ॲक्यूवेदर AccuWeather
ॲक्यूवेदर (AccuWeather) ही एक प्रसिद्ध अमेरिकन हवामान अंदाज देणारी
सेवा आहे जी जगभरातील हवामान डेटा आणि अंदाज पुरवते. 1962
मध्ये जोएल एन. मायर्स या हवामानतज्ज्ञ आणि उद्योजकाने या सेवेची स्थापना केली,
मायर्स हे एक प्रसिद्ध हवामानतज्ज्ञ आहेत, ज्यांनी
पेनसिल्व्हानिया मधील विद्यापीठात हवामानशास्त्राचा सखोल अभ्यास केला आहे. ॲक्यूवेदरचे मुख्यालयस्टेट कॉलेज, पेनसिल्व्हानिया, यू.एस.ए. येथे आहे.
ॲक्यूवेदर (AccuWeather) ची स्थापना करण्यामागे मायर्स यांचा उद्देश लोकांना
वैयक्तिकृत आणि अचूक हवामान अंदाज देणे हा होता, विशेषत:
व्यवसायिक आणि माध्यम क्षेत्रासाठी हवामान अंदाज देण्यासाठी या सेवेची निर्मिती
केली गेली. ॲक्यूवेदर (AccuWeather) आज हवामान अंदाज क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण
स्थान मिळवले आहे. याची सेवा व्यक्तिगत, व्यवसायिक आणि आंतरराष्ट्रीय
संस्थांना उपलब्ध आहे. आज, ॲक्यूवेदर (AccuWeather) जवळपास 200 हून अधिक
देशांमध्ये व100 हून अधिक भाषांमध्ये हवामान अंदाज देते,
ज्यामुळे विविध देशांतील वापरकर्ते हवामान माहिती सहजपणे समजू शकतात
व दररोज 1.5 अब्जांहून अधिक लोक ॲक्यूवेदर (AccuWeather) च्या सेवांचा वापर करतात यावरून या सेवेची व्यापकता
आणि लौकीकता दिसून येते. ही कंपनी हवामान
अंदाज, हवामानशास्त्रीय सेवा, मोबाइल
उपकरणांसाठी हवामान अॅप्स इ. सेवा उपलब्ध करून देते.
ॲक्यूवेदरचा
इतिहास
आणि विकास
प्रारंभीच्या काळात, ॲक्यूवेदर (AccuWeather) ने छोट्या रेडिओ स्टेशनसाठी आणि स्थानिक
वृत्तपत्रांसाठी हवामान अंदाज देण्याचे काम सुरू केले. सुरुवातीपासूनच कंपनीने
अचूक आणि विशेष हवामान विषयक प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित केले होते. वर्षानुवर्षे,
ॲक्यूवेदर (AccuWeather) ने टीव्ही, रेडिओ,
वृत्तपत्रे आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे आपली पोहोच वाढवली व कंपनीची
अतिशय स्थानिक स्तरापर्यंत अचूक अंदाज
देण्याची क्षमता प्रसिद्ध होत गेली.
इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या उदयामुळे, ॲक्यूवेदर (AccuWeather) ने आपल्या ऑनलाइन उपस्थितीचा वेगाने विस्तार
केला. 1990 च्या दशकात त्यांनी ॲक्यूवेदर (AccuWeather) वेबसाइट सुरू केली आणि नंतर मोबाइल अप्लिकेशन
लाँच केले ज्यामुळे वापरकर्त्यांना हवामानाची सध्यस्थिती अद्यावत व अचूकपणे मिळू लागली
तसेच आणि हवामान व हवामानात होणार्या बदलांची माहिती घेऊन भविष्यकालीन चेतावन्या
मिळू लागल्या.
ॲक्यूवेदरची
वैशिष्ठे
१.
हायपर लोकल अंदाज : ॲक्यूवेदर (AccuWeather) हे एक महत्वाचे वैशिष्ठ आहे, ही एक विशेष सेवा
आहे यात "MinuteCast" ची सुविधा उपलब्ध आहे, जी
मिनिटा मिनिटाला हवामान अंदाज देते. या सेवेमुळे वापरकर्त्याला
त्यांच्या प्रत्यक्ष ठिकाणाचा अगदी अचूक व त्या वेळेचा हवामान अंदाज मिळतो.
२.
अचूकता: ॲक्यूवेदर (AccuWeather) नेहमीच आपल्या अचूकतेवर भर देते. तसेच कंपनी
मोठ्या हवामान घटनांचा अंदाज वर्तवण्याच्या बाबतीत आपल्या माहितीची साठवण आणि उपयोजनावर
आधारित हवामान अंदाजांची शक्यता चांगली असल्याचा दावा करते.
३.
दीर्घकालीन हवामान अंदाज: ॲक्यूवेदर (AccuWeather) दीर्घकालीन हवामान अंदाज देण्यासाठी ओळखले जाते,
ज्याचा वापर व्यवसायिक विशेषत: कृषी, ऊर्जा,
आणि वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जातो.
४.
