प्रकरण १. मृदा भूगोलाची मूलतत्त्वे

 १.१ प्रस्तावना

भूगोलशास्त्राच्या अध्यायनाची सुरवात खऱ्या अर्थाने .. पूर्व तिसऱ्या शतकात इरॅटोस्थेनिस पासून झाल्याचे स्पष्टपणे आढळून येते. तदपासून आज अखेर या विषयाचा आयाम वाढतच असल्याचे दिसून येते. काळाच्या ओघात विषय विस्तार होत जाऊन सखोल अभ्यासाच्या दृष्टीने भूगोलशास्त्रांतर्गत अनेक शाखा निर्माण झाल्या. प्राकृतिक भूगोलशास्त्राची मृदा भूगोलशास्त्र ही एक उपशाखा आहे. पृथ्वीच्या पृष्टभागावरील विविध प्रदेशातील मृदेचा अभ्यास ग्रीक भूअभ्यासकापासून होत असल्याचे दिसून येते. आगदी सुरवातीच्या काळात मृदेचा अभ्यास वर्णन प्रादेशिक पध्दतीतून होत होता. परंतू १९ व्या शतकात या ज्ञानशाखेच्या अभ्यासाचे पारंपारिक स्वरूप बद्लून वैज्ञानिक स्वरूपाचे अधिष्ठान प्राप्त करून देण्याचे काम रशियन भूवैज्ञानिक व्ही. व्ही. डोकचॉव्ह यांनी केले.

याच शतकाच्या उत्तरर्घात जगाची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत गेली याचे परिणाम स्वरूप पाहता अन्नधान्याच्या मागणीत वाढ होऊन, कृषी उत्पादने वाढवण्यासाठी प्रयत्न झाले. कृषी उत्पादने वाढवत असताना पिकांचा मुळ आधार म्हणून मृदेचा अभ्यास करणे क्रमप्राप्त बनले. यातुनच अधुनिक मृदा भूगोलशास्त्राचा विकास होत गेला. या शास्त्राच्या अध्यायनातील एक महत्वाचा टप्पा म्हणून व्ही. व्ही. डोकचॉव्ह यांनी घालून दिलेली मृदा भूगोलशास्त्राची तत्वे होय.

मूळ खडकावरती विदारण प्रक्रिया होऊन पृथ्वीच्या पृष्टभागावरती सर्वात वरच्या बारीक कणांच्या समुच्चयातून निर्माण झालेल्या मृदू अथवा कठीण पदार्थास मृदा असे म्हणतात. विविध प्रकारच्या मृदा मृदा निर्मिती वरती प्रभाव ठाकणारे घटक किंवा मृदा निर्मितीस पुरक असणारे घटक संशोधनाव्दारे डोकचॉव्ह यांनी प्रथमतः मांडले. मृदानिर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी मृदाछेदाचे तंत्र विकसीत करून मृदा निर्मितीच्या अंगाच्या एकत्रीत अभ्यासास -या अर्थाने एक वेगळीच दिशा देण्याचा प्रयत्न यांनी केला. भूपृष्ट, वनस्पती इतर घटकांवरती आधारीत मृदानिर्मितीची प्रक्रिया चालत असून आशा आकडेवारीच्या साहयाने जुन्या मृदा नकाशा तंत्राच्याऐवजी नवीन मृदा नकाशा मांडणीचे तंत्र जगाच्या समोर आणण्याचे कार्य या विचरावंताचे केले. याशिवाय मृदा समोच्चता रेषांचा वापर करून मृदा वितरणाच्या मर्यादा आधोरेखीत करण्यासाठी ही पध्दत प्रचलीत केली.

उपरोक्त बाबींचा एकत्रीत परिणाम पहाता जगाच्या विविध देशात मृदा अभ्याचा प्रचार प्रसार होऊन मृदा अभ्यासाचे क्षेत्र विस्तारीत झाले. मृदा भूगोलशास्त्र ही महत्वाची ज्ञान शाखा म्हणून अनेक विद्यापीठ स्तरांबरोबरच महाविद्यालयांमध्ये अध्यापन अध्यायन होऊ लागले आहे.

मृदा मृदा भूगोलशास्त्र या दोन्ही बाबी भिन्न आहेत. मृदा भूगोलशास्त्राचा अर्थ समजून घ्यावयाचा झाल्यास प्रथमतः मृदेची ओळख करून घेणे क्रमप्राप्त ठरते. मृदा भूपृष्टाचा बाह्य स्तर निर्देशीत करतो.

व्याख्या :-

. 'खडकाच्या विदारण प्रक्रियेतून निर्माण झालेल्या मूळ खडकाचा चुरा किंवा भुग्या पासून बनलेल्या बाह्य पदार्थाच्या थरास मृदा असे म्हणतात.'

. 'मूळ पदार्थापासून विलग झालेल्या सुक्ष्म कणांपासून ते वाळू सदृश्य कणांपर्यतच्या भूपृष्टावरील जैविक द्रव्यानीयुक्त स्तरास मृदा किंवा जमीन असे म्हणतात.'

. के. . खतिब : 'भूपृष्टावरील वरच्या सूक्ष्म मातीच्या पातळ थराला मृदा किंवा जमीन म्हणतात.'

. रॅममन : 'खडकाचे बारीक कणात रूपांतर रासायनिक बदल होऊ तयार झालेला, वनस्पती प्राणी यांचे अवशेष असलेला थर म्हणजे मृदा होय.'

