कृषी भूगोल
प्रस्तावना
कृषी हा मानवाचा प्रमुख व प्राथमिक व्यवसाय आहे. मानवाच्या दृष्टीने शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अन्न ही महत्त्वाची गरज कृषी व्यवसायातून परिपूर्ण होते. तसेच कृषी व्यवसायात कृषीप्रधान देशातील 75 % पेक्षा जास्त लोकसंख्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे गुंतलेली आढळते. तसेच शेतीमधून अन्नधान्याशिवाय इतर विविध कच्च्या मालांचे उत्पादनशेतीमधून अन्नधान्याशिवाय इतर विविध कच्च्या मालांचे उत्पादन शेतीमधून अन्नधान्याशिवाय इतर विविध कच्च्या मालांचे उत्पादनही होते. उदा. ऊस, कापूस, तंबाखू, फुले, फळे, इत्यादी. यावर सुमारे 20 ते 30 % उद्योगधंदे अवलंबूनन असतात. कृषी म्हणजे फक्त जमिनीची मशागत नसून त्यामध्ये पशुपालन, रेशीम उद्योग, फलोत्पादन, फुल उत्पादन, मध संकलन, हरितगृह इ. अनेक घटकांचा समावेश होतो. त्याचबरोबर या कृषीच्या उत्पादनावर उद्योगधंदे, बाजारपेठा, व्यापार व पर्यायाने वाहतूक व दळणवळण या गोष्टीही अवलंबून असतात. म्हणून कृषीचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो.
कृषी हा मानवाला स्थायी स्वरूप प्राप्त करून देणारा व्यवसाय आहे. तसेच अनेक देशांची अर्थव्यवस्था ही कृषीवर अवलंबून आहे. अनेक देशातील राष्ट्रीय उत्पादनात कृषी उत्पादनांचा मोठा वाटा आहे. विकसनशील देशाच्या उद्योगधंदे, व्यापार व दळणवळ या घटकांमध्ये कृषीची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे कृषी हा एक विशाल अभ्यासाचा विषय ठरतो.
कृषी या शब्दाला इंग्रजी मध्ये ‘Agriculture’ एग्रीकल्चर असे म्हणतात मुळात ‘Agriculture’ ही संज्ञा लॅटिन शब्द ‘Agricultura’ पासून झालेली आहे म्हणजे ‘Ager a Cultura’ हा शब्द हा मूळचा शब्द आहे यामध्ये ‘Ager’ म्हणजे ‘Field’ आणि ‘Cultura’ म्हणजे ‘Cultivate’ (मशागत) असा अर्थ होतो. एकंदरीत ‘Agricultura’
म्हणजे जमिनीची मशागत करणे असा अर्थ होतो. जमिनीची मशागत करून तिच्यात बी पेरणी आणि पेरलेल्या बियांची व त्यांच्या रोपांची काळजी घेणे व त्यापासून उत्पादन घेणे याला कृषी किंवा शेती असे म्हणतात. कृषी या घटकावर भौगोलिक घटकांचा मोठा प्रभाव पडतो म्हणजेच भूपृष्ठरचना, मृदा, हवामान, पाऊस, जमिनीचे स्थान, मृदेचा पोत, इ. घटक कृषी किंवा शेतीवर परिणाम करतात. म्हणूनच कृषीच्या सर्व क्रिया प्रक्रिया या भौगोलिक घटकांवर अवलंबून असतात. याचा अर्थ असा होतो की कृषी किंवा शेती करताना भौगोलिक ज्ञान असणे आवश्यक असते. त्यामुळेच कृषीचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी ‘कृषी भूगोल’ या शाखेची निर्मिती झालेली दिसून येते.
‘कृषी भूगोल’ म्हणजे ‘Agriculture Geography’ या शब्दाचा उगम ग्रीक व लॅटिन भाषांतून आलेला आहे. त्यामुळे कृषी भूगोलाचा अभ्यास हा प्राचीन काळापासून होत असलेला दिसून येतो. कृषी भूगोल ही कृषीच्या विविध घटकांचा, वैशिष्ट्यांचा, वितरणांचा व उपाय योजनांचा अभ्यास करणारी शाखा आहे.