तत्काल हवामान चेतावणी : हवामानात घडणाऱ्या गंभीर घटनांबद्दल सर्वाधिक जलद चेतावणी
देणे हे ॲक्यूवेदर (AccuWeather) चे आणखी एक वैशिष्ट्य आहे. "ॲक्यूवेदर (AccuWeather) Network" हिवाळी वादळे, पूर, चक्रीवादळ यासारख्या घटनांबद्दल तत्काळ माहिती
प्रसारित करत असते.
ॲक्यूवेदरची (AccuWeather) उत्पादने आणि सेवा
1.
ॲक्यूवेदर संकेतस्थळ: (www.accuweather.com): या संकेतस्थळावर तपशीलवार हवामान अंदाज, सॅटेलाइट
नकाशे, रडार इमेजरी आणि हवामानाशी संबंधित माहिती मिनिटा मिनिटाला
प्रदर्शित केली जाते.
2.
मोबाइल अॅप्स: ॲक्यूवेदर (AccuWeather) मोबाईल वापर करणार्यासाठी सुद्धा हवामान विषयक माहिती
उपलब्ध करून देते, या अॅपची विशेषता म्हणजे अचूकता आणि रिअल टाइम हवामानाचे वृत्तात लवकर मिळवता येतात.
3.
ॲक्यूवेदर (AccuWeather) Network : दिवसातील 24/7 वेळ हवामान सेवा, हवामान बातम्या, वादळ ट्रॅकिंग,
आणि हवामानासंबंधी माहिती देत असते.
4.
व्यावसायिक उपाय: ॲक्यूवेदर (AccuWeather for Business) : विविध
उद्योगांसाठी अनुकूल हवामान उपाय, जे व्यवसाय निर्णय घेण्यात
मदत करतात ते पुरवण्याचे काम करते. तसेच दीर्घ कालीन साठवून ठेवलेला हवामान विषयक माहिती
आभ्यासासाठी व संशोधनासाठी उपलब्ध करून देते.
5.
ॲक्यूवेदर हवाई मार्गांसाठी (AccuWeather) for Airlines) : कंपनी विमान
वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना हवामानाचा अचूक अंदाज आणि सध्य वेळेची हवामानाची कल्पना
तसेच इशारा देते, ज्यामुळे उड्डाणाच्या सुरक्षिततेमध्ये
सुधारणा होते.
6.
शेतीसाठी ॲक्यूवेदर (AccuWeather) for Agriculture): शेतकऱ्यांसाठी
विशेष हवामान माहिती, जसे की पीक लागवड, पाणी व्यवस्थापन, आणि कापणीसाठी अंदाज पुरवण्याचे काम
या संकेतस्थळा मार्फत केले जाते.
थोडक्यात ॲक्यूवेदर (AccuWeather) ने अचूक अंदाज, नाविन्यपूर्ण
तंत्रज्ञान आणि विस्तृत सेवांच्या आधारे हवामान अंदाज क्षेत्रात स्वतःची जागा
निर्माण केली आहे. इंटरनेट आणि मोबाइल डिव्हाइससाठी उपलब्धता वाढवून, त्यांनी आपली सेवा व्यक्तिगत आणि व्यवसायिक स्तरावर विस्तारित केली आहे. ॲक्यूवेदर (AccuWeather) ने हवामान अंदाज सेवा क्षेत्रात आपले स्थान
मजबूत केले आहे, परंतु त्याच वेळी, काही
वादग्रस्त घटनांमुळे कंपनी टीकेचाही विषय बनली आहे. सरकारी संसाधनांच्या वापरातील
हितसंबंधांचा संघर्ष आणि वापरकर्त्याच्या डेटाशी संबंधित वादांमुळे कंपनीला काही
विरोधांचा सामना करावा लागला आहे.
ॲक्यूवेदर (AccuWeather) वापरण्यासाठी स्टेप्स:
1. ॲक्यूवेदर (AccuWeather) अॅप डाउनलोड करा:
मोबाइल अॅप:
iOS साठी: App Store वर जा, “AccuWeather" शोधा,
आणि अॅप डाउनलोड करा.
Android साठी: Google
Play Store वर जा, AccuWeather" शोधा,
आणि अॅप डाउनलोड करा.
वेबसाइट:
ॲक्यूवेदर (AccuWeather) च्या अधिकृत वेबसाइटवर www.accuweather.com ला
भेट द्या.
2. अॅप किंवा वेबसाइटवर साइन अप करा:
अॅपमध्ये
तुमचा खाती तयार करणे आवश्यक असू शकते, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या ठिकाणासाठी वैयक्तिकृत
हवामान माहिती मिळेल. काही सुविधांचा वापर करण्यासाठी (उदाहरणार्थ, गंभीर हवामान सूचना) तुम्हाला ईमेल किंवा मोबाईल नंबरच्या साह्याने खाते
तयार करणे आवश्यक असू शकते.
3. स्थान निवडा :
अॅप उघडल्यावर, तुमच्या स्थानाची माहिती प्रविष्ट करा.
तुम्ही GPS चा वापर करून तुमचं स्थान स्वयंचलितपणे शोधू शकता
किंवा तुमच्या शहराचं नाव टाकून स्थानाची निवड करू शकता.
वेबसाइटवर:
मुख्य पृष्ठावर, तुमचं
स्थान शोधण्यासाठी सर्च बारमध्ये शहराचं नाव टाका.
