प्रकरण ३. मृदा : वर्गीकरण आणि वितरण

 ३.१ प्रस्तावना:

मृदा निर्मिती ही प्राकृतिक आणि जैविक घटकांचा परिपाक असते. मृदा वनस्पतींना आधार देण्याचे काम करते. मृदा ही जनक खडक, सेंद्रीय पदार्थ, हवा, पाणी आणि सूक्ष्म जीवजंतूनी बनलेली असते. मृदा निर्मिती ही अनेक प्रक्रियांचा परिपाक असते. पृथ्वीवरील भिन्न भौगोलिक परिस्थिती मृदा प्रकारातील भिन्नतेसाठी कारणीभूत असते. एखाद्या प्रदेशातील हवामान, भूपृष्ठरचना, वनस्पती यांचा त्याठिकाणच्या मृदेच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मावर परिणाम होतो. या घटकांचा आधार घेऊनच मृदेची विविध गटात वर्गवारी केली जाते.

जगात मृदेचे वर्गीकरण सर्वप्रथम रशियन भूवैज्ञानिक व्ही. व्ही. डोकूचॉव्ह यांनी केले. अमेरिकन तज्ञ सी.एफ. मारबुत यांनी १९३८ मध्ये अमेरिकेतील शेती विभागाच्या वतीने मृदा वर्गीकरणाची व्यापक योजना तयार केली. यानंतर १९६० मध्ये अमेरिकन मृदा शास्त्रज्ञांनी 'Comprehensive Soil Classification System' नावाने मृदेचे वर्गीकरण केले. मृदाशास्त्रज्ञ सी.डब्ल्यू. रॉबिन्सन यांनी मृदा अभ्यास हा आंतरविद्याशाखीय असल्याचे सांगितले आहे.

मृदेचे जनुकिय वर्गीकरण (Genetic Classification of Soil)

मृदाशास्त्राचे जनक व्ही. व्ही. डोकूचॉव्ह यांनी मृदेचे जैविक वर्गीकरण इ.स. १९०० मध्ये केले. भूप्रदेश, हवामान व वनस्पती यांचा मृदानिर्मितीवर परिणाम होतो यावर आधारित हे मृदा वर्गीकरण आहे. त्यांनी सर्वसामान्य मृदा, सक्रमणित मृदा व अनियमित मृदा असे प्रकार केले. १९३८ मध्ये अमेरिकन मृदा शास्त्रज्ञ सी.एफ.मारबुत यांनी अमेरिकन कृषि विभागाच्या वतीने मृदेचे पेडॉल्फर मृदा व पेडॉकल मृदा असे दोन प्रकार पाडले व त्या आधारे विभागीय मृदा, आंतरविभागीय मृदा व अविभागीय मृदा असे प्रकार पाडले.

मृदेचे जनुकिय वर्गीकरण:

मृदेचे जनुकिय वर्गीकरण पुढीलप्रमाणे, अ) विभागीय मृदा (Zonal Soil) व) आंतरविभागीय मृदा (Intrazonal Soil) क) अविभागीय मृदा (Azonal Soil) केले आहे.

 अ) विभागीय मृदा (Zonal Soil) :-

विभागीय मृदा प्रकारात मृदा गुणधर्मानुसार मृदेचे प्रमुख ११ प्रकार पडतात.

१. जांभी मृदा (Laterite Soil or Latosols) :-

'लॅटेराईट' हा शब्द लॅटिन भाषेतील 'लॅटर' म्हणजे 'बीट' (Brick) असा होतो. उष्णकटिबंधीय / प्रदेशात आर्द्र हवामानात जांभा खडक तयार होतो. पावसाचे प्रमाण २०० सें.मी. पेक्षा जास्त असणाऱ्या या प्रदेशात खडकाचे विदारण व झीज प्रक्रिया होते. खडकातील सिलीकावर विदारणाची क्रिया होऊन लिचींग प्रक्रियेतून आयर्न ऑक्साईड तयार होते व अॅल्युमिनियम व लोह यांचे केंद्रीकरण घडून येते. अशा तांबुस पिवळसर जमिनीस जांभी जमीन म्हणतात.

जांभी मृदा दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन नदी खोरे, मध्य अमेरिका, ब्राझीलचा पूर्व किनारा, आफ्रिकेतील झायरे खोरे, पूर्व मादागास्कर, इंडोनेशिया याशिवाय भारत, म्यानमार, व्हिएतनाम व वेस्ट इंडिज बेटावरही आढळते.

जांभ्या मृदेत लोह, अॅल्युमिनियम व मॅगनिजचे प्रमाण जास्त असते. लोह अंश गंजल्यामुळे या/ मृदेस तांबडा रंग प्राप्त होतो, नैसर्गिक वनस्पतींनी समृध्द पण शेतीच्या दृष्टीने ही मृदा योग्य नसते, कारण या मृदेतून बरीचशी मूलद्रव्ये निघून गेलेली असतात. परंतु काही ठिकाणी सखल भागात नद्यांच्या खोऱ्यात या जमिनीतून आंबा, काजू, फणस, नारळ, सुपारी या फळपिकांचे उत्पादन होते तर नाचणी, तांदूळ व चहाचे उत्पादनही घेतले जाते.

२. उष्ण कटिबंधीय तांबडी मृदा (Red Soil) :-

ही मृदा उष्ण, दमट हवामानाच्या प्रदेशात डोंगराळ भागात आढळते. या मृदेत लोह अंशाचे प्रमाण जास्त असते, तो गंजल्यामुळे या मृदेस तांबडा रंग प्राप्त होतो. तांबडी मृदा विषुववृत्तीय आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि मद्य व दक्षिण अमेरिकेमध्ये आढळते.

या मृदेत लोह, अॅल्युमनियम व मॅगेनिजचे प्रमाण जास्त तर आम्ल व चुनखडीचे प्रमाण कमी असते. ही मृदा भरड स्वरूपाची असते. ह्युमसची कमतरता असल्याने या मृदेची उत्पादन क्षमता कमी असते. पाणीपुरवठा व योग्य प्रमाणात खते पुरवल्यास चहा, कॉफी, फळे, बाजरी ही पीके घेता येतात. या मृदेवर आदिवासी लोक भटकी/स्थलांतरित शेती करतात.

३. तांबडी वाळवंटी मृदा (Red Desert Soil):-

कमी पर्जन्य व जास्त बाष्पीभवन असणाऱ्या प्रदेशात या मृदेची निर्मिती होते. आफ्रिका आणिऑस्ट्रेलियाच्या विस्तीर्ण वाळवंटी प्रदेशात ही मृदा आढळते. याशिवाय प. आशिया, भारत, पाकिस्तानच्या वाळवंटी भागात ही मृदा आढळते.