कृषी भूगोलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी
कृषी भूगोलाची निर्मिती ही प्रामुख्याने मानवाच्या क्रिया व पृथ्वीवरील प्राकृतिक घटक यांच्या सहसंबंधातून झाली आहे. प्रामुख्याने मानवाच्या व्यवसायात कृषी हा प्राथमिक व्यवसाय आहे आणि या व्यवसायाचे आर्थिक घटकांची तसेच प्राकृतिक घटकाशीही संबंध येतात. यामुळे कृषी भूगोलाची निर्मिती ही प्रामुख्याने प्राकृतिक तसेच आर्थिक घटकांची संबंधित असलेली दिसून येते.
कृषी भूगोलाचा अभ्यास प्राचीन काळापासून होत आहे. यामध्ये ग्रीक, रोमन, अरब, भारतीय व चायनीज शास्त्रज्ञांनी आपल्या अभ्यासामध्ये कृषी भूगोलाचा उल्लेख केलेला दिसून येतो. तसेच त्यांनी जगामध्ये सापडणाऱ्या कृषी पद्धती, पिकांचे प्रकार, हवामान, पिकांमधील विविधता यांचा उल्लेख वेगवेगळ्या लिखाणातून केलेला आहे. तसेच अठराव्या शतकामध्ये हम्बोल्ट व कार्ल रिटर्न यांनी जगाच्या वेगवेगळ्या भागातील कृषी पद्धती व नैसर्गिक घटका घटक यांचा सहसंबंध स्पष्ट केला आहे. कृषी भूगोलावर पहिले पुस्तक ‘ऑर्थर यंग’ यांनी लिहिले. या पुस्तकाचे नाव ‘इंग्लंडमधील पर्यावरण व पीक पद्धती’ (Environment and Cropping Pattern
in England)
हे होते. हे पुस्तक १९७० साली इंग्लंड येथे प्रसिद्ध झाले. या पुस्तकात यंग यांनी पर्यावरण व कृषीच्या पद्धती यांच्या सहसंबंधांचे विवेचन केले आहे.
‘व्हॉन थुनेन’ यांनी पहिल्यांदा कृषी भूमी उपयोजनाचा अभ्यास करून त्यावर सिद्धांत मांडला आहे. तसेच जॉन्सन, हिलमन, ऱ्हीड, कॉपक, सायमन, बेकर, व्हीटलसे, डेडले स्टॅम्प, शफी, व्हीवर, टेलर व मॉर्गन या शास्त्रज्ञांनी कृषी भूगोलाचा सखोल अभ्यास केलेला दिसून येतो.
कृषी भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व
(Definition,
Nature, Scope and Significance of Agricultural Geography)
कृषी भूगोलाच्या व्याख्या (Definition
of Agriculture Geography)
"कृषीविषयक क्रियांच्या स्थानिक भिन्नतेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे कृषी भूगोल होय."- जॉन्सन
"Agricultural
Geography has been defined as the study of spatial variations
in agricultural activity is called as agriculture geography."
– Johnson
"कृषी भूगोल म्हणजे विविध देशांतील आणि खंडांतील कृषीचा तुलनात्मक अभ्यास होय." - हिलमन
"Agricultural
Geography deals with a comparative study of agriculture of countries and
continents." - Hillman
"कृषी भूगोल हे शेतीच्या प्रादेशिक विविधतेचा व त्यास कारणीभूत असलेल्या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. बर्नहार्ड
"Agriculture
Geography as the study of regional variations in agriculture and the factors
responsible for them."- Bernhard
"कृषी भूगोल म्हणजे कृषी वैशिष्ट्यांच्या प्रादेशिक विविधतेचे वर्णन व स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. -
ऱ्हीड
"Agriculture
Geography deals with the description and explanation of regional differentiation of
agricultural characteristics." - Rheed
"मानवाच्या जमिनीशी संबंधित शेतीकार्याचा अभ्यास म्हणजे कृषी भूगोल होय." - सायमन
"Agricultural
Geography as man's husbandry of the land.” - Symon
"कृषी भूगोल म्हणजे शेती व शेतीच्या विविध घटकांचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करणारे शास्त्र होय.
"कृषी जमिनीची मशागत, पिकांची लागवड, पिकांचे प्रकार व पद्धती व त्यामधील बदल यांच्यावर होणाऱ्या भौगोलिक परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे कृषी भूगोल होय."