4. हवामान अंदाज पहा:
तुम्ही ज्या ठिकाणाचा हवामान अंदाज पाहू इच्छिता, त्यासाठी तुम्हाला मुख्य
पृष्ठावर थेट हवामान अंदाज दिसेल. तुम्ही तासानुसार, दिवसभराचा
किंवा आठवडाभराचा अंदाज देखील पाहू शकता. तसेच तुम्ही तापमान, आर्द्रता, वारा, आणि
पर्जन्याच्या शक्यतेसारख्या माहितीचे तपशील पाहू शकता.
5. MinuteCast वापरा:
MinuteCast विशेषता वापरून, तुम्हाला
तुमच्या स्थानासाठी मिनिट दर मिनिटाचा पाऊस किंवा बर्फबारीचा अंदाज मिळतो. यामुळे
तुम्हाला कोणत्याही बाहेरच्या कामांच्या नियोजनासाठी योग्य वेळ ठरवता येतो.
6. गंभीर हवामान सूचना सेट करा:
अॅपमध्ये
तुम्ही गंभीर हवामान घटनांसाठी सूचना सेट करू शकता. यामध्ये वादळ, बर्फवृष्टी, आणि इतर हवामानाच्या अडचणींच्या माहितीचा समावेश असतो. सेटिंग्जमध्ये जाऊन
"Notifications" किंवा "Alerts" वर क्लिक करा आणि तुमच्या प्राधान्यानुसार सूचना कशा मिळवायच्या ते निवडा.
7. रडार आणि सॅटेलाइट पहा :
ॲक्यूवेदर (AccuWeather) अॅप आणि वेबसाइटवर तुम्हाला हवामान रडार आणि
सॅटेलाइट चित्रे देखील पाहायला उपलब्ध करून देते. जे तुम्हाला वर्तमान हवामान
स्थिती अधिक स्पष्टपणे समजून घेण्यात मदत करतात.
8. माहिती आणि लेख वाचणे:
ॲक्यूवेदर (AccuWeather) च्या ब्लॉग आणि माहिती विभागामध्ये हवामानाच्या
विशेष घटनांबद्दल, हवामान शास्त्राबद्दल, आणि पर्यावरणीय विषयांवर लेख वाचू शकता. यामुळे तुम्हाला अधिक माहिती
मिळेल आणि हवामानाशी संबंधित प्रवाह आणि घडामोडींची माहिती मिळेल.
9. अधिक कार्ये:
ॲक्यूवेदर (AccuWeather) अॅपमध्ये इतर कार्ये जसे की हवामानाचा इतिहास
पाहणे, उपग्रह फोटो पाहणे, आणि व्यवसाय
किंवा कृषि संबंधित हवामान माहिती मिळवणे देखील उपलब्ध आहे.
ॲक्यूवेदर (AccuWeather) वापरणे अत्यंत सोपे आहे, आणि
ते तुम्हाला अचूक आणि विश्वसनीय हवामान माहिती प्रदान करते. तुम्हाला तुमच्या
स्थानासाठी वैयक्तिकृत सेवा मिळवण्यासाठी अॅप किंवा वेबसाइटवरील सेटिंग्जमध्ये
थोडेफार बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्थानाच्या हवामानाची
उत्तम माहिती मिळेल.
विंडी Windy
विंडी (Windy.com) ची स्थापना 10 नोहेंबर 2014 साली झेक रिपब्लिक मधील एक प्रसिद्ध
सॉफ्टवेअर अभियंता आणि वैमानिक इगोर
कोरनर (Ivo
Lukač) यांनी केली. सुरुवातीला हे प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आले
होते, परंतु लवकरच ते एक जागतिक दर्जाचे हवामान अंदाज देणारे
व्यासपीठ बनले. विंडी चे मुख्यालय झेक रिपब्लिक मधील प्राग या ठिकाणी आहे.
विंडी
(Windy)ची स्थापना आणि उद्दिष्टे:
इगोर
कोरनर यांना पायलट असल्यामुळे हवामानाच्या अचूक माहितीची गरज होती, विशेषत: वाऱ्याच्या गती आणि दिशेचा अंदाज लावण्यासाठी. त्यांना असे वाटले
की, उपलब्ध हवामान अंदाज साधने पुरेशी अचूक आणि सुलभ नव्हती,
त्यामुळे त्यांनी एक असे व्यासपीठ तयार करण्याचा विचार केला,
जे हवामानाची सजीव (live) आणि अचूक माहिती
पुरवेल. याच विचारातून विंडी (Windy) चा जन्म
झाला.
शुरुवातीला, विंडी (Windy) हे एक छोटेसे वेबसाइट प्रकल्प होते,
ज्यावर वाऱ्याचे अंदाज आणि माहिती सादर केली जात होती. परंतु,
इगोर कोरनर यांनी यामध्ये सतत सुधारणा आणि नवीन फीचर्स आणले,
ज्यामुळे विंडी (Windy) लवकरच जगभरात लोकप्रिय
झाले.