या मृदेत क्षितीज समांतर थरांचा विकास कमी आढळतो. वनस्पतींचे प्रमाण कमी असलेने ह्युमसचे प्रमाण कमी असते. या मृदेत क्षारांचे प्रमाण जास्त आढळते, ही मृदा वालुकामय व दाणेदार असते. या मृदेत अॅल्युमिनियमचे अविद्राव्य ऑक्साईडस् असलेने या मृदेला तांबडा रंग प्राप्त होतो. जलसिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी सेंद्रीय व रासायनिक खतांचा वापर करून वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेतले जाते.

४. पिंगट रंगाची मृदा (Grey Bwown Soil) :-

या प्रकारची मृदा ही दमट हवामानाच्या पानझडी अरण्याच्या प्रदेशात याबरोबरच तीव्र उन्हाळा व वृक्षांची पानगळ होणाऱ्या प्रदेशात आढळते. ही मृदा आशिया खंडाच्या उत्तर भागात, जपान, युरोपचा पश्चिम भाग, रशिया व संयुक्त संस्थानाच्या ईशान्य भागात आढळते.

यामुळे या मृदेत ह्युमस, चुना व पोटॅश यांचे प्रमाण जास्त आढळते. या मृदेत कापूस, ऊस, भात, गहू, ज्वारी ही पिके घेतली जातात.

५. प्रेअरी मृदा (Prairie Soils) :-

समशितोष्ण गवताळ प्रदेशात या मृदेचा विकास झाला आहे, यास 'पार्कलॅन्ड' म्हणतात. पूर्व युरोप, द. अमेरिका व संयुक्त संस्थानाच्या दक्षिण भागात ही मृदा आढळते.

पेडाकल्स व पेडाल्फर मृदा यांच्या दरम्यानच्या संक्रमणयुक्त भागात ही मृदा आढळते. खनिजद्रव्यांनी युक्त व उच्च उतपादकता असणारी ही मृदा आहे. या मृदेत ह्युमसचे प्रमाण जास्त असलेने '' थर गडद असतो. कॅल्शियमचे प्रमाण कमी असते. जगात या मृदेतून अन्नधान्याचे उत्पादन घेतले जाते. या मृदेतून गहू, मका या पिकांचे उत्पादन होते. 'जगाचे गव्हाचे कोठार' म्हणून या प्रदेशास ओळखले जाते.

६. पॉडझॉल मृदा (Podzol Soil) :-

पॉडझॉल शब्द रशियन भाषेत राखी मृदा (Ash Soil) असा होतो. आर्द्र व मध्य कटिबंधिय वने व सुचिपर्णी वनांच्या प्रदेशात ही मृदा आढळते. मध्यम ते कमी पर्जन्याच्या प्रदेशात शीत हवामानाच्या प्रदेशात मर्यादित बाष्पीभवनाच्या क्षेत्रामध्ये या मृदेचा विकास होतो. ही मृदा टुंड्रा प्रदेशाच्या दक्षिणेकडे, उ. अमेरिका, उ. युरोप, सैबेरिया येथे आढळते.

या मृदा क्षेत्रामध्ये कमी तापमान असलेने जैविक क्रिया मंदावतात, त्यामुळे विघटन कमी प्रमाणात होते. ही मृदा उच्च आम्लयुक्त असते. या मृदेचे '' '' क्षितिज थर उत्तम विकसित झालेले असतात. या मृदेमध्ये '' घरामध्ये पीटची निर्मिती होते. या मृदेची सुपीकता कमी असते ती वाढवण्यासाठी चुना व खतांचा वापर करतात. कमी तापमान व मृदा नापीक असल्याने या मृदेमध्ये शेतीचा विकास होत नाही. काही ठिकाणी जंगलतोड करून गवताळ प्रदेशात पशुपालन व्यवसायाचा विकास झालेला आढळतो.

७. चेस्टनट तपकिरी मृदा (Chestnut Brown Soil) :-

निम आणि मध्य कटिबंधाच्या स्टेपी भूमीवर ही मृदा आढळते. चर्नेझम मृदेचाच हा एक प्रकार आहे. ही मृदा वाळवंटी ओसाड प्रदेशात आढळते. वाळवंटाला लागून २०० ते २५० मि.मी. वार्षिक पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात ही गडद तपकिरी रंगाची मृदा आढळते. ही मृदा रशिया, रुमानिया, हंगेरीच्या शुष्क भागात आढळते. याबरोबरच सं. संस्थानाच्या उंच मैदानी प्रदेशात व अर्जेटिनाच्या पंपास व द. आफ्रिकेच्या व्हेल्डच्या शुष्क भागात ही मृदा आढळते.

'' धर गडद तपकिरी रंगाचा असतो. या मृदेत सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी असते. या जमिनीची सुपीकता कमी असते. ही मृदा तयार होणाऱ्या प्रदेशात वारंवार अवर्षण असते. ज्या ठिकाणी जलसिंचनाची सुविधा उपलब्ध असते तेथे अन्नधान्य पिकांचा विकास आढळतो, खनिज द्रव्यांनी ही मृदा संपन्न असते.

८. चनॉझम किंवा काळी मृदा (Chernozem or Black Soil) :-

रशियन भाषेत चननॅझम याचा अर्थ 'काळी पृथ्वी' असा आहे. निमशुष्क हवामानाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. यामध्ये रशिया, युक्रेन, कझाकिस्तान, हंगेरी, रूमानिया या प्रदेशांचा समावेश होतो. ही मृदा खूपच सुपीक असून खतांच्या पुरवठ्याशिवाय अन्नधान्य पिकांचे उत्पादन घेतले जाते. याशिवाय कॅनडा, संयुक्त संस्थाने, द. अमेरिकेतील पंपास प्रदेश व ऑस्ट्रेलियामध्ये मरे डार्लिंग खोरे प्रदेशात चननॅझम मृदा आढळते.

या मृदेचा '' थर जाड व काळ्या रंगाचा आढळतो. या मृदेमध्ये एकजिनशीपणा जास्त आढळतो. अगदी बारीक मातीचे कण असतात. या मृदेत चुन्याचे प्रमाण जास्त असते, तसेच नायट्रोजन व सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त आढळते. ही मृदा सुपीक असते. या मृदेवर तांदूळ, गहू, मका ही पीके घेतली जातात. चर्नेझम मृदेवर बहुतेक ठिकाणी नैसर्गिक गवत आढळून येते.