मृदा भूगोलशास्त्र ही प्राकृतिक भूगोलशास्त्राची एक प्रमुख शाखा असून या ज्ञानशाखेत मृदेच्या भौगोलिक प्रादेशिकरणाच्या उद्देशाने पृथ्वीच्या पृष्टभागावरील मृदेचे रचनात्मक वितरण अभ्यासले जाते. मृदा निर्मितीचे घटक, मृदा निर्मितीची प्रक्रिया, गुणधर्म, वर्गीकरण, वितरण, मृदा-हास, कारणे, परिणाम, मृदा संधारण, मृदा व्यवस्थापन त्यांच्या पध्दतींचा अभ्यास मृदा भूगोलशास्त्रात सखोलपणे केला जातो. मृदा भूगोलशास्त्राच्या अभ्यासाचे हे प्रमुख घटक असलेतरी मृदा भूगोलाचा अर्थ सांगण्याच्या हेतूने पुढील काही व्याख्या देता येतील.

. मृदेच्या अनुषंगाने तिच्या विविध अगांचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मृदा भूगोलशास्त्र होय.

. मृदा निर्मिती, तिच्या निर्मितीची प्रक्रिया, मृदेवर परिणाम करणारे घटक, मृदा प्रकार त्यांचे वितरण, त्यांचे गुणधर्म महत्व, मृदेची धूप, त्याची कारणे उपाय, मृदा संवर्धन इत्यादींचा अभ्यास ज्या शास्त्रात होतो त्यास मृदा भूगोलशास्त्र असे म्हणतात (खतिब,2014).

. भूगोलशास्त्रीय नियमांना अधिन राहून मृदा निर्मिती, तिचे प्रकार अभिक्षेत्रीय वितरणासह मृदेच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणा-या शास्त्रास मृदा भूगोलशास्त्र असे म्हणतात.

. ज्या ज्ञानशाखेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून भिन्न भूदृष्यावरील मृदेचे प्रकारासह वितरणाचे विश्लेषण वर्णन केले जाते त्या शास्त्रास मृदा भूगोलशास्त्र म्हणतात.

मुदा भूगोलशास्त्राचे स्वरूप

अभ्यास करण्याच्या पध्दतीवरून त्या विषयास त्याचे स्वरूप प्राप्त होत असते. भूगोलशास्त्र हा प्राचीन अभ्यास विषय असल्याने काळाच्या ओघात या विषयाच्या अभ्यास पध्दतीत ही बदल घडून आल्याचे प्रकर्षाने आढळून येते. अर्थातच मृदा भूगोलशास्त्र ही भूगोलाची अलिकडील काळातील खऱ्या अर्थाने उदयास आलेली ज्ञानशाखा असली तरी भूगोलशास्त्राचे स्वरूप या ही शाखेला बहुदा लागू पडते कारण मृदेचा अभ्यास अनेक विचारवंतानी केला असल्याचे पुरावे त्यांच्या ग्रंथ लिखानातून आढळून येतात. असे गृहीत धरून त्यावेळची अभ्यास पध्दती आजची अभ्यास पध्दतीचा एकत्रीत विचार करता खालील प्रमाणे मृदा भूगोलशास्त्राचे स्वरूप स्पष्ट करता येईल.

) वर्णनात्मक स्वरूप

पृथ्वी तथा पृथ्वीच्या पृष्ठभागाचे वर्णन करणारे शास्त्र म्हणून भूगोलशास्त्रास अगदी सुरवातीच्या काळात ओळखले जात असे. ग्रीक, रोमन, अरेबीयन, भारतीय, चीनी, युरोपीयन इत्यादी भू अभ्यासकांनी विविध देशांचे दौरे पूर्ण करून त्या त्या प्रदेशातील भौगोलिक घटकांचे केलेले निरीक्षण घेतलेला अनुभव या आधारे यांची वर्णने समकालीन विचारवंताच्या लिखाणात आढळून येतात. याच विचारवंतांकडून करण्यात आलेल्या दौऱ्यादरम्यान मृदेचाही अभ्यास करण्यात आला. परंतू मृदेसंदर्भात असलेल्या या नोंदी वर्णनाच्या स्वरूपात प्रामुख्याने आढळून येतात. भौगोलिक घटकांच्या अभ्यासासाठी वर्णनात्मक अभ्यास पध्दती त्या काळात प्रचलीत असल्याचे स्पष्टपणे जाणवून येते. अर्थातच मृदेचा करण्यात आलेला अभ्यास अशा अभ्यास पध्दती पासून वेगळा ठरू शकत नसल्याने मृदा भूगोलशास्त्राचे प्रथम स्वरूप हे वर्णनात्मक असेच होत.

) प्रादेशिक स्वरूप

विविध देशातील भू अभ्यासकांमार्फत भिन्न भिन्न प्रदेशातील मृदेचा अभ्यास करण्यात आला परंतू या अभ्यासातील मृदे संदर्भात करण्यात आलेली वर्णने भिन्न प्रदेश असूनही सारखीच असलेली आढळून आली. म्हणनू मृदेचा अभ्यास प्रदेशनिहाय व्हावा तो बिनचूक असेल असा एक विचार प्रवाह पुढे आला हाच विचार प्रवाह प्रचलीत झाला. जगाची विभागणी लहान लहान प्रदेशात करून तेथील मृदा अभ्यासली जाऊ लागली. प्रदेश निहाय करण्यात आलेल्या मृदेच्या अभ्यासामुळे गुंतागुंत कमी होऊन आधिक सुस्पष्टता येण्यास मदत झाली. विस्तृत विभागाचे लहान लहान प्रदेशात विभागणी करून तेथील मृदांचा अभ्यास करण्याची पध्दत म्हणजे प्रादेशिक पध्दत होय. प्रदेश निहाय मृदेचे वर्णन या अभ्यास पध्दतीचे वैशिष्टय ठरते.