विंडी
(Windy)चा विकास:
१. प्रारंभिक टप्पा (2014 2016):
सुरुवातीच्या
काळात विंडी (Windy)वर फक्त वारा, तापमान,
आणि ढगांची माहिती उपलब्ध होती. वेबसाइटचे ग्राफिकल इंटरफेस साधे
होते आणि ती वापरण्यास सोपी होती. वापरकर्त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे इगोर
कोरनर यांनी अधिक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला.
२. सुधारणा आणि नवी
फीचर्स (2016
2018):
विंडी
(Windy)मध्ये वेगवेगळे हवामान मॉडेल्स (ECMWF, GFS) समाविष्ट
करण्यात आले, ज्यामुळे हवामानाच्या अधिक अचूक अंदाजाची सोय
झाली. याव्यतिरिक्त, पाऊस, वादळ,
समुद्रातील लाटा, बर्फाचे प्रमाण, आणि हवेतल्या प्रदूषणाची माहिती मिळवण्याची क्षमता विंडी (Windy)मध्ये जोडली गेली.
३. मोबाइल अॅपची सुरुवात:
वेबसाइटची
लोकप्रियता वाढल्यानंतर, विंडी (Windy)ने मोबाइल ॲप्स विकसित केले. 2017
मध्ये विंडी (Windy)ने Android आणि iOS साठी ॲप्स लॉन्च केली. या ॲप्समुळे लोकांना हवामानाची सजीव माहिती त्यांच्या मोबाइलवर मिळू लागली.
४. जगभरातील वापर आणि
व्यावसायिक लोकप्रियता:
विंडी
(Windy)चे अचूक आणि विस्तृत हवामान अंदाज हे केवळ सर्वसामान्य नागरिकांसाठीच
नव्हे, तर व्यावसायिकांसाठीही उपयुक्त ठरले. वैमानिक,
नौकानयन करणारे, मच्छीमार, तसेच हवामानतज्ञ या सर्वांनी विंडी (Windy)चा वापर
केला. 2019 पर्यंत, विंडी (Windy)ने 10 दशलक्षांहून अधिक वापरकर्ते मिळवले होते.
५. सतत विस्तार:
विंडी
(Windy)ने वेळोवेळी नव्या फीचर्स आणि सुधारणा केल्या. हवामानाच्या मॉडेल्सची
संख्या वाढवून जगभरातील विविध भागांतील अचूक अंदाज मिळवण्याची सोय केली. त्यांनी
एअर क्वालिटी मॉनिटरिंग, विजांचा कडकडाट, आणि अत्यंत तपशीलवार हवामान अंदाजांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला.
विंडी (Windy)ची वैशिष्ट्ये:
1. विस्तृत नकाशे:
Windy मध्ये विविध प्रकारचे
हवामान नकाशे उपलब्ध आहेत, जसे की:
रडार नकाशे: हे नकाशे पर्जन्याची स्थिती आणि तीव्रता दर्शवतात. ते तुम्हाला विविध
स्थानांवर पाऊस, बर्फ, आणि इतर जलवायू
घटक कसे आहेत हे स्पष्टपणे दर्शवतात.
उपग्रह चित्रे: उपग्रहांच्या माध्यमातून संकलित केलेले चित्रे हवामानाच्या मोठ्या
प्रमाणातील स्थितीचे दृश्य देते, जसे की वादळे आणि
हवामानाच्या बदलांचा मागोवा घेण्यास मदत करते.
वाऱ्याचे प्रवाह नकाशे: हे नकाशे वाऱ्याच्या वेग आणि दिशेचे दृश्य
दर्शवतात. यामुळे जलक्रीडा, पॅराग्लाइडिंग, आणि इतर बाह्य क्रियाकलापांसाठी
उपयुक्त ठरते.
2. तासानुसार आणि दीर्घकालीन
हवामान अंदाज:
Windy वापरकर्त्यांना तासानुसार
हवामान अंदाज मिळवतो, ज्यामध्ये तापमान, वाऱ्याचा वेग, आर्द्रता, आणि
पर्जन्याची माहिती समाविष्ट असते.
दीर्घकालीन अंदाज साधारणतः 10 दिवसांच्या कालावधीत
दिला जातो, ज्यामुळे वापरकर्ते आपल्या क्रियाकलापांची योजना
करू शकतात.
3. MinuteCast सेवा:
Windy ची MinuteCast सेवा वापरकर्त्यांना त्यांच्या स्थानासाठी मिनिट दर मिनिटाचा पाऊस किंवा
बर्फबारीचा अंदाज मिळवते. हे खासकरून बाहेरच्या क्रियाकलापांसाठी उपयोगी आहे,
कारण तुम्हाला संपूर्ण दिवसाचे हवामान जाणून घेता येते.
4. डेटा कस्टमायझेशन:
Windy मध्ये वापरकर्त्यांना विविध
घटकांवर आधारित नकाशे कस्टमायझेशनची सुविधा आहे. वापरकर्ते विविध हवामान घटक जसे
की तापमान, आर्द्रता, वारा, आणि पर्जन्य दर्शवणारे नकाशे सेट करू शकतात. यामुळे, वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार योग्य माहिती मिळवता येते.
