यादिवशी
पाऊस पडला. परत दुसरा दिवस, तिसरा दिवस असे अनेक दिवस
शास्त्रज्ञ करतील व हे सिध्द करतील की, महादेवाचा गाभारा
पाण्याने भरणे व पाऊस पडणे यांचा काहीही संबंध नाही. पाऊस पडण्यासाठी आकाशात
बाष्पयुक्त ढग असणे त्यांचे सांद्रीभवन होणे आवश्यक आहे.
अशाप्रकारे
वैज्ञानिक ज्ञानाच्या कक्षा जशा रूंदावत जातील तशा अंधश्रध्दाही कमी होत जातील.
मात्र हे आपोआप घडणार नाही त्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्विकार व त्याप्रमाणे
आपले वर्तन आवश्यक झाल्यास अंधश्रध्दा हळूहळू कमी होत जातील.
१.५
भारतीय विज्ञानाचा अभ्यास :
जगातील
प्राचीन संस्कृतीपैकी महत्वाची संस्कृती म्हणून भारतीय संस्कृतीचा विचार होतो.
१.
प्राचीन काळ:
संख्याशास्त्रातील
'शुन्य' याचा शोध असा गणिती यांनी लावला. 'दशमान पध्दती' चा शोध भारतीयांनी लावला. पहिला
आर्यभट्ट याने वर्गमुळ, घनमुळ पध्दती शोधल्या.
ब्रम्हगुप्ताने व्याज व्यवहार यासाठी गणिताचा वापर केला. महावीर यांनी शुन्याच्या
उपयोगाचे विवेचन केले. भास्कराचार्य यांनी गणितशास्त्रावर 'सिध्दांत
शिरोमणी' व 'लीलावती' हे ग्रंथ लिहीले त्याकाळात भूमितीशास्त्रातही संशोधन झाले होते.
ज्योतीषशास्त्रात
व खगोलशास्त्रात आकाशातील ग्रहता-यांची सुक्ष्म निरीक्षणे,
वर्षाचे बारा भाग (महीने), याबाबतचे संशोधन
प्राचीन भारतामध्ये झाले होते. आर्यभट्टानी पृथ्वीस सुर्याभोवती फिरण्यास लागणारा
कालावधी मोजला होता. वराहमिहीरने पृथ्वी ध्रुवाकडे चपटी आहे हे सांगीतले होते.
ब्रम्हगुप्तने गुरूत्वाकर्षण सिध्दांत मांडला होता.
वैदयकशास्त्रामध्ये
सुश्रुत,
चरक, नागार्जुन असे अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले.
पदार्थविज्ञान व रसायनशास्त्रात कणाद व कपिल हे शास्त्रज्ञ होऊन गेले.
२.
मध्ययुगीन कालखंड :
प्राचीन
कालखंडात विज्ञान, कला अशा विविध क्षेत्रात
मोठी प्रगती झाली होती. तक्षशिला, नालंदा अशी अभ्यासकेंद्रे
स्थापन झाली होती तेथे अनेक शास्त्रज्ञ निर्माण झाले. पण सातव्या शतकापासून हळूहळू
ज्ञानविज्ञानाचा हर्हास होऊ लागला व दहाव्या शतकापासून ते एकोणिसाव्या
शतकापर्यंतचा काळ भारतीय विज्ञान इतिहासात अंधारयुग मानले जाते. परकीय हल्ले,
राजकीय अस्थिरता, विदयाकेंद्रावर बंदी,
पंडीतांचे प्राबल्य इ. मुळे विज्ञानाचा शोध घेणे बंद झाले.
3.
आधुनिक युग:
इंग्रजांच्या
राज्यात भारतामध्ये शिक्षणाचा व शास्त्रांचा प्रसार झाला व जगदीशचंद्र वसू,
बिरवल सहानी, शांतीस्वरूप भटनागर, होमी भाभा, मेघनाथ सहाय, चंद्रशेखर
व्यंकट रामण, विक्रम साराभाई, जयंत
नारळीकर अशा काही महत्वाच्या शास्त्रज्ञांचा उदय झाला. भारताला स्वातंत्र
मिळाल्यानंतर भारत सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास होण्यासाठी अनेक
संस्था काढल्या व विविध क्षेत्रात प्रगती घडवून आणली.
इ.
क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी प्रयत्न केला गेला. नैसर्गिक संपत्तीचा शोध कृषी व
वैदयकशास्त्रामधील अणुविज्ञानाचा वापर इ. मध्येही भारत अग्रेसर आहे. जडपाणी उदयोग,
अणुस्फोट, अवकाश संशोधन, अग्निबाण, उपग्रहांची निर्मि ती, अग्निबाण प्रक्षेपण केंद्र, सागरसंशोधन केंद्र इ.
मध्येही भारतीय वैज्ञानिक अग्रेसर आहेत.
विज्ञान
आणि तंत्रज्ञानाशिवाय आपण प्रगती साधू शकणार नाही, याची
जाणीव भारतीयांनाही आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने चांगले प्रयत्न सुरू आहेत.
१.६
वैज्ञानिक प्रवृत्ती आणि समाजाची प्रगती :
आज
प्रगत समजल्या जाणा-या देशामध्येही चारशे पाचशे वर्षापूर्वी लोकभ्रम व अवैज्ञानिक
वृत्ती यांचे साम्राज्य होते. युरोपमध्ये १५ व्या शतकापासून बौध्दीक जागृती सुरू
झाली. यातूनच अनेक धाडशी संशोधक व शास्त्रज्ञ निर्मा ण झाले. कोपरनिकस,
बुनो, केप्लर, व्हेसॅलियस,
हॉर्वे, गिलबर्ट, गॅलिलिओ
यांचा त्यामध्ये समावेश होता. त्यांनी प्रायोगिक पध्दतीचा स्विकार करून निसर्गातील
नवनवीन सत्य उजेडात आणली. तत्कालीन समाजाला ते न पेलवणारे होते. धर्मग्रंथातील
गोष्टींशी या सत्याची सांगड वसत नव्हती. त्यामुळे त्यावेळच्या धर्मगुरूंनी या
शास्त्रज्ञांचा अनन्वीत छळ केला.