) वस्तुनिष्ट स्वरूप

प्रादेशिक अभ्यास पध्दतीमध्ये भू अभ्यासक विशिष्ट प्रदेश निवडून तेथील भौगोलिक घटकांचा अभ्यास करीत असे. अर्थातच अशा अभ्यास पध्दतीमध्ये सर्वच भौगोलिक घटक विचराधीन असायचे. त्यामुळे सर्वच घटकांचा सखोल अभ्यास करणे अडचणीचे ठरायचे. प्रादेशिक स्वरूपातील हा दोष दुर करण्याच्या दृष्टीने भू अभ्यासकांनी प्रदेशाची निवड करून विविध भौगोलिक घटकांपैकी एकाचीच निवड करून तो घटक सखोल पध्दतीने अभ्यास करण्याची रीत प्रचलीत केली. याचा परिणाम पहाता निवडलेल्या एकमेव घटकाच्या मूळापर्यंत पोहचून, का? कुठे? कसे? अशा प्रश्नांची उत्तरे शाधेण्यात येऊ लागली. मृदा भूगोलातही या अभ्यास पध्दतीचा वापर होऊ लागल्याने या विषयास वस्तुनिष्ट स्वरूप प्राप्त झाले.

) कार्यकारणभाव स्वरूप

मृदा भूगोलशास्त्रात मृदा निर्मितीचे घटक, मृदा निर्मितीची प्रक्रिया, मृदेचे गुणधर्म, मृदा वर्गीकरण, मृदा वितरण, मृदा -हास, कारणे, परिणाम, मृदा संधारण, मृदा व्यवस्थापन त्यांच्या पध्दतींचा अभ्यास केला जातो. कार्यकारणभाव अध्ययन पध्दतीत दोन किंवा दोन पेक्षा जास्त घटकातील संबंध त्यांच्यातील अंतरक्रिया, दोहोंचे एकमेकांवर होणारे परिणाम इत्यादी सारख्या बाबींना विषेश महत्व दिले जाते किंभवना अशा तत्वाला मूलाधार मानून मृदेचा अभ्यास केला जातो. उदा. मृदा पिकांचे उत्पादन, मृदा पिकांचे वितरण किंवा पिक प्रकार. मृदा अभ्यासामध्ये अशा स्वरूपाचा अवलंब केल्यामुळे मृदे संबंधी सखोल नेमकी विभागवार माहिती प्राप्त होऊ लागली. या शिवाय मृदेची विविध अंगे जाणून घेण्यास मदत होऊन मृदा भूगोलशास्त्राची कक्षा रुंदावून वेगळेच महत्व निर्माण झालेचे दिसून येते.

) सांख्यिकी स्वरूप

भूगोलशास्त्रीय नियमांना अधिन राहून मृदेचे कार्यकारणभाव अभ्यासण्याच्या पध्दतीने मृदा भूगोलास वेगळेच महत्व प्राप्त झाले. कार्यकारणभाव स्वरूपाबरोबर मृदेच्या भिन्न भिन्न अंगांचा अभ्यास करीत असताना त्या अंगांचे मोजमाप करण्याची नविन पध्दत रूढ होऊन मृदा भूगोलशास्त्रास सांख्यिकी स्वरूप प्राप्त झाले. मृदे संबंधीच्या वर्णन, विश्लेषण कार्यकारणभाव अभ्यासातून अचूक अंदाज किंवा निष्कर्षा पर्यंत पोहचण्यासाठी मृदा भूगोलाचे सांख्यिकी स्वरूप महत्वपूर्ण भूमिका निभावते. मृदा भूगोलशास्त्रात मृदा घटकांच्या मोजमापातून विविध प्रकारची आकडेवारी उपलब्ध होऊन त्या वरती सांख्यिकी प्रक्रियांचे तंत्रही अवगत झाल्याने मृदा भूगोलाचा पाया मजबूत होण्यास मदत झालीच, शिवाय विश्वासअर्हता निर्माण झाली.

) वैज्ञानिक स्वरूप

वैज्ञानिक अभ्यास पध्दतीमध्ये प्रश्नाची निवड, गृहिते, उद्देश, तथ्य संकलन, माहितीचे वर्गीकरण, तथ्य विश्लेषण निष्कर्ष काढले जातात. मृदा अभ्यासामध्ये हे सर्व संशोधनाचे शास्त्रीय अधिष्ठाण असलेले घटक उपयोगात आणले जातात. मृदा भूगोलात अलिकडील काही दशकात याच अभ्यास पध्दतीचा वापर आगदी जसाच्या तसा केला जात असल्याने या विषयाचे सद्यः स्वरूप वैज्ञानिक असल्याचे दिसून येते. मृदेच्या विविध घटकांचा तथ्य आधारीत अभ्यास करून तो वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणीत केला जातो. तसेच त्या आधारीत नवनवीन सिध्दांत संकल्पना मांडल्या जातात. यालाच मृदा भूगोलशास्त्राचे वैज्ञानिक स्वरूप म्हणून ओळखले जाते.

) गतिशील स्वरूप

मृदा गतिशील असल्याचे अनेक अभ्यासातून सिध्द झालेले आहे. मृदेची निर्मिती, मृदा निर्मिती प्रक्रिया, मृदेचे प्राकृतिक रासायनिक गुणधर्म, मृदा हास इत्यादी बाबींवरून मृदेची गतिशीलता स्पष्ट होते. मृदेच्या मूळ स्थितीत अर्थातच मृदेची जाडी, नैसर्गिक जैविक प्रक्रिया, गुणधर्म इत्यादीत होणारे बदल विचारात घेऊन त्या अनुषंगाने मृदेचा अभ्यास करण्याची पध्दत अलिकडील कांही काळात अंगीकारली आहे. हेच मृदा भूगोलशास्त्राचे गतिशील स्वरूप होय.

