प्रकरण १: लोकसंख्या भूगोलाची ओळख
१.१ प्रस्तावना:
•
प्राकृतिक
भूगोल
व
मानवी
भूगोल
ह्या
भूगोल
विषयाच्या
दोन
प्रमुख
शाखा
आहेत.
•
प्राकृतिक
भूगोलात
प्राकृतिक
घटकांचा
तर
मानवी
भूगोलात सांस्कृतिक
घटकांचा
अभ्यास
केला
जातो.
•
प्राकृतिक
भूगोल
ही
भूगोलाची
जुनी
व
प्रगत
शाखा
असून
मानवी
भूगोल
तुलनेने
नवीन
शाखा
आहे.
•
भूगोल
विषयाच्या
अभ्यास
क्षेत्रात
वाढ
होत
जाऊन
प्राकृतिक
व
मानवी
भूगोलाच्या
अनेक
विविध
नवीन
उपशाखा
विकसित
झाल्या.
•
लोकसंख्या
भूगोल
ही
मानवी
भूगोलाची
अलीकडे
विकसित
झालेली
एक
महत्त्वाची
उपशाखा
आहे. मानव
हा
लोकसंख्या
शास्त्राच्या
अभ्यासाचा
केंद्रबिंदू
आहे.
•
मानव
या
गतिमान
घटकाचा
अभ्यास
लोकसंख्या
भूगोलात
केला
जात
असल्यामुळे
सहाजिकच
या
विषयाचे
स्वरूप
गतिमान
व
परिवर्तनशील
असे
आहे.
लोकसंख्या
भूगोलाच्या
व्याख्या
लोकसंख्या
भूगोलाची
व्याख्या
निरनिराळ्या
तज्ञांनी
निरनिराळ्या
प्रकारे
केली
आहे. त्यापैकी
काही
प्रमुख
शास्त्रज्ञांनी
केलेल्या
व्याख्या
खालील
प्रमाणे,
१) जी.टी. त्रिवार्था:
“पृथ्वीच्या
भूपृष्ठावरील
विविध
प्रदेशात
वितरित
झालेल्या
मानवी
समूहांची
वैशिष्ट्ये
समजून
घेणे
म्हणजे
लोकसंख्या
भूगोल
होय”.
२) श्रीमती
बिजू गार्नियर:
“लोकसंख्या
भूगोल
म्हणजे
पर्यावरणाच्या
चौकटीत
लोकसंख्येच्या
विविध
घटकांचे
विवेचन
म्हणजे
लोकसंख्येचे
गुणधर्म, रचना
व
त्याचे
भविष्यकालीन
परिणाम
यांचा
अभ्यास
होय”.
३) जे .आय .क्लार्क:
“प्रदेशापरत्वे
असलेल्या
भौगोलिक
भिनतेनुसार
लोकसंख्येचे
वितरण, वैशिष्ट्ये, आतररचना, वाढ
व
स्थलांतर
कशाप्रकारे
आहे, यासंबंधीचा
अभ्यास
म्हणजे
लोकसंख्या
भूगोल
होय”.
४) एडवर्ड
एकरमन:
“लोकांच्या
प्रगतीसाठी
निरनिराळ्या
प्रदेशातील
लोकांची
भिन्नता, वितरण, वर्गीकरण
व
प्रकार
इ.ची
प्रदेशानुसार
माहिती
समजून
घेणे
म्हणजे
लोकसंख्या
भूगोल
होय”.
५) ‘लोकसंख्या
भूगोल
म्हणजे
लोकसंख्या
लोकसंख्येची
वैशिष्ट्ये
व
वितरण
इत्यादींचा
अभ्यास
होय.’
(population Geography is the study of population,
characteristics and partial distribution)
लोकसंख्या
भूगोलाचे
स्वरूप
1. गतिमान
व परिवर्तनशील
स्वरूप
मानव
या
गतिमान
घटकाचा
अभ्यास
लोकसंख्या
भूगोलात
केला
जात
असल्यामुळे
सहाजिकच
या
विषयाचे
स्वरूप
गतिमान
व
परिवर्तनशील
असे
आहे. या
विषयांतर्गत
प्रामुख्याने
लोकसंख्येचे
वितरण, लोकसंख्येची
वाढ
लोकसंख्येचे
घटक, वयोगट, लिंग
रचना, स्थलांतर, जन्म
प्रमाण, मृत्यु
प्रमाण, लोकसंख्या
वाढीच्या
समस्या
व
त्यावरील
उपाय
याच
बरोबर
भाषा, धर्म, राहणीमानाचा
दर्जा, व्यवसाय
रचना, आर्थिक
रचना
अशा
मानवाशी
संबंधित
विविध
गोष्टींचा
अभ्यास
केला
जातो. मानवाने
त्याच्या
सभोवतालच्या
पर्यावरणाशी
कशाप्रकारे
समायोजन
केले
आहे. याचाही
अभ्यास
या
विषयात
केला
जातो.