कृषी भूगोलाचे स्वरूप (Nature of Agricultural Geography)
कृषी भूगोल ही मानवी भूगोलाची महत्त्वाची शाखा मानली जाते. कृषी भूगोलात मानवाने कृषीमध्ये केलेल्या सर्व प्रक्रियांचा तसेच कृषीशी संबंधित अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. यामध्ये प्राकृतिक व मानवी क्रिया-प्रक्रियांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होतो. कृषी हा मानवाचा प्रमुख व प्राथमिक व्यवसाय आहे.
सुरुवातीच्या काळापासून ते आजअखेर कृषीमध्ये मोठे बदल झालेले दिसून येतात. त्यामुळे कृषी भूगोलाचे स्वरूपही सातत्याने बदलताना दिसून येते. कृषी भूगोलाचे स्वरूप खालीलप्रमाणे सांगता येईल.
(1) वर्णनात्मक स्वरूप (Descriptive Nature): कृषी भूगोलामध्ये असणाऱ्या विविध विषयांचे अध्ययन वर्णनात्मक पद्धतीने केले जाते. उदा., एखाद्या विशिष्ट पिकाचा अभ्यास हा तालुका, जिल्हा, राज्य, देश व खंड या पातळीवर केला जातो. उदा., गव्हाची किंवा कापसाची शेती, ऊस, फळबागा इ. शेतीचे विवेचन वर्णनात्मक पद्धतीने केले जाते. तसेच या पिकासाठी लागणाऱ्या आवश्यक परिस्थितीचेही वर्णन करून अध्ययन केले जाते. म्हणून कृषी भूगोलाचे स्वरूप हे वर्णनात्मक असलेले दिसून येते.
(2) वितरणात्मक स्वरूप (Distributional Nature): कृषी भूगोलात विविध
पिकांचा व त्याखालील क्षेत्रांचा अभ्यास वितरणात्मक पद्धतीने केला जातो. उदा., जगामध्ये आढळणाऱ्या विविध पिकांचे वितरण (गहू, तांदूळ, ऊस, कापूस, फळबागा इ.) एखाद्या पिकाचा वितरणात्मक अभ्यास करत असताना तालुका, जिल्हा राज्य, देश व जागतिक पातळीवरही केला जातो. यामध्ये भौगोलिक परिस्थितीच्या वितरणाचाही अभ्यास केला जातो. त्यामुळे कृषी भूगोलाचे स्वरूप हे वितरणात्मक आढळते.
(3) प्रादेशिक स्वरूप (Regional Nature): कृषी भूगोलामध्ये येणाऱ्या विषयांची विभागणी प्रादेशिक केल्यास तो अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे होतो. हे विभाग प्रादेशिक घटकांच्या किंवा राजकीय सीमांच्या आधारावर करतात. यामध्ये त्या-त्या प्रदेशातील भूपृष्ठ रचना, मृदा, हवामान या भौगोलिक घटकांचाही विचार केला जातो, कारण प्रत्येक प्रदेशातील भौगोलिक घटकांवर त्या प्रदेशातील शेतीची अवस्था व विकास अवलंबून असतो. अनुकूल परिस्थिती असणाऱ्या प्रदेशात शेतीचा विकास होतो. त्यामुळे अशा भागाचा आर्थिक विकास घडून येतो. तसेच अशा भागात कृषी बाजारपेठांचा व कृषी प्रक्रिया उद्योगांचा विकास होतो. थोडक्यात, कृषी भूगोलाचा अभ्यास करत असताना प्रादेशिक स्वरूप हे महत्त्वाचे ठरते.
(4) तुलनात्मक स्वरूप (Comparative Nature) : कोणत्याही प्रदेशातील शेतीचा विकास हा त्या भागातील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतो. त्यामुळे काहीभागात विकसित तर काही भागात अविकसित शेती आढळते. त्यामुळे शेतीचा व प्रदेशांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो, उवा,, रशियातील गव्हाची शेती व भारतातील गव्हाची शेती, संयुक्त संस्थानातील कृषी प्रदेश व अर्जेटिनातील कृषी प्रदेश इत्यादींचा तुलनात्मक अभ्यास करता येतो.