मृदा भूगोलशास्त्राची व्याप्ती

भूगोल विषयातंर्गत मृदेचा अभ्यास अगदी १९व्या शतकाच्या उत्तर्राधापासून खऱ्या अथनि होत असल्याने या ज्ञानशाखेची व्याप्ती अगदीच मर्यादीत होती. परंतू रशियन अभ्यासक डोकचॅव्ह यांनी मृदेच्या अभ्यासास वेगळीच उंची प्राप्त करून दिल्याने मृदा भूगोलशास्त्र भूगोलशास्त्राची एक स्वतंत्र शाखा म्हणुन उदयास आली. जगभरातील आणेक अभ्यासकानी मृदेचा सखोल अभ्यास करून मृदा भूगोलशास्त्राची क्षितीजे रुंदावण्यास मदत केली आणि यातूनच या विषयाची व्याप्ती सलग पणे वाढत असल्याचे स्पष्ट पणे आढळून येते.

मृदा, पाणी हवा ही मुलभूत साधनसंपत्ती असून मानव, वनस्पती प्राणी यांच्या विविध गरजा यासारख्या साधनांमार्फत पूर्ण केल्या जातात. मृदा ही अशी साधन संपत्ती आहे की जीच्या अस्तित्वाने इतरांचे अस्तित्व ठरत असते, पृथ्वीवरील मानव, वनस्पती प्राणी यांचे अधिवास तसेच त्यांचे खाद्यान्न याच जमिनीतून निर्माण होत असते. मानव आपल्या बुध्दी कौशल्याच्या जोरावरती मृदेचा वापर अनेक अंगानी करून घेत आहे. याचा अभ्यास मृदा भूगोलात होत असल्याने या विषयाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे.

(i) मृदा भूगोलशास्त्र लोकजीवन

साधारणपणे जगाची लोकसंख्या १९५० नंतर प्रचंड वेगाने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या अन्नधान्याच्या गरजा तसेच मृदा निगडीत संसाधनाच्या गरजा पर्ण करण्या योगे मर्यातीत जमिनीचा पर्याप्त वापर अपरीहार्य बनतो. कृषी उत्पादने वाढवण्या साठी मृदेच्या अभ्यासची गरज निर्माण होऊन मृदा अभ्यास संशोधनाव्दारे विस्तारने केला जाऊ लागला. परिणामतः या विषयाचे क्षेत्र मोठे झाले.

(ii) भूगोलशास्त्र उद्योगधंदे

जगाच्या अर्थव्यवस्थेचा इतिहास पहाता बहुतांश देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा त्या देशातील कृषीच असल्यांचे आढळून येते. भारतासारख्या देशाने शेतीव्दारे आर्थिक प्रगती साधत औद्योगिक क्षेत्रातही तितकीच प्रगती घडवून आनली आहे. भारतातील बहुतेक उद्योगधंदे कृषीअधारीत आहेत. उदा. साखर उद्योग, कापड उद्योग, ताग उद्योग इत्यादी. आपल्या देशातील अशा उद्योगांमार्फत औद्योगिक प्रगती साधली असून इतर कांही उद्योगांची उभारनी कृषी मालावर आधारीत उद्योगांवरच झालेली आहे. यासारख्या बाबींचा विचार करता अनेक प्रकारच्या उद्योगधंदयांचा आधार कृषी असून कृषीचे अस्तित्व मृदेवर अवलंबून आहे. त्या मुळे उद्योगाना पुरवण्यात येणाऱ्या कच्चा माल मोठ्या प्रमाणात उत्पादीत करण्याच्या हेतुने मृदेचा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टीने करण्यात येऊ लागला आहे. किंबहुना अशा उद्योगांचे अस्तित्व मृदेतच दडलेले असल्याचे स्पष्ट होते.

(iii) मृदा भूगोलशास्त्र शहरीकरण

जगभरात शहरीकरण मोठ्या दराने होत आहे. वाढत्या शहराच्या विस्तारीत जागा, रस्ते, सार्वजानिक इमारती, क्रीडांगणे, निवासी क्षेत्र इत्यादी कारणासाठी भूमीउपयोजनात सातत्याने वाढ होत आहे. शहर नियोजनाच्या आनुषंगाने जागेची मागणी गरजेची बनलेली आहे. जागेची मागणी पूर्ण करणे साठी शहरा सभोवतालच्या शेती क्षेत्रावरती अतिक्रमण होऊ लागले आहे. कृषीयोग्य जमीन अकृषक बनत असल्याने मृदा अभ्यासाव्दारे शहरी विस्ताराच्या आनुषंगाने निमार्ण झालेल्या कांही समस्या सोडवण्यायोगे मदत होत आहे. मृदेच्या अभ्यासाव्दारे ढोबळमानाने तेथील भूगर्भीय रचना समजून येण्यास मदत होते की ज्याचा फायदा बांधकामांनसाठी होतो.

(iv) मृदा भूगोलशास्त्र साधनसंपत्ती

मृदा ही पायाभूत साधनसंपत्ती असून विविध सजिवांचे अस्तित्व मृदे वरती आधरलेले आहे. मानव प्राणी यांच्या भिन्न-भिन्न प्रकारच्या गरजा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मृदेमार्फत पूर्ण केल्या जातात. वाढत्या मानवी लोकसंख्ये मुळे मृदे वरती प्रचंड तान पडत असून मृदा साधनसंपत्तीच्या ऱ्हासास आलिकडील काळात मोठया प्रमाणात सुरवात झाली आहे. मृदा संधारणाव्दारे चिरंतन विकारस साधन्यासाठी मृदेचा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केला जाऊलागला आहे. मृदा ऱ्हासाची कारणे, त्याचा परिणाम, त्यावरील उपाययोजना मृदा व्यवस्थापनासारख्या अनेक बाजू मृदा अभ्यासाच्या माध्यमातून जगा समोर आल्या आसून काळाची गरज बनाल्या आहेत.