९. टुंड्रा मृदा (Tundra Soil) :-

उच्च अक्षवृत्तीय ध्रुवीय प्रदेशात ही मृदा आढळते. हा प्रदेश बर्फाच्छादित असल्याने ही मृदा । वर्षभर गोठलेल्या अवस्थेत असते. बाष्पीभवनाचा वेग या प्रदेशात कमी असतो, उत्तर अमेरिकेचा उत्तर। भाग, ग्रीनलँडची दक्षिण बाजू, उत्तर सुरेशियामध्ये ही मृदा आढळते.

या प्रदेशात कायिक विदारण घडून येते. बनांचे प्रमाण जास्त असणाऱ्या प्रदेशात तपकिरी यन मृदा तयार होते. या मृदेत वनस्पतींचे प्रमाण कमी असल्याने सेंद्रिय घटकांचे प्रमाणही कमी आढळते। कमी उताराच्या प्रदेशात पौट मृदा तयार होते. जैविक किंवा अतिशय मर्यादित असतात त्यामुळे अपरिपक्व मृदो तयार होते. पाणी झिरपणाऱ्या प्रदेशात परिपक्व मृदा तयार होते. टुंड्रा मृदा ही आम्लयुक्त असते. या मृदेची सुपीकता कमी आहे.

१०. राखाडी मृदा (Grey Soil) :-

या गटाच्या मृदांना 'सिएरोड्रेम' असेही म्हणतात. उष्ण व समशितोष्ण कटिबंधातील ओसाड प्रदेशात या प्रकारची मृदा आढळते. कैस्पियन समुद्राच्या पूर्वेस, तुर्कमेनिस्थान व सं. संस्थानाच्या पश्चिम

भागात तसेच युरेशियाच्या पूर्व भागात ही मृदा आढळते.

वनांचे अच्छादन कमी ३ वाऱ्याचे कार्य प्रभावी असणाऱ्या प्रदेशात ही मृदा आढळते. या मृदेत सेंद्रिय घटकांचे व नायट्रोजनचे प्रमाण कमी असते. या मृदेचा रंग राखाडी असतो. या मृदा पातळ थरांच्या व पिकांसाठी अनुकूल नसतात, जलसिंचन व सेंद्रिय खतांच्या वापरातून विविध पिकांचे उत्पादन घेता येते.

११. पर्यंत भागातील मृदा (Mountain Soil):-

जास्त उतार व पाऊस यामुळे पर्वतीय प्रदेशात जास्त पावसामुळे जमिनीची धूप जास्त झाल्याने पर्वतांच्या उतारावरील मातीचे वरचे घर निघून जाऊन खडक उघडे पडतात. पायथ्याशी भरड पदार्थ, खडकांचे तुकडे यापासून ही मृदा तयार होते. जगातील हिमालय, विध्य, सातपुडा, सह्याद्री, आल्प्स, रॉकी, अँडीज या/पर्वतीय प्रदेशात पायथ्याच्या भागात ही मृदा आढळते. ही मृदा जंगलव्याप्त असते व नापीक असते.

ब) आंतरविभागीय मृदा (Intrazonal Soil) :-

मृदेच्या विभागीय गटाच्या अंतर्गत आढळणाऱ्या मृदांना आंतरविभागीय मृदा म्हणतात.

१. दलदलयुक्त मृदा (Hydromorphic Soil) :-

पाण्याचा कमी झिरपा होणाऱ्या दलदलयुक्त व पाणभळ प्रदेशात ही मृदा आढळते. या मृदेत सेंद्रिय पदााँचे विघटन कमी प्रमाणात होते. या मृदेचे पुढील प्रकार पडतात.

२. कुरण मृदा (Medow Soils) :-

नद्यांच्या खोन्यात चांगल्या प्रकारे जलनिस्सारण होणाऱ्या प्रदेशात बारीक मातीचे कण असणारी ही मृदा आढळते. गवताळ भाग असल्याने ह्युमसचे प्रमाण जास्त असते?

३. दलदलयुक्त/बॉग मृदा (Bog Soils) :-

शीत हवामानाच्या खंडांतर्गत भागात ही मृदा आढळते. गोड्या पाण्याच्या दलदल्युक्त, कमी पाणी, झिरपणाऱ्या प्रदेशात ही मृदा तयार होते. या मृदेत सेंद्रिय घटकांचे विघटन कमी प्रमाणात होते. या मृदेचा घरचा घर अतिशय बारीक विकण मातीचा असतो.

४. पीट मृदा (Peat Soils) :-

दलदल्युक्त या मृदेत वनस्पतींचे कुजण्याचे प्रमाण कमी असते. या मृदेत ऑक्सीजनचे प्रमाण कमी/ असते. नांगरणी करण्याजोगी परिस्थिती असल्याच या जमिनी सुपीक असतात.

५. क्षारयुक्त मृदा (Halomorphic Soils) :-

स्टेपी आणि वाळवंटी हवामानाच्या प्रदेशात जेथे पर्जन्यापेक्षा बाष्पीभवन क्षमता जास्त असणाऱ्या प्रदेशात ही मृदा आढळते. यामुळे या मृदेतील क्षारांचे प्रमाण जास्त असते. केशाकर्षण क्रियेने खालच्या घरातील क्षार वरच्या धरात येतात. सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम, कॅल्शियम कार्बनिट पोटॅशियम हे विद्राव्य घटक मातीच्या वरच्या घरात जमा होतात. मातीचे कण दाट असल्याने पाणी झिरपण्याची क्रिया होत नाही. या मृदेत अॅल्युमिनियम व लोहाचे प्रमाण जास्त असते तरीही ही मृदा नापीक असते.

६. कॅलकॅरस/चुनाळ मृदा (Calcimorphic Soils) :-

कॅल्शियम कार्बोनेट मोठ्या प्रमाणात असणाऱ्या प्रदेशात ही मृदा आढळते. ही मृदा ओलसर असते. या मृदेचा वरचा थर काळा करडा अंसतो. सेंद्रीय घटकांचे प्रमाण कमी असते. ही मृदा द. पोलंड व संयुक्त संस्थानामध्ये अलवामा राज्यात आढळते. या मृदेचे रेंडझिना मृदा व टेरारोसा मृदा से प्रकार पडतात.

क) अविभागीय मृदा (Azonal Soil) :-

अविभागीय मृदेमध्ये नवीन मृदांचा समावेश होतो. या अपरिपक्व व विकासाच्या टप्प्यामध्ये असणाऱ्या या मृदा आहेत. या मृदेचे क्षितिज समांतर धर विकसीत झालेले नसतात तसेच या मृदा पातळ थराच्या असतात.