(5) सांख्यिकीय स्वरूप (Statistical Nature) : अलीकडच्या काळात कृषीचा अभ्यास फक्त वर्णनात्मक व तुलनात्मक राहिलेला नसून त्यामध्ये सांख्यिकीय स्वरूप आलेले दिसून येते. कृषीच्या वेगाने होणाऱ्या संशोधनामुळे व वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या कृषिमालाच्या मागणीमुळे कृषीच्या अभ्यासाचे स्वरूप संख्यात्मक झाले आहे. उदा., एखाद्या शेतीतील पिकाखालील क्षेत्र, पिकांचे हेक्टरी उत्पादन, खतांचे व कीटकनाशकांचे प्रमाण, बी-बियाणांचे प्रमाण, कृषीची उत्पादकता इ. घटकांचा अभ्यास सांख्यिकीय पद्धतीने केला जातो. म्हणून कृषी भूगोलाचे स्वरूप सांख्यिकीय झालेले दिसून येते.
(6) बहुविध स्वरूप (Multidisciplinary Nature) : कृषी भूगोलामध्ये फक्त पिकांचा व कृषिक्षेत्राचा अभ्यास केला जात नसून यामध्ये प्राकृतिक घटक जलसिंचन, पशुपालन, चारा उत्पादन, जमिनीची मशागत व पद्धती, पिकांचे प्रकार व पद्धती, शेतीचे । स्वरूप व समस्या, शेतीच्या समस्यांचे उपाय इ. घटकांचाही अभ्यास केला जातो. त्यामुळे : कृषी भूगोलाचे स्वरूप बहुविध आढळते. तसेच कृषी भूगोलात कृषिक्षेत्र व बाजारपेठा यांचा संबंध, कृषी व प्रक्रिया उद्योग यांचाही अभ्यास केला जातो.
(7) वैज्ञानिक स्वरूप (Scientific Nature): कृषी भूगोल ही मानवी भूगोलाची शाखा असली तरी भूगोल हा विज्ञानाचा विषय आहे. त्यामुळे कृषी भूगोलात होणारा अभ्यास हा वैज्ञानिक स्वरूपाचा आढळतो. कृषी कार्यात समाविष्ट होणाऱ्या घटकांचा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून केला जातो.
शेतीवर परिणाम करणारे घटक, शेतीच्या समस्या व त्या सोडविण्यासाठीचे उपाय यांचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने केला जातो. भूमिउपयोजन, शेतीच्या पद्धती, त्यात घेण्यात येणारी विविध पिके, शेतीची रचना, पीक केंद्रीकरण, पीक संगती व संयोग, शेतीची उत्पादकता, शेती तंत्रज्ञान इ. घटकांचे अध्ययन वैज्ञानिक पद्धतीने केले जाते म्हणून कृषर्षा भूगोलाचे स्वरूप वैज्ञानिक आढळते.
कृषी भूगोलाची व्याप्ती
(Scope of
Agriculture Geography)
कृषी भूगोलामध्ये विविध विषयांचा अभ्यास अंतर्भूत आहे. त्यामुळे या विषयाचे क्षे फार मोठे आहे. खालील मुद्द्यांवरून व्याप्तीची कल्पना येते.
(1) कृषीचा उगम व विकास: कृषी भूगोल ही मानवी भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. तसेच कृषी हा मानवाचा प्राथमिक व प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे या विषयाचे अध्ययन करताना जगात शेतीचा उगम केव्हा व कसा झाला हे समजून घेतले पाहिजे. मानवाच्या सुरुवातीच्या काळात शेतीला प्रारंभ झाला व त्याच्याशी संबंधित इतर गोष्टी सुरू झाल्या. म्हणून कृषी भूगोलाच्या अभ्यासामध्ये प्रथमतः कृषीच्या उगमाचा व विकासाचा अभ्यास केला जातो.
(2) कृषी भूमिउपयोजन: कृषी भूगोलामध्ये कृषी भूमिउपयोजनाचे अध्ययन महत्त्वाचे ठरते. कृषीमध्ये विविध प्रकारची पिके घेतली जातात. यामध्ये अन्नधान्य पिके, बागायती पिके, रोखीची पिके प्रमुख असतात. तसेच कोरडवाहू व बागायती, खरीप व रब्बी असेही पिकांचे दोन विभाग होतात. कधी-कधी एकाच वेळेस दोन किंवा विविध पिकांचे उत्पादन घेतले जाते तर काही ठिकाणी कुरणे व पशुंसाठी पडीक जमीन ठेवली जाते. वरील सर्व पिके व कृषीखालील जमिनीचे क्षेत्र हे कृषी भूमिउपयोजन दर्शविते. त्यामुळे कृषी भूमिउपयोजन हा कृषी भूगोलाच्या अध्ययनाचा महत्त्वाचा भाग आहे.