5. सामाजिक समुदाय:
Windy वापरकर्त्यांना त्यांच्या
अनुभवांची माहिती सामायिक करण्याची संधी देते. वापरकर्ते इतरांशी त्यांच्या
स्थानाच्या हवामानाबद्दल चर्चा करू शकतात, तसेच अनुभव आणि
माहिती आदानप्रदान करू शकतात.
6. उपग्रह आणि रडार डेटा:
Windy विविध उपग्रह आणि रडार डेटा
स्रोतांचा वापर करते, ज्यामुळे ते सुसंगत आणि अचूक हवामान
अंदाज प्रदान करतात. हे डेटा स्त्रोत प्रामुख्याने ECMWF, GFS आणि इतर हवामान संस्थांकडून उपलब्ध असतात.
7. समर्थनित प्लॅटफॉर्म:
Windy अॅप Android आणि iOS दोन्हीवर उपलब्ध आहे, तसेच
वेब प्लॅटफॉर्मवर देखील कार्य करते. त्यामुळे वापरकर्ते कुठेही आणि केव्हा पाहू
शकतात.
.८. प्रगतीशील ग्राफिक्स आणि नकाशे:
विंडी
(Windy)ची विशेषता म्हणजे त्याचे आकर्षक आणि
प्रगत ग्राफिक्स. हवामानाचा सजीव नकाशा वापरकर्त्यांना सहजपणे कळतो. तसेच नकाशावर
आपल्या स्थानिक क्षेत्राची माहिती अधिक स्पष्टपणे पाहण्यासाठी झूम इन आणि झूम आउट
करण्याची सुविधा आहे.
कार्यप्रणाली:
1. डेटा संकलन:
Windy विविध हवामान संस्थांकडून
डेटा संकलित करते. यामध्ये उपग्रह, रडार, आणि मौसम मॉडेल्सचा समावेश असतो. हे सर्व डेटा एकत्र करून, Windy एक व्यापक आणि सुसंगत हवामान नकाशा तयार करतो.
2. दृश्यात्मक प्रतिनिधित्व:
Windy चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे
याचा दृश्यात्मक अंदाज. रडार, उपग्रह चित्रे, आणि वाऱ्याच्या प्रवाहांचे नकाशे वापरून, वापरकर्ते
साध्या भाषेत हवामानाची स्थिती समजू शकतात.
3. इंटरफेस डिझाइन:
Windy चा इंटरफेस वापरण्यासाठी
सोपा आहे, ज्यामुळे वापरकर्ते सहजपणे हवामानाची माहिती मिळवू
शकतात. नकाशे आणि डेटा प्रदर्शित करण्यासाठी आकर्षक आणि उपयुक्त डिझाइन केलेले
आहे.
4. अवांछित डेटा कमी करणे:
Windy चा डिझाइन अवांछित डेटा कमी
करण्यावर लक्ष केंद्रित करतो, त्यामुळे वापरकर्त्यांना
आवश्यक माहिती सहजपणे मिळवता येते.
5. मोबाइल अॅपमध्ये वैशिष्ट्ये:
Windy च्या मोबाइल अॅपमध्ये
देखील सर्व प्रमुख वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. वापरकर्ते त्यांच्या स्थानासाठी
वैयक्तिकृत डेटा मिळवण्यासाठी अॅप सेटिंग्जमध्ये बदल करू शकतात.
Windy च्या विशेषता आणि
कार्यप्रणाली यामुळे ते हवामान अंदाजांच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण साधन बनले
आहे. विविध नकाशे, हवामान डेटा, आणि
सामाजिक समुदायामुळे, Windy वापरकर्त्यांना अचूक आणि सखोल
हवामान माहिती प्रदान करते. जलक्रीडा आणि बाहेरच्या क्रियाकलापांसाठी हे विशेषतः
उपयुक्त आहे.
उपयोगिता:
Windy चा उपयोग जलक्रीडा,
पॅराग्लाइडिंग, सर्फिंग, आणि इतर बाहेरच्या क्रियाकलापांमध्ये केला जातो. वापरकर्त्यांना
त्यांच्यासाठी सर्वोत्तम हवामान स्थिती आणि वाऱ्याच्या प्रवाहाची माहिती
मिळविण्यात मदत होते.
शेतकऱ्यांमध्ये हे हवामानाच्या आधारे त्यांच्या
पिकांची लागवड, जल
व्यवस्थापन, आणि कापणीची योजना करण्यास उपयुक्त ठरते.
Windy एक अत्याधुनिक हवामान सेवा
आहे जी वापरकर्त्यांना अचूक आणि सखोल हवामान माहिती प्रदान करते. या सेवेमुळे
जलक्रीडा, व्यवसाय, आणि वैयक्तिक
उपयोगासाठी हवामानाची स्थिती समजून घेणे सोपे होते. विविध डेटा स्रोत आणि
दृश्यात्मक सादरीकरणाच्या वापरामुळे Windy ने हवामान
सेवांच्या क्षेत्रात एक अनोखा ठसा निर्माण केला आहे.
Windy वापरण्यासाठी स्टेप्स:
1. Windy अॅप डाउनलोड करा:
मोबाइल अॅप:
iOS साठी: App Store वर जा, "Windy" शोधा, आणि अॅप डाउनलोड करा.