2.लोकसंख्या
भूगोलाचे बहुव्यापी
व बहुस्पर्शी
स्वरूप
लोकसंख्या
भूगोलात
मानव
हा
अभ्यासाचा
केंद्रबिंदू
आहे. या
विषयात
मानव
बरोबरच
मानवी
जीवनाशी
संबंधित
प्राकृतिक
व
अप्राकृतिक
अशा
घटकांचाही
अभ्यास
समाविष्ट
होतो. प्रदेशानुसार
प्राकृतिक
घटकांमध्ये
विविधता
आढळते. या
प्राकृतिक
किंवा
भौगोलिक
विविधतेचा
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष
परिणाम
त्या
त्या
भौगोलिक
प्रदेशात
वास्तव्य
असणाऱ्या
मानवी
समूहाच्या
जीवनावर
होत
असतो. यामुळेच भिन्नभिन्न
हवामान,प्रदेशात
राहणाऱ्या
मानवाच्या
जीवनात
ही
विविधता
आढळून
येते. तसेच लोकसंख्येचे
वितरण
ही
सर्वत्र
सारखे
नाही.
कारण
लोकसंख्येच्या
क्षेत्रीय
वितरणावर
प्राकृतिक, सांस्कृतिक
व
आर्थिक
घटकांचा
परिणाम
होतो.
३. लोकसंख्या
भूगोल क्रमबद्ध
शाखा
लोकसंख्या
भूगोल
ही
भूगोलाची
एक
महत्त्वाची
क्रमबद्ध
शाखा
आहे. याअंतर्गत
लोकसंख्येच्या
संदर्भात
प्रादेशिक
विविधता
कशा
प्रकारे
निर्माण
होते
यावर
भर
दिला
जातो. लोकसंख्येच्या विभिन्न
घटकांचे
व
घटनांचे
विश्लेषण
केले
जाते. तसेच
क्षेत्रीय
गुणधर्मांचा
व
विविधतेचा
आधार
असणाऱ्या
मानवी
घटनांचा
पद्धतशीर
अभ्यास
केला
जातो.स्थल-कालानुरूप
लोकसंख्येचे
विभिन्न
निकष
स्पष्ट
केले
जातात. थोडक्यात लोकसंख्या
भूगोलात
लोकसंख्या
विषयक
संपूर्ण
घटकांचा
क्रमश:व
पद्धतशीर
अभ्यास
केला
जातो.
4. संख्यात्मक
स्वरूप
५. भौगोलिक
स्वरूप
६. आर्थिक
स्वरूप
७. तौलनिक
स्वरूप
१.२ लोकसंख्या
भूगोल अभ्यासाची
व्याप्ती
प्रस्तावना:
लोकसंख्या
भूगोलाचा
विविध
ज्ञान
शाखांशी
जवळचा
संबंध
येतो. त्यामुळे
लोकसंख्या
बहुस्पर्शी
असून
या
विषयाची
व्याप्ती
अतिशय
व्यापक
व
विस्तृत
स्वरूपाची
आहे. लोकसंख्या भूगोलाची
व्याप्ती
खालील
मुद्द्यांच्या
सहाय्याने
अधिक
स्पष्ट
होऊ
शकेल.
१) लोकसंख्येच्या
वितरणाचा अभ्यास:
प्रदेशानुसार
लोकसंख्येचे
वितरण, वितरणाचे स्वरूप, भूतकालीन
वितरण
व
भविष्यकालीन
वितरणाबाबतचा
अंदाज
इ. चा अभ्यास
यात
केला
जातो. केवळ
वितरणात्मक
माहिती
न
देता
त्यामागील
कारणांचा
ही
अभ्यास
केला
जातो.
