५.१ परिचय
अलीकडील
काळात भूगोल विषयाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. भूगोलशास्त्रज्ञांना प्राकृतिक
तसेच मानवी भूगोलातील विविध अंगाची उकल होण्यासाठी नकाशाशास्त्रीय तंत्राचा अभ्यास
महत्त्वपूर्ण आहे. नकाशा हे भूगोलाचे मूलभूत अंग आहे. भूगोल विषयाचे अध्ययन-अध्यापन,
संशोधन, विश्लेषण करताना नकाशे व आकृत्या
महत्त्वाच्या असतात. अलीकडील काळात नकाशा निर्मितीसाठी संगणक, भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) व सुदूर संवेदन (Remote
Sensing) यांचा वापर होत आहे. त्यामुळे नकाशा व आकृत्यांचा अभ्यास
तसेच उपयोगिता अभ्यासणे भूगोलतज्ञांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. या
घटकामध्ये आपण प्रमाणबध्द वर्तुळे, छायापध्दतीचा नकाशा,
टिंब पध्दतीचा नकाशा व सममूल्य रेषा पध्दती नकाशा यांचा अभ्यास
करणार आहोत.
५.२.१
प्रमाणबध्द वर्तुळे (Proportional Circle)
"विविध
भौगोलिक आकडेवारी प्रमाणानुसार वर्तुळाच्या साहाय्याने दाखविले जाते त्या आकृतीला
प्रमाणबध्द वर्तुळे असे म्हणतात.
वापर
:-
एखाद्या
क्षेत्रातील निरनिराळे तालुके, जिल्हे, राज्य, देश येथील विविध घटकांचे वितरण, उत्पादन, लोकसंख्येचे वितरण दर्शविण्यासाठी या
पध्दतींचा वापर केला जातो. कृषी उत्पादन, औद्योगिक उत्पादन
तसेच साधनसंपत्तीचे उत्पादन दाखवण्यासाठी याचा उपयोग होतो.
प्रमाणबध्द
वर्तुळे काढण्याची पध्दत :-
प्रमाणबध्द
वर्तुळे नकाशाच्या साहाय्याने किंवा कोऱ्या कागदावर काढली जातात.
प्रमाणबध्द वर्तुळे काढताना आकडेवारीनुसार प्रथम वर्तुळासाठी त्रिज्या काढावी लागते. वर्तुळाची त्रिज्या काढण्यासाठी पुढील सूत्राचा उपयोग होतो.
या
सूत्राच्या साहाय्याने त्रिज्या काढताना मानलेल्या त्रिजेचे प्रमाण हे महत्त्वाचे
ठरते. मानलेली
त्रिज्या ही ०.५ सें.मी. किंवा १ सें.मी. इतकी घ्यावी. दिलेल्या आकडेवारीचा विचार करून योग्य संख्या निवडून त्या संख्येचे प्रमाण निश्चित करावे. अशा प्रकारे मानलेली त्रिज्या व निवडलेली संख्या दोन्ही प्रमाणे निश्चित झाल्यानंतर सूत्राच्या साहाय्याने त्रिज्या काढावी. त्रिज्येनुसार साध्या कागदावर किंवा नकाशावर वर्तुळे काढावीत.
गुणधर्म
:-
१.
ही पध्दत समजण्यास सोपी आहे.
२.
वर्तुळाची त्रिज्या व त्यावरून काढलेली वर्तुळे ही संख्येशी प्रमाणबध्द असतात.
३.
भौगोलिक घटकाचे वितरण सहज लक्षात येते.
दोष
:-
१.
आकडेमोड करणे किचकट व वेळखाऊ पध्दत आहे.
२.
वर्तुळे जर जास्त असतील ती एकमेकांत मिळसून गुंतागुंत निर्माण होते.
उदा.
१. खालील लोकसंख्येची आकडेवारी प्रमाणबध्द वर्तुळाच्या सहाय्याने नकाशात दर्शवा.
सातारा
जिल्ह्याची लोकसंख्या (२०११)
मानलेली त्रिज्या = १ सें.मी., निवडलेली
संख्या = १,००,०००
टीप: उरलेल्या सर्व तालुकांची आकडेवारी वरील पद्धतीने करावी.
५.२.२
छायापध्दती नकाशा (Choropleth
Map)
"एखाद्या
घटकाचे वितरण किंवा घनता राजकीय विभागाच्या आधारे वेगवेगळ्या छायेने/छटेने दाखविले
जाते,
तेव्हा त्या पध्दतीस छाया पध्दती असे म्हणतात." छाया पध्दतीने
काढलेल्या नकाशांना 'घनतादर्शक नकाशे' असेही
म्हटले जाते.
वापरा:-
या
पध्दतीचा उपयोग मुख्यतः लोकसंख्येची घनता, लोकसंख्येचे
वितरण, जनावरांचे वितरण दर्शविण्यासाठी केला जातो.