(3) पिकांचा अभ्यास: शेतीमध्ये घेतली जाणारी विविध पिके हा कृषी भूगोलाचा 1 अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये अन्नधान्य पिके (गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका : इ.), नगदी पिके (कापूस, ऊस, चहा, कॉफी, रबर इ.), फळ पिके (डाळिंब, द्राक्षे, आंबा, , पेरू, संत्री, चिकू इ.) यांचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. या पिकास लागणारी भौगोलिक परिस्थिती तसेच त्यांचे वितरण, उत्पादन व उत्पादकता यांचाही अभ्यास कृषी भूगोलात केला जातो.
(4) कृषी जलसिंचन: ज्या प्रदेशात पर्जन्य कमी व अनिश्चित स्वरूपाचे असते त्या भागात जलसिंचन महत्त्वाचे ठरते. जलसिंचनामुळे पिकांची विविधता निर्माण होते. तसेच उत्पादन व उत्पादकता वाढते. जलसिंचनामुळे एकंदरीत कृषी विकासास मदत होते. त्यामुळे कृषी भूगोलात जलसिंचनाची साधने, प्रकार जलसिंचनाखाली असलेले क्षेत्र, जलसिंचनाच्या अवस्था व समस्या तसेच जलसिंचनाचे स्रोत यांचा सखोल अभ्यास केला जातो.
(5) पिकांसाठी आवश्यक परिस्थिती:
शेती ही भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून आहे. यामध्ये प्राकृतिक घटकांचा समावेश होतो. उदा., शेतीसाठी मैदानी सुपीक प्रदेश, नद्यांची खोरी, अनुकूल तापमान, योग्य हवामान हे घटक अनुकूल असतात. म्हणून अशा भागात शेतीचा विकास होतो. तसेच निरनिराळ्या पिकांसाठी वेगवेगळी परिस्थिती लागते. उदा., चहा, कॉफी व रबर या पिकांसाठी उष्ण कटिबंधीय हवामान, कापसासाठी उष्ण, कोरडे हवामान व काळी जमीन, गव्हासाठी समशीतोष्ण प्रकारचे हवामान लागते. प्राकृतिक घटकाव्यतिरिक्त वाहतूक, भांडवल, बाजारपेठा, सांस्कृतिक घटक इ. मानवी घटकांचाही अभ्यास कृषी भूगोलात होतो.
(6) शेतीच्या पद्धती व प्रकार:
शेतीच्या पद्धती व प्रकार यांचा अभ्यास कृषी भूगोलात महत्त्वाचा ठरतो. जगामध्ये शेतीच्या अनेक पद्धती व प्रकार आढळतात. 'भौगोलिक परिस्थितीवर या पद्धती किंवा प्रकार अवलंबून असतात. उदा., जंगल क्षेत्रात भटकी शेती तर कुरण क्षेत्रात कुरणांचे पशुपालन केले जाते.
तसेच जगाच्या बऱ्याच भागात स्थायी उदरनिर्वाहाची शेती केली जाते. तसेच जमिनीचे क्षेत्र कमी व लोकसंख्या जास्त असलेल्या भागात सखोल शेती तर कमी लोकसंख्या व जमिनीचे क्षेत्र जास्त असलेल्या भागात विस्तृत शेती केली जाते. त्याबरोबरच रोखीची पिके, बागायती पिके, फळबागा, फूलशेती यांचाही अभ्यास कृषी भूगोलात केला जातो.
(7) कृषी व कृषिमालावर आधारित उद्योगधंदे: कृषीसंबंधी उद्योगधंद्यांमध्ये खते व कीटकनाशके, औषध, ज्यूस उद्योग, जिनिंग, प्रेसिंग, कापड उद्योग, ताग कारखाने, साखर उद्योग, तेल गिरण्या, तंबाखू कारखाने, बिडी व सिगारेट उद्योग इत्यादींचा यात समावेश होतो. या सर्व उद्योगांच्या अभ्यासाबरोबरच या उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या परिस्थितीचाही अभ्यास केला जातो.