२) लोकसंख्या
घनतेचा अभ्यास:
यात
लोकसंख्येची
घनता, घनतेचे
विविध
प्रकार, घनतेवर
परिणाम
करणारे
घटक, लोकसंख्या घनतेचा
जागतिक
आकृतीबंध
व
याच
बरोबर
त्या
संबंधित
परिणामांचाही
अभ्यास
केला
जातो.
३) स्थलांतर:
स्थलांतराचे
प्रकार, स्थलांतराची
कारणे
व
परिणाम
स्थलांतर
विषयक
नियम
स्थलांतरावर
परिणाम
करणारे
सामाजिक
व
भौगोलिक
घटक
तसेच
स्थलांतराचा
भौगोलिक
घटकावर
होणारा
परिणाम
इ.
४) लोकसंख्येची
वाढ:
लोकसंख्या
वाढीचा
अभ्यास, लोकसंख्या
वाढीचे
घटक, लोकसंख्या
वाढ
मोजण्याची
परिमाणे; मृत्युदराचे
प्रमाण, जनन दर, लोकसंख्यावाढीच्या
संबंधित
सिद्धांत, लोकसंख्या
प्रक्षेपण
इ.चा
सखोल
अभ्यास
केला
जातो.
५) लोकसंख्येची
रचना:
या अंतर्गत
लोकसंख्येची
रचना, लिंग
रचना, धार्मिक
रचना, भाषिक
रचना, आर्थिक
स्थिती, वैवाहिक
स्थिती, व्यवसायिक
रचना, साक्षरता
इत्यादींचा
अभ्यास
केला
जातो.
६) साक्षरता
व लोकसंख्येची
गुणवत्ता:
प्रदेशापरत्वे
लोकसंख्येची
साक्षरता, लिंग
भेदानुसार
साक्षरता
प्रमाण, शैक्षणिक
दर्जानुसार
साक्षरता
प्रमाण, साक्षरतेचा
प्रचार
व
प्रसारासंबंधी
उपाय
योजना, लोकसंख्येच्या
गुणवत्ता
वाढीसाठी
उपाययोजना
इत्यादींचा
अभ्यास
समाविष्ट
होतो.
७) ग्रामीण
व नागरी
लोकसंख्या:
ग्रामीण
व
नागरी
लोकसंख्येचे
वितरण, ग्रामीण
व
नागरी
लोकसंख्या
गुणोत्तर, त्यांची वैशिष्ट्ये, नागरीकरणाची
प्रक्रिया
व
कला, नागरीकरणाच्या
समस्या
व
उपाय
या
विषयीचा
अभ्यास
करणे.
८) लोकसंख्या
व नैसर्गिक
संपदा गुणोत्तर:
लोकसंख्या
व
उपलब्ध
नैसर्गिक
साधनसंपत्तीचे
परस्पर
गुणोत्तर, त्या
अनुषंगाने
लोकसंख्या
न्यूनतम, अतिरिक्त
किवा
इष्टतम
(पर्याप्त) आहे
हे
निश्चित
करणे, साधन
संपत्ती
वरील
लोकसंख्या
भार, साधनसंपदा व
लोकसंख्या
संतुलन
निर्माण
होण्यासाठी
लोकसंख्या
विषयक
धोरण
ठरविणे
इ. चा सखोल
अभ्यास
केला
जातो.
९) जागतिक
लोकसंख्येचा भौगोलिक
आढावा:
यात
प्रामुख्याने
जागतिक
लोकसंख्या
वितरण
वाढ, प्रक्षेपण, लोकसंख्येचे
जागतिक
स्थलांतर
रचना
लोकसंख्या
विषयक
गुणात्मक
व
संख्यात्मक
घटकांचा
अभ्यास
केला
जातो.
लोकसंख्या
भूगोलात
लोकसंख्येच्या
आर्थिक, सामाजिक
व
सांस्कृतिक
व
जैविक
गुणधर्माचा
सखोल
अभ्यास
केला
जातो. यामुळे
या
विषयाची
व्याप्ती
अधिक
विस्तृत
झालेली
आहे. लोकसंख्या भूगोलाची
व्याप्ती
खालील
तीन
मुद्द्यांच्या
आधारे
ही
ठरविता
येऊ
शकते.
१०) सामाजिक
व सांस्कृतिक
गुणधर्म
सामाजिक
व
सांस्कृतिक
गुणधर्म
यामध्ये
वार्षिक
वितरण, धर्म, जात, साक्षरता, वैवाहिक
स्थिती, भाषा, स्थलांतर
इत्यादींचा
समावेश
होतो.