छायापध्दती
नकाशा काढण्याची पध्दत :-
राजकीय
नकाशा हा या पध्दतीचा प्रमुख आधार आहे. एखाद्या देशातील लोकसंख्येची घनता दाखवायची
असल्यास राज्याच्या सरहद्दी, राज्यासाठी नकाशा
काढावयाचा असल्यास जिल्ह्यांच्या सरहद्दी आणि जिल्ह्यासाठी नकाशा काढावयाचा
असल्यास तालुक्यांच्या सरहद्दीदर्शक नकाशा आवश्यक असतो.
छाया
पध्दतीचा नकाशा काढण्यापूर्वी दिलेल्या आकडेवारीवरून (लोकसंख्या व क्षेत्र) घनता
काढून घ्यावी लागते, त्यासाठी पुढील सूत्राचा
वापर केला जातो.
याप्रमाणे
लोकसंख्येची घनता काढून तिचे योग्य गट तयार करतात. उदा. लोकसंख्येच्या घनतेनुसार
०-१००,
१००-२००, २००-३००, ३००-४००,
४०० पेक्षा जास्त असे गट तयार करावेत आणि घनतेच्या तीव्रतेनुसार
प्रत्येक विभागास छटा किंवा शेडिंग निवडतात. कमी घनतेकडून जास्त घनतेकडे छटांची
तीव्रता जास्त असावी. घनतेसाठी वापरलेल्या छटांसाठी सूची तयार केली जाते.
गुणधर्म :-
१.
छाया पध्दतीमुळे क्षेत्रीय वितरणाची कल्पना येते.
२.
छाया पध्दतीने घनतेची कल्पना येते.
३.
हे नकाशे आकर्षक, उपयुक्त व परिणामकारक
असतात.
४.
संशोधन व प्रकल्प अभ्यासासाठी या पध्दतीचा सर्वाधिक वापर होतो.
कमतरता :-
१.
स्थानिक भिन्नता योग्य प्रकारे दर्शविली जात नाही.
२.
या पध्दतीत आकडेवारीचे वर्गांतर करावे लागते त्यामुळे ही पध्दत किचकट व वेळखाऊ
आहे.
उदा.
२. सातारा जिल्ह्याची लोकसंख्येची घनता छायापध्दती नकाशाच्या साहाय्याने दर्शवा.
५.२.३
टिंब पध्दती नकाशा (Dot Map)
"एखाद्या भौगोलिक घटकांचे संख्यात्मक वितरण टिंबाच्या साहाय्याने दर्शविले
जाते तेव्हा त्या पध्दतीस टिंब पध्दती म्हणतात. तर टिंब पध्दतीने काढलेल्या नकाशास
टिंब पध्दतीचा नकाशा असे म्हणतात."
वापर
:-
कोणत्याही
भौगोलिक घटकाचे वितरण, उत्पादन, मूल्य दर्शविण्यासाठी टिंब पध्दतीच्या नकाशाचा वापर केला जातो. देश,
राज्य, जिल्हा, तालुका
पातळीवर नकाशे काढता येतात.
टिंब
पध्दती नकाशा काढण्याची पध्दत :-
या
पध्दतीचा नकाशा हा राजकीय विभागाच्या आधारे काढला जातो. त्यामुळे सरहद्दी असलेला
राजकीय विभागाचा नकाशा आवश्यक आहे.
प्रथम प्रमाण निवडून टिंबांची संख्या निश्चित करावी. आकडेवारीनुसार १०,०००, ५०,००० किंवा १,००,००० लोकसंख्येस १ टिंब याप्रमाणे प्रमाण घेऊन टिंबाची संख्या काढून घ्यावी. त्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो.
नकाशाचा
आकार व प्रत्येक विभागातील टिंबाची संख्या यानुसार टिंबांचा आकार ठरवावा लागतो.
मालमत्ता
:-
१.
या पध्दतीमुळे भौगोलिक घटकांच्या वितरणाची निश्चित माहिती मिळते.
२.
हे नकाशे स्पष्टीकरण दर्शक असल्याने समजण्यास सोपे असते.
३.
या पध्दतीमुळे वितरणाच्या स्वरूपाची स्पष्ट कल्पना येते.
४.
परस्पर संबंधांचा अभ्यास करण्यासाठी हे नकाशे उपयुक्त असतात.
कमतरता
:-
१.
नकाशामध्ये योग्य ठिकाणी सारख्या आकाराची टिंब देणे अत्यंत अवघड असते.
२.
काही वेळा टिंब जवळ-जवळ असल्यास वितरणाची कल्पना येत नाही.
३.
लहान प्रमाणाच्या नकाशासाठी टिंब पध्दतीचा वापर करणे कठीण जाते.
४.
ही पध्दत वेळखाऊ आहे.