१. पातळ/पर्वतीय मृदा :-

पर्वताच्या उतारावर अगदी पातळ मृदेचा थर असतो, यास पर्वतीय मृदा म्हणतात. मृदेचा पोत भरड असून सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी असते. तीव्र उतार असल्यास ह्युमसची निर्मिती होत नाही. कृषिसाठी या मृदा योग्य नसतात.

२. भरड मृदा :-

या प्रकारच्या मृदा हिमनदीमुळे वाहत येणाऱ्या गाळामुळे, वाऱ्याच्या निक्षेपण कार्यातून, नदीपात्रात वाहत्या पाण्यात, सागरी भागात लाटांमुळे व ज्वालामुखीय राख यामुळे निर्माण होतात. या मृदेत खडकांचे तुकडे, लहान-मोठी वाळू ३. भरड पदार्थ असतात. यामुळे ही मृदा अविकसित असते.


३.२ महाराष्ट्रातील मृदेची वैशिष्ट्ये आणि वितरण:

(Soil Characteristics and Major Soil Distribution in Maharashtra)

मृदा एक महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. मृदा सुपीकतेवर तेथील शेती विकास अवलंबून असतो. जनक खडक, हवामान, भूउतार, सेंद्रिय घटक, वनस्पती, हवा, पाणी, सुक्ष्मजीव यांचा मृदा निर्मिती व विकासावर प्रभाव पडतो. महाराष्ट्रात लाव्हारसाच्या थरापासून खूप मोठ्या भागावर तयार झालेलया बेसॉल्ट या मूळ जनक खडकापासून काळी मृदा तयार झाली. जेथे हा लाव्हारस पोहोचला नाही तेथे वेगळ्या मृदा आढळतात. हवामान व वनस्पतींचा परिणाम मृदा वैशिष्ट्यांवर झालेला आढळतो.

महाराष्ट्रातील मृदेचे वितरण :-

१. काळी रेगूर मृदा (Black Cotton Soil) :-

महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाची व खूप मोठ्या क्षेत्रावर आढळणारी काळी मृदा आहे. महाराष्ट्राचा ३/४ भाग या मृदेने व्यापला आहे. रेगूर मृदेच्या थरांची जाडी सर्वत्र सारखी नाही ती कमी जास्त आढळते. वार्षिक पर्जन्य ५० ते ७५ सें.मी. असणाऱ्या मध्यम पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागात तापी, गोदावरी, कृष्णा, भीमा, कोयना, प्रवरा, नीरा या नद्यांच्या खोन्यात गडद काळी तर उंच भागात फिक्कट काळी मृदा आढळते. यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील कांही जिल्ह्यांचा समावेश होतो.

या मृदेत ह्युमस, लोह, अॅल्युमिनियम, मॅगेनिज यांचे प्रमाण जास्त असते. या मृदेची ओलावा टिकवून ठेवणयाची क्षमता जास्त आहे. उन्हाळ्यात या जमिनीला भेगा भडतात. या जमिनीत कापसाचे पीक चांगले येते, त्यामुळे या जमिनीस काळी कापसाची मृदा असे म्हणतात. या मृदेत ज्यारी, तूर, बाजरी, गहू, ऊस इ. पिके चांगली येतात. या मृदेस काळा रंग ह्युमस व फेरस मॅग्नेटाईटमुळे आला आहे. काळ्या जमिनीत फळबागायती शेतीमध्ये द्राक्ष, केळी, संत्री, डाळींब शेतीचा विकास झालेला आढळतो. उंचीनुसार या मृदेची सुपीकता कमी होत जाते. अतिरिक्त पाणीपुरवठ्यामुळे या जमिनीतील खालच्या भरातील क्षार वरच्या घरात येऊन जमीन कडक, क्षारपड, नापीक होण्याची शक्यता जास्त आढळते.

२. जांभी मृदा (Laterite Soil) :-

ही मृदा उष्ण कटिबंधीय आर्द्र हवामानाच्या प्रदेशात तयार होते. २००० मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्याच्या प्रदेशातील लोह, अॅल्युमिनियम व सिलिकाचे प्रमाण जास्त असणाऱ्या जमिनीतील लोह अंश गंजून या मृदेस लाल/जांभा रंग प्राप्त होतो. सिलिकाचे विदारण व लिचिंग होऊन त्यापासून आयर्न ऑक्साईड निर्माण होते, यातूनच जांभ्या मृदेची निर्मिती होते. या मृदेत चुनखडी, पोटॅश व नायट्रोजनचे प्रमाण कमी असते. सेंद्रिय घटकांचे प्रमाण जास्त असते, पण ते खालच्या थरात निघून जाते. ही मृदा सह्याद्रीच्या घाटमाध्यावर व डोंगराळ भागात विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागात मृदा आढळते.

या जमिनीची सुपीकता व उत्पादनक्षमता कमी असते. ओलावा धरून ठेवण्याची क्षमता या मृदेत जास्त असते. या जमिनीवर वनक्षेत्र जास्त आहे. या मृदेतून भुईमूग, फळबागायती पिकांचे उत्पादन घेतले जाते. रत्नागिरीमध्ये हापूस आंबा या जमिनीतून घेतला जातो. याशिवाय काजू, चिक्कू, नारळ या पिकांचे उत्पादनही या जमिनीतून होते. जांभ्या खडकामध्ये बॉक्साईडचे साठे विपुल प्रमाणात आढळतात.

३. कोकण किनारपट्टीवरील गाळाची जमीन (Alluvial Soil) :-

या मृदेस 'भाबर मृदा' म्हणतात. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून ही रेतीमिश्रीत मृदा तयार झाली आहे. या मृदेत चिकण मातीचे प्रमाण जास्त आढळते. नदीमुखालगत, खाजण व खाड्यांमध्ये चिखल व मळीयुक्त गाळाची मृदा आढळते. वाळूमिश्रीत लोम प्रकारची मृदा तांदूळ, नारळी, पोफळीच्या बागांसाठी उपयुक्त आहे. ही मृदा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी भागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यात आढळते.

या मृदेत सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी असते तर खनिज द्रव्यांचे प्रमाण मध्यम असते. या मृदेत सखल भागात सागराचे पाणी मिसळते, त्यामुळे खारपट मृदा तयार होते. कोकणात समुद्राकडील भागात खार मृदा तर पूर्व भागात गाळाची मृदा आढळते.