११) आर्थिक
गुणधर्म
आर्थिक
गुणधर्म
यामधे
मनुष्यबळ
उपलब्धता, व्यवसाय, उत्पादन, वितरण ,राहणीमान, दरडोई
उत्पन्न, बेकारी
स्तर
इत्यादी
घटकांचा
समावेश
होतो.
१२) जैविक
गुणधर्म
जैविक
गुणधर्म
यामध्ये
जनन, मर्त्यता, वयोगट, लिंग
रचना, वंश, लोकसंख्येची
वाढ
इत्यादी
जीवशास्त्रीय
घटकांचा
अंतर्भाव
होतो.
वरील
मुद्द्यांच्या
अभ्यासावरून
लोकसंख्या
भूगोलाची
व्याप्ती
अतिशय
व्यापक
व
विस्तृत
असल्याचे
सिद्ध
होते.
१.३
लोकसंख्या
भूगोल अभ्यासाचे
महत्व
प्रस्तावना:
लोकसंख्या
भूगोलाचा
विविध
ज्ञान
शाखांशी
जवळचा
संबंध
येतो. त्यामुळे
लोकसंख्या
बहुस्पर्शी
असून
या
विषयाचे
महत्व
अतिशय
व्यापक
व
विस्तृत
आहे.लोकसंख्या
भूगोलाचे
महत्व
खालील
मुद्द्यांच्या
सहाय्याने
अधिक
स्पष्ट
होऊ
शकेल.
१) लोकसंख्येच्या
वितरण:
प्रदेशानुसार
लोकसंख्येचे
वितरण,वितरणाचे
स्वरूप, भूतकालीन
वितरण
व
भविष्यकालीन
वितरणाबाबतचा
अंदाज
इ.चा
अभ्यास
यात
केला
जातो. केवळ
वितरणत्मक
माहिती
न
देता
त्यामागील
कारणांची
माहिती
मिळते.
२) लोकसंख्या
घनता:
यात
लोकसंख्येची
घनता
घनतेचे
विविध
प्रकार
घनतेवर
परिणाम
करणारे
घटक, लोकसंख्या
घनतेचा
जागतिक
आकृतीबंध
व
याच
बरोबर
त्या
संबंधित
परिणामांचाही
माहिती
मिळते.
३) स्थलांतर:
स्थलांतराचे
प्रकार
स्थलांतराची
कारणे
व
परिणाम
स्थलांतर
विषयक
नियम
स्थलांतरावर
परिणाम
करणारे , स्थलांतरावर
परिणाम
करणारे
भौगोलिक
घटक
तसेच
स्थलांतराचा
भौगोलिक
घटकावर
होणारा
परिणाम
इ.
४) लोकसंख्येची
वाढ:
लोकसंख्यावाढीचा
अभ्यास
लोकसंख्या
वाढीचे
घटक
लोकसंख्या
वाढ
मोजण्याची
परिमाणे
मृत्युदराचे
प्रमाण, लोकसंख्यावाढीच्या
संबंधित
सिद्धांत, लोकसंख्या
प्रक्षेपण
इ.चा
सखोल
माहिती
मिळते.
५) लोकसंख्येची
रचना:
यामध्ये
अंतर्गत
लोकसंख्येची
रचना, लिंग
रचना, धार्मिक
रचना, भाषिक
रचना, आर्थिक
स्थिती, वैवाहिक
स्थिती, व्यवसायिक
रचना, साक्षरता
इत्यादींचा
माहिती
मिळते.
६) साक्षरता
व लोकसंख्येची
गुणवत्ता:
देशपरत्वे
लोकसंख्येची
साक्षरता, लिंग
भेदानुसार
साक्षरता
प्रमाण, शैक्षणिक
दर्जानुसार
साक्षरता
प्रमाण, साक्षरतेचा
प्रचार
व
प्रसारासंबंधी
उपाय
योजना, लोकसंख्येच्या
गुणवत्ता
वाढीसाठी
उपाययोजना
इत्यादींचा
माहिती
मिळते.
७) ग्रामीण
व नागरी
लोकसंख्या:
ग्रामीण
व
नागरी
लोकसंख्येचे
वितरण, ग्रामीण
व
नागरी
लोकसंख्या
गुणोत्तर, त्यांची वैशिष्ट्ये, नागरीकरणाची
प्रक्रिया
व
कला, नागरीकरणाच्या
समस्या
व
उपाय
या
विषयीचा
माहिती
मिळते.