उदाहरण:-
(पुढील
आकडेवारीवरून सांगली जिल्ह्याकरिता टिंब पध्दतीचा नकाशा तयार करा.)
सांगली जिल्हा लोकसंख्या (२०११)
५.२.४
सममूल्यरेषा पध्दती नकाशा (Isopleth Map)
"नकाशावर
समान मूल्यांची ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना 'सममूल्य
रेषा' असे म्हणतात. तर या रेषेच्या सहाय्याने काढलेल्या
नकाशास 'सममूल्य रेषादर्शक नकाशा' असे
म्हणतात."
सममूल्य
रेषांचे अनेक प्रकार पडतात, ते
पुढीलप्रमाणे.
अ)
समोच्चता रेषा समान उंचीची ठिकाणे जोडणाऱ्या रेषा होय.
ब)
समताप रेषा : समान तापमानाची ठिकाणे जोडणाऱ्या रेषा होय.
क)
समभार रेषा : समान, हवेचा भार असणारी
ठिकाणांना जोडणारी रेषा होय.
ड)
समपर्जन्य रेषा समान पर्जन्य असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषा होय.
इ)
समक्षार रेषा : समान क्षारता असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषा होय.
वापर:-
सममूल्य
रेषा पध्दतीचा उपयोग, हवेचे तापमान, हवेचा भार, पर्जन्य, उंची,
क्षारता इ. गोष्टी दर्शविण्यासाठी होतो. या गोष्टी प्रत्यक्ष
आकडेवारी किंवा टक्केवारीच्या सहाय्याने दाखविले जाते. अखंड वितरण दर्शविण्यासाठी
या पध्दतीचा वापर केला जातो.
सममूल्यरेषा
पध्दती नकाशा काढण्याची पध्दत :-
सममूल्य
रेषा नकाशा काढताना राजकीय नकाशा व संबंधित आकडेवारी या दोन गोष्टी महत्त्वाच्या
असतात. दिलेल्या आकडेवारीवरून योग्य अंतर (Interval) निवडावे लागते. उदा. उंचीसाठी ५,१०,२०,५०,१०० मीटर, तापमानासाठी १, २, ५ अंश
सेल्सिअस (°C), हवेच्या भारासाठी- १, २,
५ मिलीबार, पर्जन्यासाठी २, ५, १०, २० सेंमी किंवा मिमी
इत्यादी.
प्रथम
प्रमाण निवडून टिंबांची संख्या निश्चित करावी. आकडेवारीनुसार १०,०००, ५०,००० किंवा १,००,००० लोकसंख्येस १ टिंब याप्रमाणे प्रमाण घेऊन
टिंबाची संख्या काढून घ्यावी. त्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो.
सममूल्य
रेषा पध्दती नकाशा काढताना त्यातील अंतर इतके असावे की,
त्यामुळे घटकाचे स्वरूप
स्पष्ट
होईल. यासाठी नकाशाचे प्रमाण, आकडेवारीचे स्वरूप
इ. बाबी विचारात घ्याव्या लागतात.
गुणधर्म :-
१.
सममूल्य रेषा पध्दती नकाशामधून परिणामांची तंतोतंत माहिती मिळते.
२.
हे नकाशा तीव्र व मंद परिमाणाची कल्पना लगेच देतात.
दोष :-
१.
दिलेल्या आकडेवारीत कमाल व किमान किंमतीत जास्त फरक असेल तर नकाशे तयार करता येत
नाहीत.
२.
अपुरी आकडेवारी असेल तर हे नकाशे काढता येत नाही.
३.
दोन रेषांदरम्यान किती परिमाण आहे याची माहिती मिळत नाही.
४.
ही पध्दत किचकट व वेळखाऊ आहे.
उदा.: खालील आकडेवारी सममूल्य
रेषा पध्दती नकाशाने दाखवा.
सारांश
भूगोलाच्या
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत आलेख, आकृती व नकाशा यांना
अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध भौगोलिक घटकांचे वितरण दर्शविण्यासाठी वेगवेगळ्या
नकाशातंत्राचा वापर केला जातो.
भौगोलिक
आकडेवारीचे वितरण जेव्हा प्रमाणानुसार वर्तुळाच्या सहाय्याने दाखविले जाते,
त्यास प्रमाणबध्द वर्तुळे असे म्हणतात. लोकसंख्येची घनता
दाखविण्यासाठी छाया पध्दतीचा वापर केला जातो. घनतेच्या तीव्रतेनुसार नकाशातील छटा
बदलत जातात. लोकसंख्येचे वितरण, जनावरांची संख्या, कामगारांची संख्या इ. घटक नकाशावर दर्शविण्यासाठी टिंब पध्दतीचा वापर केला
जातो. नकाशावर हवेचे तापमान, पर्जन्य, हवेचा
भार इ. घटक दर्शविण्यासाठी सममूल्य रेषा पध्दतीचा वापर केला जातो.