४. लाल/तांबडी मृदा (Red Soil) :-

सह्याद्री घाटमाथ्यावर जास्त पावसाच्या प्रदेशात बेसॉल्ट खडकातील लोह अंश गंजुन तांबड्या / लाल रंगाची मृदा तयार होते. सह्याद्री पर्वताच्या उत्तर भागात पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांच्या पूर्व भागांत, सातारा व सांगलीच्या सह्याद्री पर्वतात ही मृदा आढळते. या मृदेत सेंद्रिय घटक, कॅल्शिचम, स्फुरद यांचे प्रमाण कमी असते. पाण्याचा निचरा चांगला होतो. या मृदेची सुपीकता कमी असते. रासायनिक खतांचा पुरवठा केल्यास या जमिनीतून भात, नाचणी, भरड धान्य ही पीके घेता येतात.

५. तांबूस पिवळसर मृदा :-

पूर्व विदर्भात वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यीतल वर्धा-वैनगंगा नदी खोऱ्यात ही मृदा आढळून येते. ही मृदा तांबूस पिवळसर रंगाची आहे. चिकणमाती व वाळूमिश्रीत या मृदेस आयर्न पॅरॉक्साईडमुळे तांबडा रंग आला आहे. या मृदेत चुनखडी, कार्बोनेट, फॉस्फरिक अॅसिड, ह्युमस व पोटॅश यांचे प्रमाण अल्प असते. ही मृदा तांबूस पिवळसर दिसते. या मृदेवर जास्त पावसाच्या प्रदेशात तांदूळ पिक घेतले जाते. या मृदेची उत्पादनक्षमता कमी आहे. या मृतेतून भरड धान्य, ही पिकेही घेतली जातात. या मृदेस 'भारा', 'वाडी' किंवा 'रेताड हलकी मृदा' असेही म्हणतात.

६. नद्यांच्या खोऱ्यातील गाळाची जमीन :-

ही मृदा नद्यांच्या खोऱ्यात आढळत असून ती अत्यंत सुपीक आहे. नद्यांनी वाहून आणलेल्या

गाळापासून या मृदेची निर्मिती झाली आहे. मुख्यत्वे कृष्णा, गोदावरी, पंचगंगा, भीमा, तापी, पूर्णा इ. नद्यांच्या खोऱ्यात ही मृदा आढळते.

या मृदेचा रंग गडद काळा असून यामध्ये सेंद्रीय पदार्थांचे प्रमाण जास्त आढळते. या मृदेची उत्पादन क्षमता जास्त आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करूनही जास्त उत्पादन घेता येणे शक्य आहे. या मृदेत गहू, ज्वारी, ऊस, भाजीपाला याबरोबर फळ पिकांचे उत्पादन घेतले जाते.

३.३ मृदा अवनती / मृदा न्हास संकल्पना: (Soil Degradation)

सध्याच्या काळातील अतिशय महत्त्वाची समस्या म्हणून मृदा अवनतीकडे पाहिले जाते. बाढ़ती लोकसंख्यायामुळे वाढती अन्नाची मागणी व कारखान्यांना लागणारा कच्चा माल यासाठी मोठ्या प्रमाणावर मृदेचा वापर होतो आहे यातूनच मृदा अवनती सुरू झाली. मृदा एक महत्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती असून त्यावर अतिरेकी भार हा मृदा अवनतीसाठी कारणीभूत ठरतो आहे.

·       "मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी अयोग्यरित्या व निष्काळजीपणे मृदेचा अतिवापर केल्याने मृदेची गुणवत्ता बिघडून त्या मृदेची उत्पादन क्षमता कमी होते यास मृदा अवनती/मृदा न्हास म्हणतात."

·       "मृदा अवनती म्हणजे मृदेची भौतिक, रासायनिक व जैविक गुणवत्ता बिघडणे होय."

·       "अयोग्य पध्दतीने मृदेचा शेतीसाठी व औद्योगिक गरजा भागविण्यासाठी होणारा वापर यातून मृदेची गुणवत्ता बिघडते यास मृदा अवनती म्हणतात."

मृदेचा व्हास हा मानवी निष्काळजीपणा, मृदेच्या चुकीच्या व अति वापरातून होतो आहे. यामुळे मृदेचा वरचा थर नाहीसा होणे, मृदेची सुपीकता कमी होऊन ती नापीक होणे या गोष्टी होतात. या मृदेत शेतीचा विकास करणे शक्य होत नाही. मृदा अवनती/व्हास प्रामुख्याने वृक्षतोड, चुकीची शेती पध्दती, सागरी पाणी शेतजमीनीत शिरून, जमिनीची धूप, वाळवंटीकरण यातून निर्माण होते.

एकूण मृदा -हासामध्ये पाणी व वान्याचा सहभाग जास्त असून तो एकूण परिणामकारक घटकांच्या ८५ टक्के इतका आहे. पाण्यामुळे होणारा मृदा हास हा ५६ टक्के तर वाऱ्यामुळे तो २८ टक्के इतका होतो.

मृदा अवनती/हासाचे प्रकार व कारणे :-

प्रामुख्याने मृदा अवनती/न्हास हा तीन कारणांनी होतो ही कारणे पुढीलप्रमाणे :-

अ) रासायनिक अवनती :-

यामध्ये पोषक मुलद्रव्य पाण्यात विरघळून निघून जातात. ही खोल मातीमध्ये किंवा पाण्यातून नदीमध्ये निघून जातात. जमिनीला अति पाणीपुरवठा केल्यास व रासायनिक खतांचा वापर वाढवल्यास केशाकर्षण क्रियेने खालच्या थरातील क्षार वरच्या थरात एकत्र होतात व जमिनीची पाणी झिरपण्याची क्षमता कमी होते. जमिनी क्षारपड व पाणथळ बनतात. समुद्राचे पाणी शेतजमिनीत शिरणे, सखल भागात पाणी साचून राहणे यातून जमिनी पाणथळ व नापीक बनतात. याबरोबर वाढणारी लोकसंख्या यातून झालेला कारखानदारीचा विकास व या कारखान्यातून बाहेर पडणारे टाकाऊ रासायनिक घटकांनीयुक्त असणारे पाणी शेतजमिनीवर सोडल्याने, प्लॅस्टिक, रासायनिक खते, तणनाशक, किटकनाशके यांच्या अतिरेकी वापरातून रासायनिक मृदा अवनती होते.