वैज्ञानिक
प्रवृत्तीचा उदय :
सतराव्या
शतकामध्ये विज्ञानाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला व ख-या अर्थाने
वैज्ञानिक शोधांच्या युगास सुरवात झाली. न्यूटनच्या शास्त्रीय शोधामुळे तसेच इतर
अनेक शास्त्रज्ञांच्या नवनवीन संशोधनामुळे लोककल्याण होऊ शकते हे समाजाला पटले
स्वाभाविकच इंग्लंड, फान्ससारख्या देशात
विज्ञानाचा अभ्यास करणा-या अनेक संस्था उदयास आल्या. शास्त्रज्ञ होणे व विज्ञानाचा
शोध घेणे म्हणजे प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले युरोपातील अंधश्रध्दाळू प्रवृत्ती,
ग्रंथप्रामाण्य व व्यक्तिप्रामाण्य मागे पडले व त्याची जागा
वैज्ञानिक प्रवृत्तीने घेतली.
न्यूटनच्या
कालखंडापर्यंत विज्ञानाची चांगली प्रगती झाली होती पदार्थविज्ञान,
रसायनशास्त्र, जीवशास्त्र अशा अनेक विषयात
मुलभूत स्वरूपाचे संशोधन झाले. अशा संशोधनामुळे जग अधिक सुरक्षित, अधिक सुखी व समृध्द बनले. युरोपियन समाजाने वैज्ञानिक प्रवृत्तीचा स्विकार
केल्याने त्यांचे सामर्थ्य व समृध्दी वाढली. भारतासारख्या देशाने वैज्ञानिक
वृत्तीचा स्विकार लवकर केला नाही म्हणून तो प्रगतशीलच राहिला.
विज्ञानामुळे
समाजाची प्रगती :
विज्ञानामुळे
समाजाची प्रगती होते तो सुखी बनतो. निसर्गावर तो सहज मात करू शकतो. म्हणून विज्ञान
महत्वाचे आहे.
१.
औदयोगिकीकरण :
कच्या
मालाचे रूपांतर जलदगतीने पक्यामालात करण्याचे काम उदयोगधंदयाच्या माध्यमातून होते.
म्हणजेच उदयोग हे विज्ञानाची देणगी आहे. वाष्प व विदयुत शक्तीवर चालणारी लहान मोठी
यंत्रे,
त्यांची कार्यप्रणाली या सर्वा 'चा संबंध
विज्ञानाशी येतो.
२.
आरोग्यविज्ञान :
पुर्वीच्या
काळी देवी, कॉलरा, प्लेग
यासारख्या रोगांनी लाखो लोक मृत्युमुखी पडत, गावेच्या गावे
ओस पडत. पण या अनेक रोगांवर शास्त्रज्ञांनी विजय मिळवला आहे. एडवर्ड जेन्नर यांनी
देवीची लस शोधून काढली. लुई पाश्चरने 'जंतू पासून रोग होतात'
हे सत्य शोधून काढले तसेच त्याने श्वानदंश रोगाची लस शोधून काढली.
रॉवर्ट कॉकने कॉलरा, बेहरींगने धनुर्वात व घटसर्प या
रोगावरील लसी शोधून काढल्या, तर जखम निर्जंतुक करण्यासाठी
कॉर्बालिक अॅसिडचा शोध जोसेफ लिस्टर यांनी लावला अनेक वैज्ञानिक साधनांची निर्मिती
झाली. कृत्रिम - हदय, फुफ्फुस याची निर्मिती झाली. खिश्चन
बर्नाड यांनी १९६७ साली - हदय रोपणाची शस्त्रकिया यशस्वी केली हे सर्व
विज्ञानामुळे शक्य झाले.
३.
दळणवळण :
रस्तेमार्ग,
रेल्वेमार्ग, जलमार्ग व हवाईमार्गाचा विकास
झाला मोटारी, रेल्वे, विमाने, जहाजे यांची निर्मिती होऊन जग जवळ आले. सेकंदामध्ये टेलिफोन, इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात संदेशांची देवाणघेवाण होऊ लागली.
दूरचित्रवाणीच्या सहाय्याने जगभरातील घटनांचे थेट प्रक्षेपण आपण घरबसल्या पाहू
लागलो. अशा अनेक गोष्टी विज्ञानामुळेच साध्य झाल्या.
४.
शेती विकास :
शेतीमध्ये
आधुनिक अवजारे, यंत्रांची निर्मिती, रासायनिक खते, किटकनाशके, जलसिंचनाच्या
आधुनिक पध्दती, संकरीत बियाणे, टिश्यू
कल्चर तंत्रज्ञान इ. मुळे शेती उत्पादनामध्ये झपाटयाने वाढ झाली.
५.
संरक्षण:
संरक्षणाच्या
दृष्टीने लढाऊ विमाने, रणगाडे, क्षेपणास्त्रे, अणूबॉम्ब] जैविक अस्त्रे इ.
महत्वाच्या संहारक शस्त्रांमुळे संरक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले.
याशिवाय
अणुशक्ती शोध, नॅनो टेक्नॉलॉजी, जैव तंत्रज्ञान, उपग्रह प्रक्षेपण, संगणकीकरण अशा अनेक आधुनिक पध्दतीमुळे मानवी जीवनामध्ये अनेक क्षेत्रात
अमुलाग्र बदल होत आहेत.