Android साठी: Google
Play Store वर जा, "Windy" शोधा,
आणि अॅप डाउनलोड करा.
वेबसाइट:
Windy च्या अधिकृत वेबसाइटवर (www.windy.com) जा. येथे तुम्हाला सर्व सेवांचा लाभ घेता येतो.
2. स्थान सेट करा:
अॅपमध्ये: अॅप उघडल्यावर, तुमच्या स्थानाची माहिती
प्रविष्ट करा. तुम्ही GPS चा वापर करून तुमचं स्थान
स्वयंचलितपणे शोधू शकता किंवा तुमच्या शहराचं नाव टाकून स्थान सेट करू शकता.
वेबसाइटवर: मुख्य पृष्ठावर, तुमचं स्थान शोधण्यासाठी सर्च
बारमध्ये शहराचं नाव टाका.
3. हवामान नकाशे पहा:
Windy च्या मुख्य पृष्ठावर
तुम्हाला विविध हवामान नकाशे उपलब्ध असतील:
वाऱ्याचा प्रवाह नकाशा: वाऱ्याच्या वेग आणि
दिशेचं दृश्य दर्शवतो.
रडार नकाशा: पर्जन्याची स्थिती आणि तीव्रता
दर्शवतो.
उपग्रह चित्रे: हवामानाची मोठी चित्रे
दर्शवतात.
4. डेटा कस्टमाइज करा:
Windy मध्ये तुम्ही हवामान डेटा
कस्टमाईझ करू शकता. तुम्हाला हवामानाचे विविध घटक जसे की तापमान, आर्द्रता, आणि वाऱ्याचे वेग दर्शवणारे नकाशे निवडता
येतील. मेनूमध्ये जाऊन हवेतील विविध घटक निवडा आणि त्यानुसार नकाशे प्रदर्शित करा.
5. तासानुसार आणि दीर्घकालीन अंदाज पहा:
तुम्ही हवामानाचा तासानुसार अंदाज पाहू शकता, जो तुम्हाला पुढील काही
तासांच्या हवामानाची माहिती देतो. दीर्घकालीन अंदाज साधारणतः 10 दिवसांच्या
कालावधीत दिला जातो.
6. MinuteCast सेवा वापरा:
MinuteCast वापरून तुम्हाला
तुमच्या स्थानासाठी मिनिट दर मिनिटाचा पाऊस किंवा बर्फबारीचा अंदाज मिळतो. हे
बाहेरच्या क्रियाकलापांसाठी उपयोगी आहे.
7. सूचनांचे व्यवस्थापन:
Windy तुम्हाला गंभीर हवामान
सूचनांसाठी सूचना सेट करण्याची परवानगी देते. सेटिंग्जमध्ये जाऊन "Notifications"
किंवा "Alerts" वर क्लिक करा आणि
तुमच्या प्राधान्यानुसार सूचना कशा मिळवायच्या ते निवडा.
8. समुदायाशी संपर्क साधा:
Windy मध्ये तुम्ही इतर
वापरकर्त्यांशी संवाद साधू शकता, जसे की त्यांचे अनुभव
सामायिक करणे किंवा हवामानाच्या स्थितीवर चर्चा करणे.
9. डेटा डाउनलोड करा (आवश्यक असल्यास):
काही विशेष हवामान डेटा वापरकर्त्यांना आवश्यक
असू शकतो. तुम्ही ते डाउनलोड करून आपल्या वापरासाठी साठवू शकता.
10. ट्यूटोरियल्स आणि मदत वापरा:
Windy च्या अॅपमध्ये आणि
वेबसाइटवर ट्यूटोरियल्स आणि मदतीचे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला काही माहिती हवी
असल्यास, ते वापरा.
Windy चा वापर अत्यंत सोपा आहे.
विविध हवामान नकाशे, तासानुसार अंदाज, आणि
रडार व उपग्रह चित्रे यांचा वापर करून तुम्ही अचूक आणि सखोल हवामान माहिती मिळवू
शकता. तुमच्या आवडत्या क्रियाकलापांसाठी उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी Windy
एक उत्कृष्ट साधन आहे.
वातपुष्प
पवनपुष्प / तारासदृश्य आकृती किंवा वातपुष्प (Wind Rose or
Star Diagram ) : वातपुष्प हा स्तंभालेखाचाच एक प्रकार आहे. एखाद्या
ठिकाणी निरनिराळ्या दिशेने वारा पुन्हा पुन्हा किती दिवस वाहतो ते दाखविण्यासाठी
हा आलेख काढतात. या आकृतीला तारासदृश्य आकृती असेही म्हणतात. कारण तिचा आकार
तारकाप्रमाणे असतो. या आकृतीसाठी वाऱ्याची वारंवारिता (frequency) दिली जाते. वारा वर्षभर 365 दिवस वेगवेगळ्या दिशांनी
वाहतो. एखाद्या विशिष्ट स्थानी वर्षातील किती दिवस वारा कोणत्या दिशेने वाहतो यासंबंधीच्या
आकडेवारीस वाऱ्याची वारंवारिता म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, या
तारासदृश आकृत्या आर्थिक व लोकसंख्याविषयक आकडेवारीसाठीही तयार केल्या जातात. या
ठिकाणी मात्र केवळ वाऱ्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या पवनपुष्प किंवा तारासदृश
आकृतीचा विचार केलेला आहे.