ब) प्राकृतिक मृदा अवनती :-

जमिनीचा वरचा सुपीक थर वारा, पाणी या माध्यमातून निघून गेल्याने म्हणजेच जमिनीची धूप झाल्याने प्राकृतिक मृदा अवनती घडून येते. मानवही मृदेचा वरील थर काढून टाकण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारणीभूत असतो. यामध्ये शेती करण्याच्या चुकीच्या पध्दती, वृक्षतोड यातून वारा व पाण्याचे कार्य जोमाने चालण्यास मदत होते व मृदा अवनती होते.

क) जैविक मृदा अवनती :-

यामध्ये आधुनिक शेती पध्दतीतील किटकनाशके, तणनाशके, रासायनिक खते यांचा अत्यधिक वापर व सेंद्रीय खतांचा कमी वापर यामुळे जमिनीतील अत्यावश्यक जिवाणूंचे प्रमाण कमी होते. त्याचा परिणाम पिकांना जमिनीतील नैसर्गिक व रासायनिक खनिजांची परिपूर्ण उपलब्धता होत नाही त्यामुळे त्यास जैविक मृदा अवनती म्हणता येईल.

याबरोबरच काहीवेळा काही जीवजंतूंमुळे मृदेतील पोषक द्रव्ये, खनिजे नष्ट करण्याची प्रक्रिया होते, यातून जमिनीनापीक बनतात. या प्रकारच्या जमिनीत पीके घेतल्यास मुळकुज किंवा तत्सम प्रकारचे रोग होतात. हे जैविक मृदा अवनतीमध्ये विचारात घेता येतील. वृक्षतोड, चराऊ कुरणांचा वापर, स्थलांतरित शेती तसेच उंदीर, घुशी यासारख्या प्राण्यांमुळेही जमिनीची धूप वाढीस लागते व जैविक मृदा अवनती होते.

मृदा अवनती परिणाम :-

1.     चांगली मृदा प्रवाही पाणी, पाऊस, वारा यामुळे एका ठिकाणामुळे दुसऱ्या ठिकाणी वाहून जाते व कठिण खडक उघडे पडतात. यातून जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते. या मृदा परिपक्व नसतात.

2.     पोषक द्रव्य निघून गेल्याने पिकांना आवश्यक घटकांची कमतरता निर्माण होऊन पिकांची वाढ खुंटते, वेगवेगळ्या रोगांना पिके बळी पडतात. उगवण क्षमतेवर याचा वाईट परिणाम होतो व उत्पादन घटते.

3.     जमिनीच्या वरच्या थरातील क्षारांचे प्रमाण वाढल्याने जमिनी कठीण बनतात व या जमिनीतून पिकांचे उत्पादन घेणे शक्य होत नाही. या जमिनी नापीक बनतात.

4.     काही जविशरीर पाणी पिण्याची क्षमता कमी होते यातून त्या पाच बनतात पिकांचे उत्पादन घेणे शक्य होत नाही.

5.     चांगल्या मृदेमध्ये कारखान्यात कायनिक घटक मिसल्याने जमिनीतील गुटकांचे संतुलन बिघडते, जमिनी नापीक होतात व उत्पादन घटते.

6.     जमिनीतील सेंद्रीय घटकांचे प्रमाण चांगल्या उपयोगी जिवाणूंची संख्या कमी झाल्याने पिकाच्या वाडीवर त्याचा विपरित परिणाम होतो व उत्पादन घटते.

मृदा ऱ्हास /मृदा अवनती नियंत्रणाच्या पध्दती :-

मृदा ऱ्हास /अवनतीसाठी पाणी व चारा हे दोन घटक प्रामुख्याने जबाबदार असल्याने त्यावर योग्य पध्दतीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. मानवाच्या शेती करण्याच्या चुकीच्या पध्दती, शेतजमिनीवरील अतिरेकी ताण, वाढते औद्योगिकीकरणावर योग्य उपाय योजल्यास मृदा न्हास नियंत्रण करून मृदा मंधारण होऊ शकते. यासाठी खालील उपाययोजना महत्वाच्या आहेत.

१. पाण्यामुळे होणाऱ्या धुपीवर नियंत्रण :-

पाऊस, वाहते पाणी, भूमिगत पाणी, सागरी लाटा, भरती ओहोटी यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूत होते. हे प्रमाण एकूण मृदा हासाच्या ५६ टक्के आहे. याचा विचार करता पाण्यामुळे होणारी धूप महत्वाची असल्याने ही थांबवण्यासाठी पुढील घटकावर लक्ष देणे आवश्यक आहे. यामध्ये वृक्षारोपण करणे, बांधबंदिस्ती करणे, उताराला अनुसरून नालाबंडींग करणे, वाहून जाणारे पाणी आडवण्यासाठी दगडी बांध घालणे, याबरोबरच शेती पध्दतीत सुधारणा करून उताराला काटकोनात नांगरट करणे, मल्चींग पध्दतीचा वापर, आलटून पालटून पिके घेणे, याबरोबरच सागरी पाण्यामुळे होणारी सागरी किनाऱ्याची धूप थांबवण्यासाठी वृक्षारोपण, बांधबंदिस्ती, किनारी भागात भितींची निर्मिती या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.

२. वान्यामुळे होणाऱ्या धूपीवर नियंत्रण :-

वाऱ्यामुळे होणारा मृदा न्हास हा एकूण मृदा हासाच्या २८ टक्के आहे. यावर पुढील पध्द‌तीने नियंत्रण मिळवता येईल यामध्ये वनसंवर्धन, वृक्षलागवड, चराऊ कुरणांच्या वापरावर बंदी, जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी जमिनीवर पालापाचोळा पसरवणे या प्रकारच्या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. वाळवंटांचे प्रसरण कमी करण्यासाठी या उपाययोरा महत्वाच्या आहेत.

३. आधुनिक जलसिंचनाच्या पध्दतींचा वापर :-

यामध्ये पिकांच्या गरजेनुसार, जमिनीची प्रत व हवामानाचा विचार करून पिकाला आवश्यक तेवढेच पाणी देण्यासाठी आधुनिक ठिंबक सिंचन, तुषार सिंचन पध्दतींचा वापर केल्यास मृदा संधारण योग्य पध्दतीने होऊ शकेल.

४. रासायनिक खतांचा योग्य वापर :-

रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात, पिकांची गरज व मृदेत असणारे घटक विचारात घेऊन वापर केल्यास मृदा अवनती टाळता येणे शक्य आहे. यासाठी मृदा तपासून रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर आवश्यक आहे. रासायनिक खताबरोबर शेणखत, सोनखत, लेंडी खत, कोंबडी खत, हिरवळीचे खत, गांडुळ खत यांचा वापर वाढवणे आवश्यक आहे.