८) लोकसंख्या
व नैसर्गिक
संपदा गुणोत्तर:
लोकसंख्या
व
उपलब्ध
नैसर्गिक
साधनसंपत्तीचे
परस्पर
गुणोत्तर, त्या
अनुषंगाने
लोकसंख्या
न्यूनतम, अतिरिक्त
किवा
इष्टतम
(पर्याप्त) आहे
हे
निश्चित
करणे, साधन
संपत्ती
वरील
लोकसंख्या
भार,साधनसंपदा
व
लोकसंख्या
संतुलन
निर्माण
होण्यासाठी
लोकसंख्या
विषयक
धोरण
ठरविणे
इ.चा
सखोल
माहिती
मिळते.
९) जागतिक
लोकसंख्येचा भौगोलिक
आढावा:
यात
प्रामुख्याने
जागतिक
लोकसंख्या
वितरण
वाढ
प्रक्षेपण
लोकसंख्येचे
जागतिक
स्थलांतर
रचना
लोकसंख्याविषयक
गुणात्मक
व
संख्यात्मक
घटकांचा
माहिती
मिळते.
१०) सामाजिक
व सांस्कृतिक
गुणधर्म:
सामाजिक
व
सांस्कृतिक
गुणधर्म
यामध्ये
वार्षिक
वितरण, धर्म, जात, साक्षरता, वैवाहिक
स्थिती, भाषा, स्थलांतर
इत्यादींचा
माहिती
मिळते.
११) आर्थिक
गुणधर्म:
आर्थिक
गुणधर्म
यामधे
मनुष्यबळ
उपलब्धता, व्यवसाय, उत्पादन, वितरण ,राहणीमान, दरडोई
उत्पन्न, बेकारी
स्तर, इत्यादी
घटकांचा
माहिती
मिळते.
१२) जैविक
गुणधर्म:
जैविक
गुणधर्म
यामध्ये
जनन,मर्त्यता, वयोगट, लिंग
रचना, वंश, लोकसंख्येची
वाढ
इत्यादी
जीवशास्त्रीय
घटकांचा
अंतर्भाव
होतो.
वरील
मुद्द्यांच्या
अभ्यासावरून
लोकसंख्या
भूगोलाचे
स्वरूप
गतिमान
परिवर्तनशील
व
बहूव्यापी
असून
अतिशय
व्यापक
व
विस्तृत
असल्याचे
सिद्ध
होते. लोकसंख्या
भूगोलाचे
महत्व
अनन्यसाधारण
आहेत.
१.४ लोकसंख्या
सामग्री
स्त्रोत
(Population Data Sources)
प्रस्तावना
लोकसंख्या
भूगोलाचा
अभ्यास
करण्यासाठी
लोकसंख्याविषयक
सामग्रीची
नितांत
आवश्यकता
असते.
परंतु
लोकसंख्या
भूगोलच्या
अभ्यासातील
हीच
खरी
अडचण
आहे
कि, मिळालेली
लोकसंख्या
सामग्री
योग्य
व
अचूक
असेलच
याची
खात्री
नसते.
लोकसंख्या
मुळातच
गतिशील
असल्यामुळे
ती
सतत
बदलत
असते
त्यामुळे
लोकसंख्याविषयक
घटकांमध्ये
ही
बदल
होत
असतात.अशा
या
गतिशील
व
परिवर्तनशील
असलेल्या
लोकसंख्येच्या
सर्व
घटकांची
सांख्यिकीय
माहिती
एका
विशिष्ट
काळात
गोळा
करणे
एका
व्यक्तीला
शक्य
नसते.
यामुळे
लोकसंख्याविषयक
घटकांचा
अभ्यास
करणाऱ्या
अभ्यासकांना
अशा
माहितीसाठी
इतर
विविध
प्रकारच्या
दप्तरी
माहितीवर
अवलंबून
राहावे
लागते.
लोकसंख्या ही
संख्यात्मक
अभिव्यक्ती
असते. या
अभिव्यक्तीची
गुणवत्ता
मानवी
प्रतिसादावर
अवलंबून
असते. त्यामुळे
लोकसंख्या
सामग्री
गोळा
करताना
व
तिचे
विश्लेषण
करताना
काटेकोर
पद्धतीचा
अवलंब
करावा
लागतो.