वाऱ्याच्या वारंवारितेच्या आकडेवारीमध्ये उत्तर, ईशान्य, पूर्व,
आग्नेय, दक्षिण, नैर्ऋत्य,
पश्चिम व वायव्य या आठ मुख्य व उपदिशांकडून त्या केंद्राकडे वारा
वर्षांतील किती दिवस वाहात होता याची माहिती असते. वारा जेव्हा वाहात नाही.
अशा दिवसांची गणना 'शांत' मध्ये केली जाते.
वैशिष्ट्ये :
१) आलेखावरून वाऱ्याची वारंवारिता स्पष्ट होते.
२) वर्षातील किती दिवस वारा शांत आहे, हे आलेखावरून समजते.
३) यावरून वाऱ्याची दिशा माहीत होते.
४) आलेख फुलाप्रमाणे (वातपुष्प) व ताऱ्याप्रमाणे
दिसतो.
उपयोग (महत्त्व) :
१)
वाऱ्याची वारंवारिता माहीत करून घेण्यास या आलेखाचा उपयोग होतो.
२)
कोणत्या दिशेने वारा किती दिवस वाहतो, यासाठी या आलेखांचा उपयोग होतो.
३)
एखाद्या ठिकाणी विमानतळावर विमानाच्या धावपट्टीची दिशा ठरविण्यास या
आलेखाचा उपयोग होतो.
४)
जलपर्यटन आणि समुद्री जहाज चालक वातपुष्पची माहिती वापरतात जेणेकरून
प्रचलित वाऱ्यांच्या परिस्थितीवर आधारित उत्तम मार्ग ठरवता येतील.
वातपुष (Wind Rose) (तारासदृश्य आकृती - Star
Diagram) काढण्याची पद्धत :
१.
प्रथम कागदाच्या आकारानुसार त्रिज्या घेऊन (उदा. १, १.५, २
सें.मी. या प्रमाणे) वर्तुळ काढावे.
२.
नंतर 90° च्या
अंतराने उत्तर, पूर्व, दक्षिण व पश्चिम
तर त्यांच्या दरम्यान 45° अंतराने ईशान्य, आग्नेय, नैर्ऋत्य व वायव्य या दिशा काढाव्यात. अंतरे
घेताना वर्तुळाच्या परीपापासून घ्यावयाची आहेत.
३.
त्यानंतर आठ दिशादर्शक रेषा काढाव्यात. त्या काढण्यासाठी सुरुवातीस आकडेवारीतील
कमाल व किमान दिवसांची संख्या लक्षात घेऊन एक प्रमाण निवडावे. वारंवारितेच्या
आकडेवारीनुसार प्रमाण निश्वित करून (उदा. १० दिवस = १, किंवा २ सें.मी. या प्रमाणे)
प्रत्येक दिशेने वारा किती दिवस वाहतो, त्यानुसार स्तंभ काढावेत.
४.
शांत दिवसांची संख्या वर्तुळात मध्यभागी लिहितात, या आलेखाला वातपुष्प (Wind rose) म्हणतात.
५.
स्तंभाचे टोक एकमेकास जोडल्यास आलेख ताऱ्याप्रमाणे दिसतो. म्हणून यास तारासदृश्य
आकृती (Star Diagram) म्हणतात.
तापमान आर्द्रता रेषालेख किंवा
क्लायमोग्राफ (Climograph):
या एकमितीय आलेखास हवामान आलेख किंवा तापमान
आर्द्रता रेषालेख किंवा क्लायमोग्राफ असेही म्हणतात.
हवामान आलेखाद्वारे दोन भिन्न प्रकारच्या हवेच्या
अंगांचे गुन्नोत्तर दर्शवतात. ही बारा बाजू असणारी आकृती आहे. फॉस्टर, हंटिष्टन, लेग्ली व रेन या भूगोलशास्त्र तज्ज्ञांच्या मते हवामान आलेखाचा मूलतः
उपयोग तपमान व पर्जन्य दर्शविण्याकरिता करण्यात येतो. परंतु २०व्या शतकाच्या
दुसऱ्या दशकात ग्रिफिथ टेलर यांनी मात्र यांच्या विरुद्ध भूमिका मांडलेली असून
त्याच्या मते हवामान आलेखाचा उपयोग तपमान व सापेक्ष आर्द्रता यांचा सहसंबंध
दर्शविण्याकरिता करण्यात येतो.
तापमान व आर्द्रतेचे संबंध जेव्हा रेषेने
दाखविले जातात, तेव्हा
त्या आलेखास तापमान आर्द्रता आलेख (Climorgraph) म्हणतात.
ग्रिफिथ टेलर यांनी हवामान आलेख तयार
करण्यासाठी तपमान व सापेक्ष आर्द्रता अनुक्रमे 'य' आणि 'क्ष' अक्षावर घेऊन १२ महिन्यांची अद्याक्षरे असणारी
आकृती तयार केली. तसेच आकृतीच्या चार कोपऱ्यास तुलनात्मक हवेची स्थिती दर्शविणारी
नावे दिलेली आहेत. त्याना अनुक्रमे उष्ण व कोरडे (Scorching) उष्ण व दमट (Muggy) थंड व कोरडे (Keen) आणि थंड व आर्द्र (Raw) असे म्हटलेले आहे.