५. मृदा प्रदूषण रोखणे :-

रासायनिक कारखान्यातील रसायनमिश्रित पाणी सरळ शेतजमिनीत न मिसळता त्यावर प्रक्रिया करून त्यामधील जमिनीसाठी घातक ठरणारे घटक बाजूला करून हे पाणी शेतीसाठी वापरण्याची तरतूद होणे आवश्यक आहे. प्लॅस्टिक, ऑईल, धर्माकोल असे न कुजणारे घटक शेतजमिनीत जाणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे केल्यास मृदा अवनती कमी करता येऊ शकते.

३.४ मृदा धूप :-

मृदा ही महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. मानवी जीवनाचा विकास व मानवाच्या सर्व मूलभूत गरजा या मृदेतूनच पूर्ण होतात. मृदा धूप ही आजची खूप मोठी समस्या आहे. मृदा धूपीमुळे भूपृष्ठावरील सुपीक माती वाहून जाते व मृदेच्या उत्पादन क्षमतेवर अनिष्ट परिणाम होतो.

"मृदा धूप म्हणजे जमिनीवरील माती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाणी, वारा व गुरुत्वाकर्षणामुळे वाहून नेली जाणे होय."  

मानवी हस्तक्षेपही मृदा धुपीसाठी कारणीभूत ठरतो. मृदेचा सर्वात वरचा थर हा पिकांसाठी व नैसर्गिक वनस्पतींसाठी आधार देण्याबरोबरच पोषक अन्नघटक पुरवतो. या थराची जाडी १५ ते २०सें.मी. असते सुमारे २.५ सें.मी. मृदा थर तयार होण्यासाठी ५०० ते १००० वर्षाचा कालावधी लागतो. पण हा मृदा थर वाहून जाण्यास अल्पसा कालावधीसुध्दा पुरेसा ठरतो. याचा परिणाम त्या मृदेची उत्पादनक्षमता कमी होते व जमिनी नापीक व पडीक बनतात. यावरून मृदा धूप समस्येची भिषणता लक्षात येते.

मृदा धूपीवर पाऊस, वाहते पाणी, वारा, सागरी लाटा, भरती ओहोटी, जमिनीचा उतार व प्रकार, हवामान, वनस्पतींचे अच्छादन हे घटक प्रभाव टाकतात.

मृदा धूपीचे प्रकार :-

मृदा धूप ही प्रामुख्याने पाऊस, वाहते पाणी, वारा या कारणांमुळे होते. धूप कशामुळे व कशी होते यावरून मृदा धूपीचे वेगवेगळे प्रकार पडतात.

अ) पाऊस व वाहत्या पाण्यामुळे होणारी धूप :-

पावसाचे पाणी जमिनीवरून वाहताना ते मृदा धूप करण्यास कारणीभूत ठरते. या धूपीचे पुढील प्रकार पडतात.

१. चादर धूप : ही धूप पावसाच्या पाण्याने घडून येते. मुसळधार पावसाने / पाण्याच्या माऱ्याने मोठ्या प्रदेशातील मातीचा वरचा थर निघून जातो याच चादर धूप म्हणतात.

२. झोड धूप : पाण्याचा थेंबाचा आकार व गतीमुळे झालेल्या मृदेच्या धूपीस झोड धूप म्हणतात. पडीक मृदेमध्ये याप्रकारची धूप मोठ्या प्रमाणात होते. यावेळी मृदेचे बारीक कण पाण्याच्या थेंबाच्या माऱ्याने बाजूला फेकले जातात.

३. नाली सदृश्य धूप : पाऊस पडून पाणी उताराला अनुसरून वाहण्यास सुरवात करते, तेव्हा जमिनीवर बोटाएवढे पाण्याचे बारीक ओहोळ दिसतात, त्यास नालीसदृश धूप म्हणतात. कमी उताराच्या प्रदेशात ही धूप दिसून येते.

४. घळई धूप: जस जसे पावसाच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढते, त्यानुसार उतारावरून ते जास्त वेग घेते. त्याप्रमाणात तेथे खोली वाढत जाते व त्यास घळईचे स्वरूप प्राप्त होते. यास घळई धूप म्हणतात. जास्त उताराच्या प्रदेशात ही धूप दिसून येते.

ब) वाऱ्यामुळे होणारी धूप :-

मुख्यत्वे शुष्क आणि वाळवंटी क्षेत्रात जोराच्या वाऱ्याने मातीचे कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. या प्रदेशात वनस्पतींचे आच्छादन कमी असते, यामुळे वाऱ्याचे कार्य जोमाने होते व मृदा धूप घडून येते.

क) नदीकाठची व समुद्र किनाऱ्याची धूप :-

पुराच्या पाण्याने नदीकाठावरील मातीची धूप होते. नदीच्या नागमोडी वळणाच्या ठिकाणी ही धूप मोठ्या प्रमाणात होते. याबरोबरच सागरी किनारी भागात सागरी लाटा, भरती-ओहोटी यामुळे मृदा धूप होते .

मृदा धूपीची कारणे :-

मृदा धूप अनेक कारणाने होते. यामध्ये पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप व नैसर्गिक घटक कारणीभूत

ठरतात.

१. पाण्याचे कार्य :-

पाण्यामुळे मृदा धूप होते. जमिनीचा उतार, जमिनीचा प्रकार, पावसाचे प्रमाण, पाण्याचा वेग, पाण्याचे प्रमाण, पाण्याबरोबर वाहत येणाऱ्या गाळाचे स्वरूप व प्रमाण हे घटक पाण्यामुळे होणाऱ्या मृदा धूपीवर परिणाम करतात. जेथे पाण्याचे कार्य प्रभावी असते तेथे मृदा धूप मोठ्या प्रमाणावर होते.

२. वाऱ्याचे कार्य :-

पाण्यामुळे मृदा धूप होते. जमिनीचा उतार, जमिनीचा प्रकार, पावसाचे प्रमाण, पाण्याचा वेग, पाण्याचे प्रमाण, पाण्याबरोबर वाहत येणाऱ्या गाळाचे स्वरूप व प्रमाण हे घटक पाण्यामुळे होणाऱ्या मृदा धूपीवर परिणाम करतात. जेथे पाण्याचे कार्य प्रभावी असते तेथे मृदा धूप मोठ्या प्रमाणात होते.

३. भूप्रदेशाचा उतार :-

भूप्रदेशाचा उतार जितका तीव्र तितका पाण्याचा वेग जास्त असतो व जमिनीवरील मातीचा धर

वाहून जाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कठीण खडक उघडे पडतात. यामुळे सपाट प्रदेशापेक्षा जास्त उताराच्या प्रदेशात मृदा धूप जास्त प्रमाणात असते.