लोकसंख्येचा
अभ्यास
करताना
कोणकोणती
सामग्री
आवश्यक
आहे
व
ती
कोठून
मिळवता
येईल
याची
माहिती
असणे
आवश्यक
असते.लोकसंख्या
सामग्रीचा
व्याप
आणि
विस्तार
फार
मोठा
असतो.
लोकसंख्या
भूगोल
ही
भूगोलाची
एक
ज्ञानधिष्टीत
शाखा
आहे, त्यामुळे
लोकसंख्येच्या
गतिशील
तेथील
प्रमुख
घटकांची
स्पष्टपणे
मोजणी
करणे
शक्य
असते.
लोकसंख्याविषयक
सामग्रीचे
विविध
उगमस्त्रोत
असून,दिवसेंदिवस
सामग्री
गोळा
करण्याच्या
पद्धती
सुधारणा
होत
आहे
त्यामुळे
लोकसंख्या
सामग्री
गोळा
करणे
पूर्वी
पेक्षा
सोपे
होत
आहे. परंतु लोकसंख्या
गतिमान
असल्यामुळे
आज
मिळविलेली
लोकसंख्या
सामग्री
काही
ठराविक
काळानंतर
पुन्हा
मिळवावी
लागते
व
मिळालेली
माहिती
विविध
तक्त्यामध्ये
मांडून
तिचे
नियमित
प्रसिद्धी करावे
लागते.
लोकसंख्या
सामग्री उगम
स्त्रोताचे प्रकार
लोकसंख्या
सामग्री
कोठून
व
कशाप्रकारे
मिळवली
आहे
म्हणजेच
लोकसंख्या
सामग्रीच्या
उगम
स्त्रोताचे
स्वरूप
कशा
प्रकारचे
आहे, यावरून
लोकसंख्या
सामग्रीच्या
उगम
स्त्रोताचे
खालील
तीन
प्रकार
केले
जातात.
१)
प्राथमिक
उगमस्त्रोत
२)
द्वितीयक
उगमस्त्रोत
३)
तृतीयक
उगमस्त्रोत
(१) प्राथमिक
उगमस्त्रोत
‘जेव्हा
एखाद्या
भौगोलिक
किंवा
राजकीय
प्रदेशातील
लोकसंख्या
विषयक
आकडेवारी
त्या
प्रदेशात
जाऊन
प्रत्यक्ष
निरीक्षणाद्वारे
किंवा
क्षेत्रीय
सर्वेक्षणाद्वारे
प्राप्ती
केली
जाते
तेव्हा
त्यास
प्राथमिक
उगमस्त्रोत
म्हणतात’.
उदा. प्रत्यक्ष
निरिक्षण, मुलाखती, प्रश्नावली, नमुना
सर्वेक्षण
व
जनगणना
या
पद्धतीचा
वापर
करून
लोकसंख्याविषयक
आकडेवारी
मिळते
जाते. लोकसंख्याविषयक अभ्यासात
प्राथमिक
उपक्रमांचे
महत्त्व
अनन्यसाधारण
आहे
कारण
या
उगमस्त्रोत
द्वारे
मिळविलेली
आकडेवारी
सत्य
स्वरूपाची
असू
शकते. त्यामुळे या
प्रकाराच्या
आकडेवारीवर
आधारित
संशोधनाद्वारे
मांडलेले
निष्कर्ष
अचूक
ठरू
शकतात.
या पद्धतीत
प्रश्नावली,
निरीक्षण,
सर्वेक्षण
व
प्रत्यक्ष
संपर्कद्वारे
माहिती
गोळा
केली
जाते
परंतु
या
पद्धतींचा
वापर
कशाप्रकारे
केला
जातो,
माहिती
संकलित
करणाऱ्या
व्यक्तींनी
किती
प्रामाणिकपणे
संकलन
केले
आहे. तसेच
माहिती
पुरविणाऱ्या
व्यक्तींनी
कितपत
खरी
माहिती
दिली
आहे, यावर
या
उगम
उगमस्त्रोत
द्वारे
मिळविलेल्या
आकडेवारीची
विश्वासहर्ता
व
अचूकता
अवलंबून
असते.
थोडक्यात, प्रत्यक्ष
गणक
व्यक्ती
जेव्हा
एखाद्या
विशिष्ट
प्रदेशात
जाऊन
स्वतः
माहिती
मिळवतात
तेव्हा
त्या
पद्धतीस
प्राथमिक
उगमस्त्रोत
असे
म्हणतात.