(v) मृदा भूगोलशास्त्र पर्यावरण

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अनेक परिस्थितींचा पाया जमीन आहे. मानवाचा पर्यावरणातील अतिरेकी हस्तक्षेपा मुळे आपले पर्यावरण धोक्यात आले आहे, शिवाय वेगवेगळ्या परिसंस्था धोक्यात आलेल्या आहेत. वाढते शहरिकरण, उद्योगिकरण मर्यादीत कृषी क्षेत्रातून अधिकतम उत्पादन मिळवण्याच्या हेतूने रासायनिक खतांचा अतिरीक्त वापर, किटक तृण नाशके, पाण्याचा भरमासाठ वापर इत्यादीमुळे मृदा आवणती घडून येत आहे की ज्याचा परिणाम कळत नकळत पणे पर्यावरणावरती होत आहे. या मधूनच जमीन प्रदुषण जल प्रदुषणा सारख्या समस्यांनी उग्ररूप धारण केले आहे. मृदेचा अभ्यास करताना पर्यावरणातील अनेक उकल होण्या बरोबरच विविध परीसंस्थाचे अस्तित्व जानून घेण्यास मदत झालेली आहे.

वरील मृदा भूगोलशास्त्राच्या व्यप्ती बरोबरच प्रादेशिक विकास, योजना, व्यापार, अभियांत्रिकी, पर्यटन (कृषी), हवामान, भूरूपे इत्यादी वेगवेगळया विभागात किंवा विषयात मृदेचा अभ्यास गरजेजा ठरला आहे. मृदेचा विविध अंगानी होत असलेल्या अभ्यासामुळेच मृदा भूगोलाचे क्षितीज विस्तारीत होऊन या विषयाची व्याप्ती अमर्याद असलेचे स्पष्ट पणे आढळून येते.

. मृदा भूगोलशास्त्राचा इतिहास मृदाशास्त्र

पृथ्वीच्या पृष्टभागावरील मूळ खडकापासून बनलेल्या सेंद्रीय असेंद्रीय घटक द्रव्ये, हवा, पाणी आणि तापमानाने युक्त सर्वात वरच्या स्तरास मृदा म्हणुन ओळखले जाते. अशा सर्वच घटकांना केंद्रीत मानून मृदाशास्त्राचा अभ्यास होत असतो. मृदाशास्त्र ही स्वतंत्र ज्ञान शाखा असून हा असा विषय आहे की ज्यात मृदेच्या सर्व अंगाचा नैसर्गिक घटकांच्या अनुषंगाने मृदेचे गुणधर्मासह मृदा निर्मिती, मृदा प्रकार, मृदेचे आर्थिक महत्व, वितरण नकाशे, मृदा छेद, मृदा अवनती इत्यादींचा अभ्यास शास्त्रीय पध्दतीने सखोल विस्तारने केला जातो. म्हणूनच मृदाशास्त्राचा अभ्यास मानव, प्राणी वनस्पती जीवनाच्या दृष्टीने खूपच महत्वपूर्ण ठरतो.

प्राकृतिक भूगोलाच्या मृदा भूगोल या शाखेत भौगोलिक घटकांच्या आनुषंगाने मृदा निर्मिती प्रक्रिया, मृदा निर्मितीचे घटक तसेच मृदा निर्मितीवर परिणाम करणारे घटक जसे की मूळ पदार्थ, भूपृष्ट रचना, हवामान, वनस्पती, प्राणी कालावधी इत्यादी. मृदेचे प्राकृतिक गुणधर्म (बाह्यरूप, पोत संरचना, हवा, पाणी इतर गुणधर्मः सच्छिद्रता, घनता, रंग). मृदेचे रासायनिक गुणधर्म, मृदा प्रकार, त्यांची वैशिष्टये, पीकांच्या दृष्टीने महत्व, वितरण, मृदावनती, मृदा संघारन व्यवस्थापन इत्यादींचा अभ्यास केला जातो.

वरील दोन्ही विषयांचा (मृदाशास्त्र मृदा भूगोल) सखोल पणे अभ्यास करता दोन्ही ज्ञान शाखा एकमेकांशी संबंधीत पुरक असलेचे आढळून येते. मृदा भूगोलातील एकुणच घटकांचा अभ्यास करता मृदाशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. कारण मृदाशास्त्र मूळ विषय असून त्या मध्ये मृदेशी संबंधीत सर्व घटकांचा परामर्श घेतला जातो. मृदाशास्त्राच्या पायावरती मृदा भूगोलाची रचना झालेली असून मृदा भूगोलात वितरणास अधिक महत्व दिलेले असते शिवाय मानवी उपयुक्ततेच्या दृष्टीने मृदेच्या अभ्यासास प्राधान्यक्रम निश्चित झालेले आहेत. मृदा भूगोलाच्या अध्यायनातून मानवी व्यवसायास अनुकुल प्रतीकूलतेचे आडाखे सहजपणे मांडणे शक्य होते.

मृदा भूगोलशास्त्राचा इतिहास

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मृदा भूगोलशास्त्राच्या अभ्याला खऱ्याअधनि सुरवात झालेचे स्पष्टपणे जाणवून येते. मृदा भूगोलाच्या शास्त्रीय अभ्यासाची सुरवात रशियात होऊन पुढे अमेरिका नंतर जगाच्या इतर देशात त्याचा प्रसार झाला असल्याचे वेगवेगळ्या नोंदी अभ्यासावरून स्पष्ट होते. मृदेच्या अनुषंगाने प्राकृतिक घटकांची महत्वपूर्ण भूमिका असून त्यांच्या मधील संबंध अभ्यासण्याचे श्रेय प्रथमतः डोकुचॉव्ह यांना जाते. याच दोन प्रमुख घटकातील अंतरसंबंधाचा परीपूर्ण अभ्यास करून 'मृदा भूगोलाची मूलतत्वे' हा ग्रंथ प्रकाशीत केला. रशियन शास्त्रज्ञ व्ही. व्ही. डोकुचॉव्ह यांचे मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलशास्त्राची एक स्वतंत्र शाखा म्हणून उदयास आणण्या मध्ये महत्वपूर्ण योगदान असल्यानेच त्यांना मृदा भूगोलाचे जनक म्हणून ओळखले जाते. अगदी ग्रीक, रोमन अभ्यासकापासून ते आजच्या मृदा अभ्यासकापर्यंत अनेकांच्या कार्याचा अढावा मृदा भूगोलशास्त्राच्या इतिहासाव्दारे घेता येईल. मृदा भूगोलशास्त्राचा इतिहास प्रामुख्याने तीन कालखंडात विभागला असून ते कालखंड खालील प्रमाणे :