४. वृक्ष तोड :-

वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात, पण जेव्हा वृक्षतोडीमुळे जमिनी उघड्या पडतात तेव्हा मृदा धूप मोठ्या प्रमाणात होते. जेथे वनस्पतीची संख्या जास्त असते तेथे मृदा धूप कमी असते.

५. शेती पध्दती :-

अतिरेकी शेतजमिनीवर पडणारा ताण, चुकीच्या मशागतीच्या पध्दती, स्थलांतरित शेती पध्दती, एकच एक प्रकारचे पीक घेणे, सतत जमिनीचा होणारा वापर, अती पाण्याचा वापर यातून मृदा धूप मोठ्या प्रमाणात होते.

६. अति चराई:-

गवताळ कुरणांचा वापर गायी, म्हैशी, शेळी-मेंढी चरण्यासाठी केल्यास जनावरांच्या खुरामुळे जमीन उकरली जाते. जमिनीवरील माती मोकळी झालेने व मातीचे कण सुटे झालेने पावसाच्या पाण्याने ती माती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाते व मातीची धूप होते.

७. मानवी हस्तक्षेप :-

मानवी हस्तक्षेपामुळे खाणकाम व तत्सम गोष्टीमुळे वरील सुपीक मातीचा थर नाहीसा होतो व जमीन नापीक होण्याचा धोका वाढतो.

मृदा धूपीचे परिणाम :-

मृदा धूप ही मोठी समस्या आहे, याचे परिणाम शेतजमिनीवर होतात व मोठे नुकसान होते.

१.      जमिनीवरील सुपीक मातीचा थर, पाणी, वारा, मशागतीच्या चुकीच्या पध्दती यामुळे वाहून गेल्याने वनस्पतींना आवश्यक असणारी पोषक तत्त्वे योग्य पध्दतीने मिळत नाहीत. यातून मिळणारे उत्पादन कमी होते.

२.     वनस्पतींना आधार देण्याचे काम मृदा करणे. मृदा धूपीमुळे मातीचा वरचा थर निघून गेल्याने व खडक उघडे पडल्याने वनस्पतीचा आधार नाहीसा होतो, यातून वनस्पतीचे प्रमाण कमी- कमी होत जाते व जमिनी उघड्या पडतात. यामुळे तापमान वाढ व पावसाचे प्रमाण कमी होते.

३.      मृदा धूपीमुळे जमिनी नापीक होतात. त्यातून त्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांना आर्थिक आरिष्टाला सामोरे जावे लागते.

४.     कारखान्यांना लागणाऱ्या कच्चा माल उत्पादनावर मृदा धूपीचा परिणाम होऊन उत्पादनात घट होते.

५.     मृदा धूपीमुळे जमीन ओबडधोबड व शेतीस अयोग्य बनते.

६.     मृदा धूपीमुळे वरील थरातील सेंद्रीय घटक व विविध खनिजे निघून गेलेने मृदेचा दर्जा खालावतो व मृदेची उत्पादन क्षमता कमी होते.

७.     मृदा धूपीमुळे मृदा परिपक्व बनत नाही. जाड्या भरड्या पोताची अपरिपक्व मृदा तयार होते. या मृदेची उत्पादन क्षमता कमी असते.

मृदा धूप नियंत्रणाच्या पध्दपती/उपाय/मृदा संधारण :-

मृदा धूप रोखण्यासाठी, तिच्यातील खनिजद्रव्य, सेंद्रीय घटक टिकवून त्या मृदेची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी मृदा संधारण गरजेचे आहे. यासाठी पुढील उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.

१. वनसंवर्धन :-

वृक्ष लागवड, वृक्षतोड थांबवणे, पुनर्वनीकरण या माध्यमातून वनसंवर्धनाचे उपाय मृदा धूप रोखण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरतात. वनामधील गवत, झुडपे, वृक्ष हे पाण्याचा वेग कमी करतात. या वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात, यामुळे मृदा धूप कमी होण्यास मदत होते.

२. बांधबंदिस्ती :-

उताराला अनुसरून शेतजमिनीस बांध घातल्याने वाहून जाणारे पाणी अडवले जाऊन मृदा धूप कमी होण्यास मदत होते.

३. नाला बंडींग :-

उताराला अनुसरून काटकोनात नाला बंडींग केल्यास वाहून जाणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन पाण्याबरोचर वाहून जाणारे मातीचे कण नाल्यामध्ये येऊन साचतात. यातून मृदा धूप थांबवण्यास मदत होते.

४. योग्य शेतीपध्दतींचा वापर :-

पाणी देण्यासाठी आधुनिक ठिंबक सिंचन, तुषार सिंचन पध्दतींचा वापर, मशागत करत असताना उताराला अनुसरून काटकोनात नांगरट, पायऱ्यांची शेती, जमिनीची धूप नियंत्रित करणाऱ्या पिकांची म्हणजे भुईमूग, द्विदल धान्य या प्रकारच्या पिकांची लागवड, स्थलांतरित शेतीवर निर्बंध, चराऊ कुरणांच्या वापरावर बंदी अशा उपाययोजना केल्यास मृदा धूप नियंत्रित करण्यास मदत होऊ शकेल.

५. पूर नियंत्रण :-

ओढे, नाले, नद्यांवर छोट्या-छोट्या आकाराचे बंधारे बांधल्यास पाण्याला अडथळा निर्माण होऊन वेगाने वाहून जाणारे पाणी थांबेल अथवा त्याचा वेग कमी होईल. यामुळे मृदा धूप रोखण्यास मदत होईल.

६. दगडगोट्यांचे अस्तरीकरण :-

जेथे पर्जन्याचे प्रमाण कमी आहे अशा जमिनीवर वाळूमिश्रीत दगडगोटे पसरून वाहून जाणारे पाणी अडवण्याचे व जमिनीत जिरवण्याचे काम होऊ शकते. यातून पाण्यामुळे व वाऱ्यामुळे होणारी मृदा धूप रोखण्याचे काम चांगल्या पध्दतीने होऊ शकते.

७. सागरी किनाऱ्याचे संरक्षण :-

सागरी किनारी भागात बांध बंदिस्ती, वृक्षारोपण यासारख्या उपाय योजना करून सागरी लाटा व

भरती आहोटीपासून होणारी धूप थांबवता येणे शक्य आहे.

Post a Comment

Previous Post Next Post