प्राथमिक
उगम स्त्रोताची
वैशिष्ट्ये
१.
या
आकडेवारीत
चुका
असण्याची
शक्यता
असते.
२.
ही
अप्रमाणित
असते.
३.
ही
निरनिराळ्या
स्वरूपात
असते.
४.
या
आकडेवारी
विशेष
शंका
असतात.
५.
या
आकडेवारीची
निश्चितता करण्याची
गरज
असते.
२) द्वितीय
उगमस्त्रोत
प्राथमिक
उगम
स्वतः
द्वारे
मिळविलेल्या
माहितीवर
विविध
संस्कार
करून
ती
माहिती
निर्णय
या
माध्यमांद्वारे
प्रकाशित
व
गोळा
केली
जाते.
उदा. जनगणना पुस्तिका, सांख्यिकी
अहवाल, वार्षिक
अहवाल, संशोधन
पत्रिका, लोकसंख्याविषयक
सारणी, ग्रंथ, आंतरराष्ट्रीय
नियतकालिके, वर्तमानपत्रे, नोंदणी
पुस्तके, हस्तलिखित, कागदपत्रके, लिखाण, इ.
ही
सर्व
प्रकाशने
लोकसंख्याविषयक
आकडेवारीचे
द्वितीय
उपक्रम
सुरू
होत
आहेत.
प्राथमिक
उगमश्रोताद्वारे
प्राप्त
झालेली
आकडेवारी
निरनिराळ्या
तक्त्यामध्ये
व्यवस्थित
मांडणी
करून
व
त्यावर
इतर
सांख्यिकीय
पद्धती
द्वारे
संस्कार
करून
प्रकाशित
केली
जाते.
संयुक्त
राष्ट्रसंघ
द्वारे
विविध
देशांची
लोकसंख्या
विषयक
माहिती
प्रकाशित
केली
जाते. युनोची
ही
प्रकाशने
द्वितीय
उगमस्त्रोत
आहेत.
थोडक्यात, प्राथमिक उगम
श्रोता
द्वारे
मिळालेली
माहिती
ज्या
विविध
माध्यमांद्वारे
प्रकाशित
केली
जाते
त्या
माध्यमांचा
समावेश
द्वितीय
उगम
स्त्रोतामध्ये
केला
जातो. या स्त्रोताचे
उगम
व
सुरुवात
प्राथमिक
उगमा
स्रोतावर
आधारित
असतात.
द्वितीयक
उगम स्त्रोतांची
वैशिष्ट्ये
1. या
पद्धतीमुळे
वेळ
व
पैशांची
बचत
होते.
2. याद्वारे
सामाजिक
व
आर्थिक
बदलाची
माहिती
मिळते.
3. ही
प्रमाणित
आकडेवारी
समजतात.
३) तृतीय
उगमस्त्रोत
जेव्हा
एखाद्या
विशिष्ट
उद्दिष्ट
पूर्तीसाठी
आवश्यक
असलेली
लोकसंख्या
विषयक
आकडेवारी
द्वितीय
उगमस्त्रोतद्वारे
मिळवून
तिच्यावर
संस्कार
करून
ती
नवीन
स्वरूपात
मांडले
जाते
तेव्हा
त्यास
तृतीयक
उगमस्त्रोत
म्हणतात.
उदा. संशोधन
प्रकल्प
किवा
अहवाल.
प्रकल्प
किंवा
अहवाल
तयार
करताना
प्राथमिक
व
द्वितीय
उगमस्त्रोत
द्वारे
प्राप्त
केलेल्या
सामग्रीचा
उपयोग
केला
जातो
व
त्यावर
विविध
पद्धतींचा
किंवा
निकषांचा
वापर
करून
ती
वर्गीकृत
स्वरूपात
किंवा
सूत्रांद्वारे
संक्षिप्त
स्वरूपात
पुन्हा
मांडली
जाते
या
स्रोतांचा
उपयोग
क्वचित
प्रसंगी
केला
जातो.
वरील
तिन्ही
उगमस्त्रोतापैकी
प्राथमिक
उगमश्रोत
मूलभूत
स्वरूपाचे
असून, त्याचे
महत्त्व
अनन्यसाधारण
आहे. याच
उगमस्त्रोतावर
द्वितीय
व
तृतीय
उगमस्त्रोत
अवलंबून
असतात.