) . . १९०० पूर्वीचा कालखंड

विविध प्राचीन अभ्यासकांच्या ग्रंथसंपदात मृदे विषय वर्णने आढळून येतात. या कालखंडात मृदेचा अभ्यास फारसा झालेला आढळून येत नाही. अगदी मोजक्याच अभ्यासकानी पीके किंवा वनस्पती यांच्या वाढीचा आधार म्हणून मृदेचा विचार केलेला दिसून येतो. जर्मन अभ्यासक जेस्टस व्हॉन लीबिग (१८०३-१८७३) यांनी मृदेची संकल्पना प्रथमतः जगासमोर मांडली पुढे हीच संकल्पना सुधारीत, विकसीत करण्याचे काम जर्मन कृषीशास्त्रज्ञानी केले. मृदेचे गुणधर्म जाणून घेण्याच्या हेतून मृदा नमुने संकलीत करण्याची पध्दत तिचे प्रयोगशाळेतील रासायनिक विश्लेषणाची रीत प्रचलीत झाली. याच दरम्यान मृदेच्या रासायनिक विश्लेषणांच्या आधारे पीकांचे पोषक घटकांच्या संदर्भात बॅलन्स सिट सिध्दांत मांडण्यात आला. आज मितीला या सिध्दांताचे महत्व तेवढेच असल्याचे कृषीशास्त्रज्ञांकडून सांगीतले जाते.

फ्रेडरिक अलबर्ट यांच्या दोन ग्रंथानी मृदा अभ्यासात मोलाची भर घातली गेली. यांचा पहिला ग्रंथ मृदाशास्त्राचे पहिले तत्व (१८५७). या ग्रंथाच्या पुढे दोन आवृत्या प्रकाशित झाल्या तर त्यांचा दुसरा ग्रंथ मृदाशास्त्र किंवा सामाण्य आणि विषेश मृदाशास्त्र (१८६२). त्यांच्या लिखानात प्रामुख्याने पध्दतीशीर पध्दतीचा (Systematic Approach) अवलंब करून मृदे संदर्भातील अभिक्षेत्रीय अनुभव मांडले आहेत. मृदा निर्मितीच्या अभ्यासाचे महत्व अनन्यसाधारण असून मृदाशास्त्र हा एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून माण्यता मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्यांनी १८६२ मध्ये मृदाछेदाचे वर्णन, मृदेचे प्राकृतिक रासायनिक गुणधर्म आणि खनीज गुणधर्म आधारीत मृदा वर्गीकरणाचा प्रस्ताव सादर केला.

फ्रेडरिक अलबर्ट यांना जवळपास समकालील असलेले रशियन शास्त्रज्ञ व्ही. व्ही. कोकुचॉव्ह यांनी (१८४६-१९०३) मृदाशास्त्र मृदाभूगोलात मोलाचे योगदान दिले आहे. मृदा भूगोलशास्त्राच्या अभ्यासाची खऱ्याअर्थाने सुरवात यांच्या पासून झालेचे आढळून येते. रशियाच्या विस्तृत पठारावरील मृदेचा शास्त्रीय अभ्यास प्रथम त्यांनी केला. मृदेबाबतच्या पायाभूत संकल्पनाः मृदा निर्मिती, मृदा निर्मितीची प्रक्रिया, मृदा रचना, मृदा छेद, मृदेचे जनुकीय वर्गीकरण या बरोबरच प्राकृतिक घटक मृदा यांच्यातील अंतर्गत सहसंबंध प्रस्थापीत करण्याचे महत्वपूर्ण योगदान आढळून येते. या शिवाय मृदा सर्वेक्षनाची नावीन्यपूर्ण पध्दत शोधून ती जगभरात प्रचलीत केली. याच काळात मृदा वितरण दर्शवण्यासाठी मृदा नकाशा तयार करण्यात आला. व्ही. व्ही. कोकुचॉव्ह यांनी रशियन स्कुल ऑफ स्वाईल सायन्स नावाची संस्था स्थापन करून मृदेच्या वैज्ञानिक अभ्यासाची नांदी घतली.  याशिवाय एन. एम. सिबीर्टसेव्ह यांचे ही मृदेच्या पायाभूत संकल्पनातील कार्य महत्वपूर्ण ठरते. मृदा ही एक स्वतंत्र शरीरसदृष्य रचना असून ते हवामान, जैव घटक, मूळ पदार्थ, भूउठाव आणि कालावधी यांचे एकेमेव मिश्रण आहे. याचाच आधार घेत पुढे हंस जेनी यांनी त्यांचे मृदा निर्मितीचे प्ररूप सांगीतले. नथानीअल शालेर यांनी १८९१ मध्ये त्यांच्या भूगर्भीय मृदा संकल्पनेत मृदा निर्मिती मृदेचे स्वरूप स्पष्ट केलेचे आढळून येते.

) . . १९०० ते १९६० चा कालखंड

मृदा अभ्यासचा हा महत्वाचा कालखंड असून मृदेच्या शास्त्रीय अभ्यासाची एक पध्दत रूढ झालेली दिसून येते. व्ही. व्ही. कोकुचॉव्ह यांचे अनेक अनुयायी जगभरात निर्माण झालेले होते. याचेच फलीत म्हणून जागतिक पातळीवरती मृदेचे वर्गीकरण वितरण, त्यांचे विश्लेषण करण्यात आले. रशियन मृदा अभ्यासक एन. . डिमो बी. . केलर यांनी मृदा भूगोलशास्त्रातील काही पायाभूत संकल्पना रूढ करण्या बरोबरच वाळवंटी मृदेचा शास्त्रीय अभ्यास करून सुक्ष्म जैव घटक मृदा यांचेतील नाते संबंध प्रस्थापीत केले.