(8) कृषी बाजारपेठा: शेतीमध्ये उत्पादित होणारा कच्चा माल तसेच कृषि-मालावर आधारित उद्योगधंद्यामधून निर्माण होणारा माल यांच्या विक्रीसाठी कृषी बाजारपेठा महत्त्वाच्या असतात. या बाजारपेठांचा अभ्यास कृषी भूगोलात केला जातो. कृषी बाजारपेठांमध्ये कांदा, हळद, गुळ, भुसार माल, लसूण, भाजीपाला, फळे यांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. याचा अभ्यासही कृषी भूगोलात अंतर्भूत असतो.
(9) कृषी प्रादेशिकरण: अलीकडच्या काळात कृषी भूगोलाच्या अभ्यासात कृषी प्रादेशिकरणाला मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे. यामध्ये संख्यात्मक व गुणात्मक घटकांच्या आधारे कृषीचे विभाग तयार केले जातात. याचा अभ्यास कृषी भूगोलात केला जातो. उदा., पीक केंद्रीकरण, पीक संयोग, पीक उत्पादकता, पीक नमुने, पीक व वैविधीकरण, पीक फेरफार इत्यादी.
(10) कृषी समस्या व उपाय: कृषी भूगोलात कृषीचा अभ्यास करत असताना अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमुळे व मानवी घटकांमुळे निरनिराळ्या समस्या निर्माण होतात. तसेच या समस्या सोडविण्यासाठी त्यावर उपाय सुचविले जातात. या सर्व घटकांचा अभ्यास कृषी भूगोलात केला जातो. कृषीच्या समस्यांमध्ये नैसर्गिक, आर्थिक व सामाजिक या महत्त्वाच्या समस्या येतात.
कृषी भूगोलाचे महत्त्व (Significance of Agriculture Geography)
अलीकडच्या काळात कृषी भूगोलाचे महत्त्व वाढत आहे ते पुढीलप्रमाणे सांगता येईल.
1. कृषिप्रधान देशात कृषीसंबंधी निर्णय घेण्यासाठी कृषी भूगोलाचे अध्ययन महत्त्वाचे ठरते.
2. विविध पिकांचे जागतिक वितरण, उत्पादन व उत्पादकता यांची माहिती मिळते.
3. कृषी भूगोलामुळे जगातील प्रत्येक देशातील कृषीच्या कच्च्या मालाच्या उत्पादनाची माहिती मिळते.
4. कृषी तज्ज्ञांना शेतीच्या विविध अभ्यासासाठी कृषी भूगोलाची मदत होते.
5. खाद्य अन्नाच्या उत्पादनाच्या माहितीसाठी व नियोजनासाठी अर्थतज्ज्ञांना कृषी भूगोलाची मदत होते.
6. जागतिक कृषी प्रदेश किंवा क्षेत्रांचा तुलनात्मक अभ्यास करता येतो.
7. कृषी भूगोलाच्या अभ्यासाने शेतीक्षेत्रातील तंत्रज्ञ व अभ्यासक यांच्या मदतीने शेतीची रचना सुधारण्यास मदत होते.
8. कृषी भूगोलाच्या अभ्यासाने देशातील खाद्यान्न व लोकसंख्या यांच्या सहसंबंधाचा अभ्यास करता येतो.
9. शेतीस कृत्रिम पाणीपुरवठा करण्यासाठी प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून जल अभियंत्यांना जलसिंचनाचे आराखडे तयार करण्यासाठी कृषी भूगोलाची मदत होते.
10. प्रादेशिक नियोजनकर्त्यांना देशातील कृषिक्षेत्राच्या आधारे करमणुकीच्या स्थळांसाठी अनुकूल स्थाने निवडता येतात.
11. कृषी भूगोलाच्या अभ्यासामुळे कृषिमालाच्या वाहतुकीसाठी रस्ते व लोहमार्गाच्या वाहतुकीचे आराखडे तयार करता येतात.
12. कृषिक्षेत्रात शहरामध्ये बाजारपेठांच्या स्थापनेसाठी व विकासासाठी कृषी भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
13. कृषी भूगोलाच्या अभ्यासाने देशातील शेतीचे तेथील परिस्थितीनुसार सार्वजनिक सेवा, सुविधा, उपयोगी गोष्टींचे नियोजन करता येते.
14. शेतकरी, प्रशासक, नियोजनकार, व्यवस्थापक, संशोधक, पर्यावरण तज्ज्ञ या सर्वांना अध्ययनासाठी योग्य माहिती कृषी भूगोलाद्वारे मिळते.
15. कृषिमालावर आधारित उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी कृषी भूगोलाची मदत होते.