या आलेखात ओल्या फुग्याच्या तापमानाने मोजलेले
मासिक सरासरी तापमान व टक्केवारी दिलेली सरासरी मासिक सापेक्ष आर्द्रता अशी
सांख्यिकी आकडेवारी दाखविली जाते.
आलेख कागदाच्या आडव्या 'क्ष' आसावर
सापेक्ष आर्द्रता दाखवली जाते. उभ्या 'य' आसावर ओल्या फुग्याच्या तापमापकातील मासिक सरासरी तापमान प्रमाण घेऊन
दाखवले. प्रमाण 1 सेंमीला 2° से.
निवडले. प्रत्येक महिन्याचा सापेक्ष आर्द्रता व तापमानाचा बिंदू जेथे येईल त्या
बिंदूच्या ठिकाणी त्या महिन्याचे अक्षर लिहिले. सर्व महिन्यांचे बिंदू सरळ रेषेने
जोडले. डिसेंबरचा बिंदू जानेवारीच्या बिंदूशी जोडला. अशा रीतीने आलेख कागदावर 12 बाजूची आकृती तयार होईल. आकृतीच्या त्या त्या भागातील तापमान व सापेक्ष
आर्द्रता यांच्या प्रमाणानुसार हवेची जी सर्वसामान्य स्थिती असेल तिचा उल्लेख
आकृतीच्या त्या बाजूस केला जातो. उदा. कमी तापमान व जास्त सापेक्ष आर्द्रता हवेची
स्थिती थंड व आर्द्र असते. जास्त तापमान व जास्त सापेक्ष आर्द्रता, हवेची स्थिती दमट, आर्द्र असते. कमी तापमान व कमी
सापेक्ष आर्द्रता असल्याने हवेची स्थिती झोंबणारी असते, तर
कमी तापमान व जास्त सापेक्ष आर्द्रता असताना होरपळणारी (आकृती 9.4) हवेची स्थिती असते.
वैशिष्ट्ये :
१) या आलेखावरून आर्द्रता व तापमानातील संबंध
स्पष्ट होतात.
२) ज्या स्थळासाठी आलेख काढलेला आहे, त्यावरून तेथील हवामान कसे आहे,
हे समजते.
उपयोग (महत्त्व) :
१.
आर्द्रता व तापमानातील संबंध समजून घेण्यासाठी या आलेखाचा उपयोग होतो.
२.
हवामान आलेखाच्या १२ बाजू असलेल्या आकृतीमुळे त्या विशिष्ट ठिकाणच्या हवेची
स्थिती एका दृष्टिक्षेपात लक्षात येते. अशा प्रकारचा क्लायमोग्राफ ग्रिफिथ टेलर
यांच्या मते, मानवी
कार्यक्षमता व आराम यांच्याशी संबंधित असतो.
३.
कृषी अभ्यास: शेतकरी जलवायूग्राफ वापरून आपल्या पिकांसाठी योग्य पर्यावरणीय
परिस्थिती ठरवू शकतात.
४.
पारिस्थितिकी संशोधन: पर्यावरणीय शास्त्रज्ञ जलवायूग्राफचा उपयोग स्थानिक पारिस्थितिकी
व्यवस्था समजून घेण्यासाठी करतात.
५.
शैक्षणिक उद्दिष्ट: शाळांमध्ये जलवायूग्राफ शिकवला जातो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना जलवायूच्या
घटकांचा अभ्यास करणे सोपे जाते.
६.
सामाजिक योजनाबद्धी: सरकार आणि संस्थाएं जलवायूग्राफ वापरून दीर्घकालीन
धोरणे ठरवतात, जसे
की जलसंपत्ती व्यवस्थापन, कृषी धोरणे इत्यादी.
७.
जलवायू परिवर्तन अभ्यास: जलवायूग्राफ वापरून संशोधक जलवायू परिवर्तनाचे
दीर्घकालीन ट्रेंड समजून घेऊ शकतात.
काढण्याची पद्धत :
१.
प्रथम आलेख कागदा वर आडव्या अक्षावर (क्ष) सापेक्ष आर्द्रता (Relative Humility) आणि उभ्या अक्षावर
(य) तापमान (Wet bulb temperature) दाखवावे.
२.
दोन्ही घटकांसाठी (आर्द्रता व तापमान) योग्य प्रमाण निवडून प्लॉटिंग केले
जाते. स्थापन केलेले बिंदू सरळ रेषेने एकमेकास जोडतात.
३.
या आलेखाचे समान ४ भाग करून, वायव्य कोपऱ्यात 'उष्ण कोरडे' (Scorching),
ईशान्य कोपऱ्या 'उष्ण दमट' (Muggy), आग्नेय कोपऱ्यात 'थंड आर्द्र' (Raw) आणि नैऋत्य कोपऱ्यात 'थंड कोरडे' (Keen) ही अक्षरे लिहावीत.