अमेरिकन मृदा अभ्यास के. डी. ग्लिन्का यांनी विविध प्रदेशातील वनस्पती मृदेचा अभ्यास करून त्यांचे विश्लेषण केले. ग्लिन्का यांनी १९१४ साली मृदा निर्मितीच्या घटकासंबंधी एक पुस्तक प्रकाशित केले तर याच पुस्तकाचे इंग्रजी अनुवाद १९२७ मध्ये सी. . मार्बट यांनी केला.

एल. आय. प्रसोलोवो यांनी इस १९१६ मध्ये आशिया युरोप मधील मृदेचा अभ्यास करून मैदानी पर्वतीय मृदेचे विरण सांगीतले. पुढे १९२० ते ३० अखेर जगभरातील मृदा सर्वेक्षण पूर्ण होऊन विविध प्रमाणावरील मृदा वितरणाचे नकाशे तयार करण्यात आले. जे. . प्रेसकॉट सारख्या ऑस्ट्रेलियन मृदा अभ्यासकाने मृदेतील नायट्रोजन क्षार यांचा अभ्यास केला.

या शिवाय शॉ, जोफी हंस जेनी यांनी अनुक्रमे मृदा निर्मितीचे घटक, मृदा निर्मितीचे प्ररूप मांडले. रशियातील लेनिनग्राड मास्को विद्यापीठात १९३० च्या दशकात मृदा भूगोलशास्त्राचे स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आले.

) .. १९६० नंतरचा कालखंड

या कालखंडातील मृदा भूगोलशास्त्रातील योगदानाचे श्रेय प्रामुख्याने रझानोव्ह (१९७७), डॅनियल या सारख्या अभ्यासकाना जाते. रझानोव्ह यांनी जागतिक मृदेच्या विश्लेषणासाठी मृदेचे प्रमुख पाच गट केले. तर डॅनियल यांनी मृदा भूरूपे यांच्यातील अंतरीक संबंध प्रस्थापीत करण्याचे काम केले. १९८५ ते १९९५ च्या काळात जगभरातील मृदेचा सखोल अभ्यास करून प्रदेश निहाय मृदा वितरणाचे विविध प्रमाणावरील नकाशे तयार करण्यात आले.

गेल्या तीन दशकात मृदा वर्गीकरणाच्या विविध पध्दती पुढे आल्या. अधुनिक तंत्रज्ञानाने मृदा भूगोलशास्त्राचा चेहराच बदलत असल्याचे दिसून येते. मृदा भूगोलशास्त्रातील संदूरसंवेदन, जीआयएस, जीपीएस, संगणक इत्यांदीचा वापर करून अध्यावत मृदा विषयक अचूक माहिती जतन प्रकाशीत करता येऊ लागली आहे. जगभरातील जवळपास सर्वच विद्यापीठ महाविद्यालयीन स्तरावरती या विषयाचे अध्यायन अध्यापन होत आहे.

. मृदा भूगोलशास्त्राचे महत्व

भूगोलशास्त्राच्या प्रमुख दोन शाखा असून त्या म्हणजे प्राकृतिक भूगोल मानवी भूगोल होय. यातील प्राकृतिक भूगोला मध्ये अध्यायनाच्या सोयीसाठी ज्या उप शाखा निर्माण केल्या आहेत, त्यामधील मृदा भूगोल ही एक महत्वाची ज्ञान शाखा मानली जाते. त्या मुळे मृदा भूगोलाच्या अध्यायनाला एक वेगळेच अधिष्टान प्राप्त झाले आहे. म्हणुनच जेथे जेथे मृदेचा संबंध येतो तेथे तेथे मृदा भूगोल दिशा निर्देशनाचे काम करते. यातूनच मृदा भूगोलास विषेश असे महत्व प्राप्त झालेले आहे. ते महत्व खालील प्रमाणे सांगता येईलः

) कृषी उद्योगांच्या दृष्टीने

सुपीक जमिनीचे प्रदेश तेथील भौगोलिक परिस्थिीतीनुसार वेगवेगळ्या पीकांसाठी उपयुक्त असतात. शेती व्यवसायाने समृध्द असलेल्या प्रदेशात लोकसंख्येची घनता सुध्दा तुलनेने जास्तच राहते. जमिनीची उपलब्धता, मजुर पुरवठा, मुबलक पाण्याची उपलब्धता, कच्चा माल तसेच हमखास बाजरपेठ या सारख्या घटकांच्या अनुकूलते मूळे शेती आधारीत कच्चा माल (ऊस, कापूस, ताग) भिन्न प्रकारचे उद्योग शेती क्षेत्राच्या जवळपास स्थापन होतात. अर्थातच या मधील प्रमुख घटक मृदा हाच असलेचे दिसून येते. मृदेच्या अनुकूलते मुळेच विविध पीकांची व्यापारी उत्पादने घेने शक्य बनते. शेतीस उद्योगांची जोड मिळाल्याने प्रादेशिक विकासाला उत्तम दिशा प्राप्त होते. मात्र या उलट हलकी जमीन असणा-या विभागात कृषी आधारीत उद्योगांचा फारसा विकास झालेला आढळून येत नाही. अर्थातच तेथील जमीन यासाठी कारणीभूत ठरते. मृदा भूगोलाच्या अभ्यासाव्दारे सुपीक जमिनीतून अधिका अधिक उत्पादन घेण्याबरोबरच त्या जमिनीची गुणवत्ता ठिकवणे हलक्या जमिनीची गुणवत्ता सुधारून व्यापारी पीकाना चालना देणे सोपे जाते.

) कृषी व्यवसायाच्या दृष्टीने

जमीन, पाणी हवा ही जगाची मूलभूत साधनसंपत्ती असून यांच्या उपलब्धतेवर पृथ्वी वरील जीवावरणाचे अस्तित्व आवलंबून आहे. भूतलावरील प्रत्येक जीवास अन्नाची गरज असते आणि अन्न निर्मितीचा प्रमुख स्त्रोत म्हणुन जमिनीकडे पाहीले जाते. मानवाने आपल्या चरीतार्थासाठी आगदी अनादी कालापासून जमिनीचा वापर केलेला आहे. मानवी विकासा बरोबर त्यांने आपल्या व्यवसायातही योग्य ते बदल करून प्रगती साधलेली आढळून येते. यातील शेती हा मानवाचा प्रमुख प्राथमिक व्यवसाय असून मानवाचा हा व्यवसाय पूण पणे मृदे वरती आधारीत आहे. मृदा प्रकारानुसार पीकांचे प्रकार बदलत असतात. उदा. काळी मृदा (रेगुर) कापसाठी, गाळाची मृदा ऊस तांदळासाठी, जांभी मृदा चहा, कॉफी फळांसाठी इत्यादी. जमिनीच्या दर्जानुसार पीकांची वाढ उत्पादन अवलंबून असते. चांगल्या सुपीक जमिनीतील पीके चांगल्या प्रतीची असतात. शिवाय अशा जमिनीतून शेतीमालाचे उत्पादन अधिक मिळते. मृदा भूगोलाच्या अभ्यासाने पिकांचा प्रकार ठरवण्या बरोबरच कृषी अर्थशास्त्र जाणून घेण्यास चांगलीच मदत होते.

) कृषी बाजारपेठांच्या दृष्टीने

शेती इतर घटकांबरोबरच जमिनीवर अवलंबून आहे. सुपीक जमीन असल्यास शेतीचा विकास होऊन शेती मालाचे उत्पादन वाढते. कृषीतून मिळवण्यात आलेल्या आधिकतम उत्पादनास किंवा खास व्यापारी उत्पादनास बाजारपेठीची गरज असते. यातूनच भारतासारख्या देशात प्रत्येक तालुका स्तरावरती कृषी बाजारपेठा स्थापन झालेल्या आहेत. या शिवाय आपल्या देशातील आनेक ठिकाणे कृषी मालाच्या खरेदी-विक्रीची जागतिक बाजारपेठीची केंद्रे बनली आहेत. उदा. गुळासाठी कोल्हापूर, हळदीसाठी सांगली, द्रांक्षेसाठी तासगांव नाशिक, आंब्यासाठी रत्नागिरी, कांद्यासाठी लोणंद लासलगाव, तंबाखूसाठी निपाणी, कापसासाठी विदर्भ इत्यादी बाजारपेठा प्रसिध्द पावलेल्या आहेत. मृदा भूगोलाच्या अभ्यासातून पीके त्यांच्या संबंधातून बाजारपेठांचा अभ्यास करणे शक्य होते.

) मालवाहतुकीच्या दृष्टीने

मृदा भूगोलाच्या अभ्यासातून विविध हमखास पीकांचे उत्पादन घेने सोयीचे ठरते. शाश्वत शेती उत्पादना मुळे व्यापारासाठी बाजारपेठांची गरज निर्माण होते. पीक उत्पादन क्षेत्र बाजारपेठा यांच्यातील सुगमता रस्ते, रेल्वे, जल हवाई मार्गाव्दारे साधली जाते. अर्थातच या मध्ये मालवाहतुकीला विषेश महत्व प्राप्त होते. मृदेच्या अभ्यासाव्दारे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पायाभूत सुवीधांचा विकास होण्यास चांगलीच मदत होते.

) प्राचीन संस्कृतीचा अभ्यास

जगातील प्रचीन संस्कृतीचा उगम विकास नदी खोऱ्यातील सुपीक गाळाच्या प्रदेशात झालेला असल्याचे मानवी इतिहासावरून स्पष्ट होते. उदा. नाईल नदी इजिप्शियन संस्कृती, सिंधू भारतीय संस्कृती तसेच तैग्रीस युप्राटीस युरापीयन संस्कृती इत्यादी. या संस्कृतीचा अभ्यास करताना तेथील मृदा भूगोलाच्या आनुषंगाने करावा लागतो.

) कृषी पर्यटनच्या दृष्टीने

आलिकडील काळात जगभरात पर्यटनाला वेगळेच महत्व प्राप्त झालेले आहे. पर्यटन व्यवसाय जगभरात तिसरा उद्योग म्हणुन ओळखला जात आहे. पर्यटनातंर्गत विविध घटकांचा समावेश होत असून त्या मधील कृषी पर्यटन संकल्पना चांगलीच लोकप्रीय होत आहे. मृदा भूगोलाच्या अध्यायनाव्दारे तेथील वैशिष्टयपूर्ण पीके सहजपणे घेणे शक्य होऊन ते आजमितीस लोकांचे आकर्षणाचे ठिकाणे बनत आहेत. कृषी पर्यटनाचा विकास अप्रत्यक्षपणे मृदेशी निगडीत आहे. म्हणुनच कृषी पर्यटनाच्या विस्तारासाठी मृदा भूगोलाच्या अभ्यासाला विषेश महत्व प्राप्त होऊलागले आहे.

याशिवाय मृदा भूगोलशास्त्राचे महत्व पर्यावरण त्यामधील परिसंस्था, अभियांत्रिकी, सर्व जैव सृष्ठीचा अन्न स्त्रोत इत्यादी घटकांच्या दृष्टीने सांगता येईल.

Post a Comment

Previous Post Next Post